"असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं."
आज प्रो.देसाई फिरायला येणार नाहीत म्हणून निरोप द्यायला आलेली त्यांची मुलगी वृंदा आणि तिची मैत्रीण मालिनी मला तळ्यावर भेटल्या.मालिनीची माझ्याशी ओळख करून देत वृंदा म्हणाली,
"तुमच्याशी गप्पा मारायला बरं वाटतं.आमचे भाऊसाहेब तर तसं नेहमीच सांगतात."
हे ऐकून मला अंमळ बरं वाटलं.
"ही माझी मैत्रीण मालिनी.हिला दोन मुलं आहेत एक मुलगी कॉलेजात जाते."
मी वृंदाला म्हणालो,
"तू म्हणालीस की मालिनीला दोन मुलं आहेत आणि एक मुलगी कॉलेजात जाते.पण हिच्याकडे पाहिल्यावर ही दोन मुलांची आई वाटत नाही.असं हिचं काय गुपीत आहे की ती अशी दिसावी?"
असं बोलून मला एखाद्या विषयावर गप्पा सूरू करायची कल्पना सुचली.
मिसळपाव
