Skip to main content

मी व १५० लेख !

लेखक दशानन यांनी बुधवार, 19/08/2009 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा मिपा चालू झाले तेव्हा पासून आजपर्यंत आपण काय काय लिहले हे पाहू हा विचार करताना दोन दिवसात मला स्वतःलाच नवल वाटले की मी मिपावर जवळ जवळ १५० च्यावर लेख / कथा /अनुभव /कविता /विडंबने /चर्चा लिहल्या.... बाप रे ! शालेय जिवनात कधीही धड बसून एक पान व्यवस्थीत लिहलेले आठवत नाही व येथे येवढे लेखन.... माझी सफरचे मी वीस भाग व बाहुबली हॉस्टेलचे दिवस चे मी सात भाग असे दोन मोठे अनुभव लेखन मी केले... मी आधी मनोगतवर हलके फुलके लिहण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या लेखामधील अशुध्द भाषा व हिंदी शब्द ह्यामुळे मला तेथे नेहमीच खडे बोल वाचावे लागत ;) पण मिपावर माझे शुध्द-अशुध्द..

सनातन प्रभात

लेखक कशिद यांनी बुधवार, 19/08/2009 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडली !!! मी हलीच सनातन प्रभात च्या सानिध्यात आलो आहे . मला काही पटल आहे पण काही प्रश्न मनात खटकत आहेत की आज च युगात नुसते मुस्लिम विरूद्व भूमिका घेवोन चालणार नाही आस् माजा मन म्हणता आहे . कारन जर पाकिस्तान भारतात होणार्या सर्वा आतिरिकी करवाया साठी कारणीभूत आहे तर मग पाकिस्तानात होणार्या बोमोस्पोटाला कोण करनी भुत आहे ? जनकरानी सनातन प्रभात वर माहिती असल्यास द्यावी व मार्गदर्शन करावे...कारन ends and means खुप वेला पटत नाही.... लहान (अक्षय)

बर्ट्रांड रसेलच्या In Praise of Idleness (१९३२) या निबंधाचे स्वैररुपांतर

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 19/08/2009 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या पिढीतील बरेचजण एक म्हण ऐकत लहानाचे मोठे झाले. ती अशी की 'सैतान आळशी हातांकरता काही ना काही उद्योग शोधत असतो'. मी एक अत्यंत गुणी मुलगा असल्यामुळे मी अशा ऐकलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत असे. यामुळे मला जी विवेकबुद्धी प्राप्त झाली तीमुळॆ मी आतापर्यंत सतत परिश्रम करत आलॊ आहे. माझ्या विवेकाने माझी कृती जरी नियंत्रित केली असली तरी माझी मते मात्र आता पूर्णपणे बदलून गेली आहेत. मला असे वाटते की, जगात अनावश्यक श्रम खूपच केले जातात. श्रमांना प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेमुळे मनुष्य स्वत:चे खूप नुकसान करून घेत आहे.

आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/08/2009 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रांनो ही स्पर्धा होती आमच्या आस्थापनात, ती तिथेच घेतली गेली आणि निकाल तिथेच जाहीर झाले. जर पुढेमागे आमची कंपनी केंद्र सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन चालवायला घेतली तर स्पर्धा महाराष्ट्रात, जाहिरात युपी/बिहारात, प्रत्येक्ष स्पर्धा कर्नाटकात व बक्षिसवितरण समारंभ दिल्लीत वगैरे होऊन ह्याला "*** गांधी पुरस्कॄत क्युबिकल डेकोरेशन स्पर्धा " असे नाव दिले जाऊ शकते ... ( कोणीतरी विचारत होता की मिपावर निकाल जाहीर झाले का म्हणुन तर त्याला हे उत्तर समजावे.

तुम आ गए हो नूर आ गया है ...अर्थात्, गुलझारची पंचाहत्तरी!

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 19/08/2009 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलझार आज पंचाहत्तर वर्षांचे झाले. त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा!

पावसाळी भटकंती

लेखक प्रभो यांनी बुधवार, 19/08/2009 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपा वरचा माझा पहिलाच लेख. असं काहि मि फार काहि लिहित नाही...(खरं सांगयच तर २-४ चारोळया सोडुन कधी काहीच लिहिलं नाही) आसो....महान लोकानी सांगितलय कि स्वताची जास्त लाल करू नये... साधारण २ महिन्यांपुर्वी मी मिपावर साभासद होण्यासाठी निवेदन दिले होते....आमचे परममित्र टारझन हयांच्या मदतीने मिपा वर येउन (अरे बस कर आता).... हा माझा पहिलाच दिवस.... चला माहीती भरपूर झाली ....

सही रे सही -भाग १

लेखक राजा रानडे यांनी मंगळवार, 18/08/2009 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी रामदास यांच्या हापीसात गेलो होतो. बोलता बोलता रामदास यांनी माझा सह्यांचा संग्रह मिसळपाव वर प्रकाशीत करण्याचा मनसुबा प्रगट केला. (रामदास यांनी श्रीनिवास विनायक कुळकर्णींच्या हस्ताक्षराचा नमुना हरवला होता इथून विषयाला सुरुवात झाली.)मध्यंतरी कामाच्या गडबडीत मी पण विसरलो होतो.गेल्या शनिवारी भेट झाली तेव्हा हरदासाची कथा मूळपदावर आली.सही रे सहीचा हा पहीला भाग तुमच्या समोर ठेवतो आहे.

जीवधन आणि नाणेघाट...

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 18/08/2009 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा चौघांचा (मी, यशदीप, शिऱ्या आणि सम्या) जीवधनला जायचा बेत पक्का झाला. एका शनीवारी पुण्याहून जून्नरला पोचलो तेव्हा सकाळचे ९.३० वाजले होते. घाटघरला जाणारी बस लागली होती पण सुटायला अजून जरा वेळ होता. मग बसस्टँडच्या जवळच मिसळपाव आणि चहा उरकून बस मधे बसलो. बस सुरु झाली आणि थोड्याच वेळात चावंड किल्ल्याला फेरी घालून पुढे निघाली. आता दोन्ही बाजूला नुसते उघडे-बोडके डोंगर दिसत होते. डोंगर म्हणजे नुसता काळा कातळ आणि त्याच्या तळात थोडी झाडी. जरा वेगळ्याच जगात घुसल्या सारखं वाटू लागलं. साधारण १ तासात घाटघरला पोचलो.

मर्मबंधातली ठेव ही...

लेखक अन्वय यांनी मंगळवार, 18/08/2009 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतातील प्रत्येक रागाला एक नादप्रकृती असते. त्यातून भावनिर्मिती होते. मानवी भावनेला घट्ट कवटाळण्याचे विलक्षण सामर्थ्य यात असते. जसा यमनकल्याण आर्जवी, गोरख कल्याणमध्ये प्रासादिक तर भैरवीमध्ये समर्पण भाव आहे. या रागांतील प्रत्येक स्वर आणि त्याचा नाद माणसाच्या अंतरंगात त्या त्या भावनांचे तरंग उमटवितो. असाच पटदीप हा वियोगाची भावना व्यक्त करणारा राग आहे. मात्र ही भावना तो आक्रस्ताळेपणाने मांडत नाही. आपले गाऱ्हाणे तो कळकळीने सांगतो; पण वेदनेत अडकूनही पडत नाही. मर्मबंधातली ठेव ही...