Skip to main content

सेंटेड प्रेम..

लेखक jenie यांनी गुरुवार, 23/04/2009 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
सहज एक विरंगुळा म्हणून आणि आज कालची मूलं कशी विचार करतात या साठी ही कविता ...कवितेची सुरवात मी करते तुम्हाला काही सुचते का ते सांगा... पूर्ण आपण करुयात... रोज रोज तुला गुलाबाचे फुल द्यायला एक रुपाया भार पडतो माझ्या खिशाला रोज रोज भेळ -पुरी खायला लाज नाही वाटत मनाला?? काय होत तुला डबा घरुन आणायला??? रोज रोज फिरायला रि़क्षा लागते तुला थोडं फार चालताना काय पाय लागतात दुखायला दर महिन्याला तुला ड्रेस द्यायला काय बापाची जहागीरी समजते मला?? ------------- ----------- ------- -----
Taxonomy upgrade extras

मालिका...एक अत्याचार

लेखक अ-मोल यांनी गुरुवार, 23/04/2009 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मराठी वाहिन्यांवर विकृत मालिकांचा सुळसुळाट झाला आहे. अतिरंजित कथानकं, मेलोड्रामा, हिंदी मालिकांचे नको तितके अनुकरण आणि बिनडोक हाताळणी यामुळे कोणतीही मालिका पाहणे उबग आणणारे आहे. काही दिवसांपुर्वीपर्यंत त्यातल्या त्यात असंभव ही मालिका चांगली वाटत होती, मात्र आता त्यातही उगाळून फेस आणणं तर सुरु झालंच आहे, पण विकृतीचं ग्लॅमरायझेशनही होत आहे. बाकी वहिनीसाहेब, अवघाचि संसार, कळत नकळत आणि काय.... यांच्याविषयी बोलायलाच नको. या मालिकांमधली पात्रं दिसायला तुमच्या आमच्यातलीच असली, तरी इतके सराईतपणे गुन्हे करतात की विचारायलाच नको.

महात्मा फुल्यांचे फलज्योतिषविषयक विचार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 23/04/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार
फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो.

तू!

लेखक उमेश कोठीकर यांनी गुरुवार, 23/04/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुझेच नाव स्वप्नांच्या ओठी "तू"च निघे मोती शब्दांच्या पोटी निळ्या या नभात भासे तुझे रूप पृथ्वी सर्व वाटे तुझेच स्वरूप! दिसे फक्त तूच नेत्री येई पाणी ऐकू येते फक्त नाव तुझे कानी आरशात तूच दिसते साकार एकांतही घेतो तुझाच आकार! तळ्यात चंद्र तुझेच बिंब फुलांत तूच दवाने चिंब होउनी श्वास जाई तू आत स्पंदते नित्य तू हृदयात मंदिरी मूर्तीत हसते तूच कणीकणी माझ्या वसते तूच!
Taxonomy upgrade extras

गवार बटाटा जवळा

लेखक चित्रादेव यांनी गुरुवार, 23/04/2009 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
gavaar गवार आमची तशी एकदम मनपसंद भाजी. त्यात परवा तात्यांनी जवळयाची आठवण काढून दिली. मग काय घेतली पिशवी आणि गेले बाजाराला. फरक हाच की इथे कोळीण न्हवती भांडायला. इथे बाप्या होत्या मिचमिच्या डोळ्याचा. इकडच्या एशियन मार्केटात गेले अन घेवून आले सुखा जवळा. मग गवार आणली. जमवाजमव झाली.मग केली सुरुवात. तर मंडळी, हे घ्या. सामानः १ वाटी जवळा, १/२ किलोच्या आसपास खुटखुटीत गवार्(मोडून पहा कशी खुटकन मोडते का नाही.

आणि माझा मारूती झाला-२

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 23/04/2009 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
As far as I am concerned, the child is absolutely normal. There are no strong triggers to confirm DYSFUNCTION>DISORDER>REBELLION>CHAOS THERORY. There is no random instance leading to another random instance and therfore traceble pattern to confirm chaos theory. May be the pattern is yet to emerge. And nothing is wrong in desire to leave a life with own Terms. In the mean time what do I tell the parents. केस हाताळ्णारे डॉक्टर म्हणाले. _____________________________________________________ मी कुमारीका नाही. मी पुरुष द्वेष्टी पण नाही. 'निंफोमॅनीयॅक' तर नाहीच नाही.

मदत हवी आहे.

लेखक जागु यांनी बुधवार, 22/04/2009 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चुलत भावाला जुळे झाले आहे. एक मुलगा एक मुलगी त्याला बारशाची आमंत्रण पत्रीका छापायची आहे. त्यात थोडे काव्य हवे आहे. प्लिज छोटी आणि छान कविता सुचवा.

आमचा पण `गजनी'

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 22/04/2009 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
Ghajini" alt="" /> "अण्णू गोगट्या होणे म्हणजे पडणे' हा वाक्‍प्रचार जसा अंतू बर्व्यानं मराठी भाषेला बहाल केला, तसा "कोणतीही गोष्ट उठसूट विसरणे म्हणजे एखाद्याचा "गजनी' होणे' हा वाक्‍प्रचार ए. मुरुगदासने बहाल केलेला म्हणायला हवा. तर, माझा सध्या असा "गजनी' झालाय. एखादी प्रचंड इंटरेस्टची गोष्ट वगळता, बहुतेक सगळं विसरायला होतं. मध्यंतरी "अल्झायमर'चा पण एकदा भास झाला होता.

तारखेवरून वार

लेखक अभिज्ञ यांनी बुधवार, 22/04/2009 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
खुप वर्षांपुर्वी दुरदर्शन वर ज्ञानदीप का काहिश्या कार्यक्रमात एक वल्ली आली होती. ह्या महाशयांना म्हणे सर्व वर्षांचे कॆलेंडर पाठ होते. समोर बसलेला श्रोतृगण ह्यांना तारखा सांगत होते अन हे धडाधड त्यादिवशी वार कोणता हे सांगत होते. दोनेक वेळा हे गुरुजी चुकले देखील परंतु सुत्रसंचालकाने कशीबशी वेळ मारून नेली होती. परंतु त्या माणसाच्या ह्या सामर्थ्याचे आम्हाला त्यावेळी फ़ारच कौतुक वाटले होते. परंतु पुढे मागे ह्या तारखे वरून वार ओळखण्याच्या फ़ॊंर्म्युला समजला अन आम्हाला परम आनंद जाहला. तर मंडळी विषय असा होता कि कुठल्याही तारखेवरून त्या दिवशी वार कोणता होता हे कसे ओळखायचे? (अर्थात का