काळे प्रणाली
काळे प्रणाली
जगातल्या बहुतेक इतर कायद्यांप्रमाणे "काळे प्रणालीचा" जन्मसुद्धा ध्यानी-मनी नसताना अचानक "अपघाती"च झाला. पण या प्रणालीची पुढील प्रगती मात्र सद्यकालीन परिस्थिती जगाचा अर्वाचीन इतिहास व बिनतोड युक्तिवाद इत्यादींच्या संशोधनावर व सखोल अभ्यासावर आधारलेली आहे. मुख्य फायदा हा की या प्रणालीची प्रचीती पहाण्यासाठीं फारसे कष्ट करावे लागत नाहीत व प्रचीती नाहीं आली तर पुन्हा "मूळपदा"वरही आरामांत येता येते.
काळे प्रणाली थोडक्यांत सांगायची तर " हे जग मिशीवाल्यांचे नाहीं" या चार शब्दांच्या एका वाक्यांत सांगता येईल.
मिसळपाव
विस्थापन झालेल्या गावातले चित्र आहे. लोक घरे सोडून, छतं मोडून गेले आहेत. संपूर्ण गावभर हे असेच अवशेष आहेत शिल्लक. त्या गावातून जात असताना सगळ्या गावाचं भूत झालंय असं वाटत होतं.
कुणाच्या अंगणात पेरूला बारके पेरू लागले होते. कुणी अंगणाच्या पेळूवर स्लिपर्स विसरले होते. कुठे शेवटची चूल पेटवून पुजा केल्याच्या खुणा होत्या. कुणी छताच्या नळ्यांसकट घर तसेच टाकून गेले होते. विस्थापन होऊन जेमतेम दोनेक महिनेच झाले असावेत असं सांगणार्या अनेक खुणा होत्या. भयंकर भयंकर वाटत होतं..