Skip to main content

यातना

लेखक स्वप्नयोगी यांनी बुधवार, 20/05/2009 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
ओठावर हळूच येणारे शब्द जेंव्हा माघारी वळतात खरं सांगतो तुला मी तेव्हा मनाला फार यातना होतात

लोक कम्युनिस्टांवर इतके चिडतात तरी का?

लेखक वेताळ यांनी बुधवार, 20/05/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर राजकारणाची चर्चा चालताना त्यातल्या त्यात कम्युनिस्टांवर चर्चा करताना लोक जहाल होतात . असे का घडते? कम्युनिस्टांवर सगळ्याना इतका राग का आहे तेच कळत नाही.खर तर कम्युनिझम हा तर सर्वसामान्य माणसांचे जीवन्मान सुधारण्यासाठी निर्माण झाला आहे . परंतु आज सर्वसामान्य लोकच त्याच्या कडे पाट फिरवत आहेत. हा विचार करण्याचे आज कारण म्हणजे नेपाळ ह्या आपल्या शेजारच्या देशातील अस्थिरता . नेपाळ हा खुप वर्षापासुन भारताचा खुप चांगला शेजारी व मित्रदेश आहे. परवा पर्यत त्या देशात राजेशाही होती.परंतु गेल्या काही वर्षात त्या राष्ट्राने लोकशाहीचा स्विकार केला आहे.

श्रीलंका सरकारचे अभिनंदन !!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 20/05/2009 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
लिट्टेचा सर्वेसर्वा प्रभाकरनला ठार करून श्रीलंकेच्या सैन्याने जो दैदिप्यमान विजय मिळविला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! प्रभाकरनसारख्या क्रूरकर्म्याचा अंत करून महिन्द्र राजपक्षे व सनथ फोन्सेका यांनी संपूर्ण मानववंशावर थोर उपकार केले आहेत असेच मला वाटते. गेली तीस वर्षे हा देश लिट्टे आणि इतर फुटीर तमिळ अतिरेक्यांशी लढा देत आहे. इतका छोटा देश स्वतःच्या अस्तित्वासाठी, सिंहली अस्मितेसाठी झगडतो हे निश्चितच कौतूकास्पद आहे. ह्या युद्धात आत्तापर्यंत हजारो निरपराध नागरिक, सैनिक, पोलिस, राजकिय नेते आणि एक अध्यक्ष समर्पित झाले आहेत. भारतानेही अनेक सैनिक आणि राजीव गांधी गमाविले आहेत.

जुन्यात जूनं अलौकिक औषध.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 20/05/2009 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच फार्मसूटीकल डिग्री घेऊन नोकरीला लागलेला माझा भाचा मला आपल्या नोकरीचा अनुभव सांगत होता. मी त्याला म्हणालो, "अनेक रोगावरची औषधं घ्यायला तुझ्या फार्मसीत लोक येत असतील.पण तुला विशेष वाटलेलं औषध कुठलं की ज्याने तुला कुतूहल वाटत असेल?" मला म्हणाला, "तुम्ही मला चांगला प्रश्न विचारला.इतर अनेक औषधं घ्यायला लोक येतात.पण जे लोक उदासिनता कमी होण्यासाठी-Anti-Depressant- औषधं घ्यायला येतात जसं Prozac किंवा Xanax सारखी औषधं घेऊन जातात त्यांच मला जास्त कुतूहल वाटतं. तुम्हाला माहितच आहे की आत्ताच मी एक नवीन जॉब घेतला.एका फार्मसीत मी कामाला लागलो.मला हा माझा जॉब आवडतो आणि मी नियमीत जॉबवर जातो.

दोन दिग्गज

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 20/05/2009 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
चेहेर्‍यांत साम्य आहे, की कल्पनाविलास?

सुट्टी

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 20/05/2009 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
" जरा लवकर घरी या "बायको. बेळगावला जाताना इतर टेन कमांडमेंट मधली एक. मैत्रीणीने वयाच्या ४४ वर्षी पी.एच्.डी मिळवली होती. त्याचा सत्कार समारंभ होता निपाणीला. नेमका मी त्यादिवशी जरा जास्तच व्यस्त होतो. त्यामुळे सर्व कमांड्मेंट्स फोन वरुनच झाल्या. १. वॉशींग मशिन चालु करु नका. २.कपडे वापरले की बकेट मधे टाका. ३. मी नाही म्हणुन उगाच उंडारत बसु नका. ४. ओपनर फ्रिझवर ठेवलेला आहे. ५. एक दिवसाचे करुन ठेवले आहे जेवण. एक दिवस जावेकडे जेवा. पैसे हॉटेलात खर्च करु नका. ६. शक्यतो किचन मधे जाउ नका. गेलात तर गॅस बंद करायला विसरु नका. ७. झाडाला पाणी घाला. ८. कचरा तुम्ही काढू नका. ९.तीन दिवसात येते.

सुप्रिम कोर्ट आणि विवाहीत पुरूष

लेखक विकास यांनी बुधवार, 20/05/2009 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या म.टा. मधे अंमळ (खालील) गंमतशीर बातमी वाचनात आली:
बायकोचे ऐकाल, तर सुखी राहाल! वैवाहिक आयुष्य सुखाचे व्हावे, असे वाटत असेल तर बायकोच्या मुठीत राहा... बायको सांगेल ती पूर्व दिशा माना... तिच्याविरोधात बोलाल तर चांगलेच अडचणीत याल...

कविता

लेखक स्वप्नयोगी यांनी मंगळवार, 19/05/2009 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण माझी कविता, नजरेसमोर तू शब्द गुंफताना.