Skip to main content

३ मिनिटांची ये-जा (कलाकृती परिचय : ८)

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 11/08/2021 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख: १ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी ३. कुणास सांगू ? ४. ‘भेट’ तिची त्याची ५. नकोसा पांढरा हत्ती ६. ती सुंदर? मीही सुंदर ! ७. ‘लॉटरी'.......अरे बाप रे ............................................................ आतापर्यंत या लेखमालेत आपण ७ विदेशी कथांचा परिचय करून घेतला. नियमित वाचकांच्या अभ्यासपूर्ण आणि उत्साहवर्धक प्रतिसादांमुळे संबंधित धाग्यावरील चर्चाही चांगल्या रंगल्या.

हंगामा है क्यूँ बरपा

लेखक साहना यांनी बुधवार, 11/08/2021 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वच चित्रपट करमणूक म्हणून पाहायचे नसतात. काही चित्रपट निव्वळ प्रेक्षकांच्या मनाला अस्वस्थ करण्याची दिग्दर्शकाची क्षमता अनुभवण्यासाठी पाहायचे असतात. जोकर हा चित्रपट त्यातीलच एक. सुपरहिरो चित्रपटांत मारवेल वाल्यानी भरपूर धिंगाणा घातला असला तरी माझ्या मनाला भावते ते DC कॉमिक्स सच.

गाणी - मनातली

लेखक सौन्दर्य यांनी मंगळवार, 10/08/2021 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीने जीवनातल्या प्रत्येक घडीसाठी, प्रसंगासाठी, घटनेसाठी गाणी पुरवलेली आहेत. तुम्ही कोणताही प्रसंग डोळ्यासमोर आणा, त्याला साजेसं गाणं तुम्हाला नक्कीच सापडेल. प्रियकराला स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करायला हिंदी गाणी जितक्या आस्थेने मदत करतात तितक्याच आस्थेने प्रेमभंग झालेल्या हृदयाला पिळवटून टाकणारी गाणी तत्परतेने पुढे येतात.

इंग्रजी माय माफ कर

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 10/08/2021 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझे दहावीपर्यंतेच शिक्षण संपूर्ण मराठी माध्यमातून झाले, म्हणजे अगदी विज्ञान सुद्धा मराठी माध्यमातून शिकलो. न्यूटनचे गतिविषयक नियम पाठ करण्यापेक्षा Newton’s law of motion पाठ करणे सोपे आहे हे अकरावाव्या वर्गात समजले. बऱ्याचदा असे वाटते स्वादुपिंड, यकृत, आतडे, जठर यात अडकून जर गोंधळ झाला नसता तर मी आज इंजीनियर होण्याऐवजी डॉक्टर झालो असतो. आता जरतरला काही अर्थ नाही. माझा इंग्रजी माध्यमाचा पहिला तास आजही आठवतो. अकरावीचा गणिताचा तास होता. सर Logarithm शिकवत होते. सरांनी फळ्यावर an असे लिहिले आणि याची फोड करुन सांगा असे विचारले.

ग्रीष्मोत्सव साजरा!

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 10/08/2021 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
वसंतोत्सव नंतर ... वसंताने खो दिल्यावर ग्रीष्म चक्र उभे ठाकते.ग्रीष्म हा अवघडलेल्या अवस्थेसारखाच भासतो.

गावाचा पिंपळ आणि इतर क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 10/08/2021 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
पिंपळाने सोडले गावाच्या पाऱ्याला. फ्लैट मध्ये आला मनी प्लांट झाला. (२) वाळूचे मनोरे वार्यात उडाले. भग्न स्वप्नाची अधुरी कहाणी. (३) कल्पनेला मिळेना साथ शब्दांची. कोरीच राहिली वही कवितेची. (४) पुरोगामी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर काटा रुते कुणाला हा दैव योग आहे. भाला रुते कितींना हा मोदी योग आहे.