Skip to main content

एंट्री

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 15/04/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एक मुंबईमधला नाका. सकाळची १० ची वेळ. मी थांबलो होतो बस करता. इतक्यात एक टेंपो येताना दिसला. लक्षात राहायचे कारण असे की त्यात ड्राईवरच्या बाजुला एक पन्नाशीचे गृहस्थ कोंबुन बसले होते. ड्राईवरने टोल भरला. जरा पुढे आल्यावर ऑक्ट्रॉयच्या शिपायाने टेंपो अडवला. गृहस्थ खाली उतरले. त्यांनी शिपायाला एक पत्र दाखवले. पण शिपाई काही टेंपो सोडेना. साधारण बोलण्यावरुन गृहस्थ मास्तर असावेत असे वाटले. ही जात कुठुनही ओळखता येते. थोड्या वेळ्याने मास्तर रागारागाने मोठ्या साहेबाला भेटायला ऑफिसमधे गेले.

राज ठाकरेंनी नाशिक मुक्कामी मराठी माणसांसाठी हाक मारली

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/04/2009 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंनी नाशिक मुक्कमी मराठी माणसांसाठी हाक मारली
raaj in nashik नाशिक दि. १३ एप्रिल ०९ (मि.पा. विशेष प्रतिनिधी ) : तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करण्यासाठी मनसे ला आपले मत द्या असे अवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केले. मनसेच्या नाशकातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पवननगर - नाशिक येथील मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकास्र सोडले. शरद पवारांना हि निवडणुक लढवायची नव्हती.

माझी भटकंती - ओहाय (Ojai)

लेखक भाग्यश्री यांनी बुधवार, 15/04/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही! तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे.. ते प्रवास वर्णन असेल की अजुन काय ते माहीत नाही..

पोह्याचे कटलेट

लेखक ऋचा यांनी बुधवार, 15/04/2009 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्यः- उकडलेले बटाटे २,जाडे पोहे २ वाट्या,तिखट,मीठ्,साखर्,टोस्टचा चुरा किंवा बिस्कीटाचा चुरा कृती :- पोहे भिजवुन घ्यावेत त्यात उकडलेले बटाटे कुस्करुन घालावेत त्यात तिखट-मीठ-साखर घालावी. हे सगळं एकत्र मिक्स करुन त्यांना चपटा आकार द्यायचा(रगडा पॅटीसच्या पॅटीसचा असतो तसा). तव्याला अगदी थोडे तेल लावुन त्यावर वरील केलेल्या चकत्या टोस्ट्च्या किंवा बिस्कीटाच्या चुर्‍यात घोळवुन फ्राय कराव्या.

शीत गोडाऊन..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 14/04/2009 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
काय!!!! समजलं नाही ना, नक्की काय नाव आहे लेखाचं?? सांगते. मित्रहो, बर्‍याच वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण ३० एक वर्षापूर्वी, दूध नासण्याचे प्रकार फार होत होते. मग गृहीणी, बाया-बापड्या, नोकरदार स्त्रीया दूधाचं विरझण लावायच्या आणि मग नंतर त्याचं ताक, लोणी शेवटी तूप. घरात माणसंही भरपूर होती.. आणि डायटींगची ओझी नसल्याने "अरे घे रे भरपूर तूप" असं सर्वसाधारण प्रकृतीच्या माणसाला आग्रहाने सांगितलं जायचं. केवळ दूधाचंच नव्हे.. तर भाज्या, फळे, आमटी.. तोंडीलावणी. या सगळ्याचीच सांगता कामवालीला देऊन, नाहीतर थलीपीठात बेमालूम पणे घालून नवा पदार्थ बनवण्यात व्हायची. ..

भारतीय हे 'स्लमडॉग आयटी वर्कर'

लेखक मनिष यांनी मंगळवार, 14/04/2009 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
Rush Limbaugh ह्याने एका रेडीओ शो वर ही मुक्ताफळे उधळली. मूळ बातमी इथे वाचता येईल - http://business.rediff.com/report/2009/apr/14/us-radio-host-indians-are…
"There's a reason [these jobs] aren't coming back.

वेजिटेबल सूप

लेखक चकली यांनी मंगळवार, 14/04/2009 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
वाढणी: प्रत्येकी साधारण १ कप (३ ते ४ जणांसाठी) साहित्य: २ टेस्पून किसलेले गाजर २ टेस्पून कॉलीफ्लॉवर,एकदम बारीक चिरून २ टेस्पून कोबी, एकदम बारीक चिरून २ टिस्पून लसूण पेस्ट २ टिस्पून तेल ३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून ४ टेस्पून पाती कांदयाची हिरवी पा