माझे रिकामपणाचे उद्योग....२ बुकमार्क्स...!!!!
माझे रिकामपणाचे उद्योग--- भाग १!!!
तसं पाहता गेलं तर माझं नी एखाद्या कलेचं एकदम वाकडं... म्हणजे एखादं काम करायला लागणारी नजाकत कशाशी खातात हेच माहीत नाही.. त्यामुळं आईच्या भाषेत माझ्याकडे एखादं नाजूक काम... म्हणजे फक्त 'धडा'चा विध्वंस!!!! नी याबाबतीत घरी तसंही कुणाचं दुमत नाही...
लहानपणी जेव्हा दूरचित्रवाणीवर फक्त दूरदर्शनचं राज्य होतं.... तेव्हा मोजकेच कार्यक्रम असायचे.. नि लोक कार्यक्रमाच्या वेळा सांभाळून आपली कामं करायचे... पुन:प्रक्षेपण पण तितकंसं व्हायचं नाही.. नि झालं तरी त्याच्या आगाऊ सूचना तर नसतच नसत....
मिसळपाव
विशाल.