Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२१ - संत साहित्यातील गणेश

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 10/09/2021 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश वंदनेने करण्याची आपल्या कडे परंपरा आहे. मग ती पूजा असो, कोणताही सांस्कृतीक कार्यक्रम असो गायन असो किंवा इतर कोणताही.

देवाक काळजी

लेखक भागो यांनी शुक्रवार, 10/09/2021 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
जगात देव आहे! निश्चितच आहे. हा पहा माझा स्वतःचा अनुभव! माझे बाबा असतील सत्तर – पंचाहत्तरीचे. त्यांचे खरं वय काय ते त्यांनाही माहीत नाही मग आम्हाला कसं माहीत असणार. आमच्या आजोबांनी बाबांचा पहिलीत प्रवेश घेताना त्यांची जन्मतारीख अशीच ठोकून दिली होती. बाबा नेहमी मला सांगायचे, “मी पहिलीत होतो तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले.” अश्या थाटात सांगायचे की बाबांनी शिकायचे मनावर घेतले त्यामुळे गदगदित होऊन राणीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य बहाल केले. ह्या वयातदेखील बाबा दवाखान्याची पायरी चढले नव्हते. जुने खोड! पण अलीकडे मी बघत होतो, बाबांना थोडं चाललं तरी थकवा येऊ लागला होता.

सण आणि आपण

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 09/09/2021 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
गौरी/ महालक्ष्मी चा सण येताहेत.. महाराष्ट्रात याचे फार महत्त्व.स्त्रीयांसाठी विशेष. हा एक प्रकारचा कुलाचार, कुलधर्म. तीन दिवसाचा. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरी/महालक्ष्मी चे आगमन व प्रतिष्ठापना असते.दुसरेदिवशी मुख्य पूजा व महा नैवेद्य .तिसरे व शेवटचे दिवशी निर्गमन. पुन्हा पुढील वर्षी येण्यासाठी. भारतीय संस्कृती मधे बहुतेक सणामागील हेतू मानवाचे निसर्गाशी असलेले नाते दृढ व्हावे,त्याची कृपा सदैव आपल्या वर राहावी,'त्याच्या' प्रति कृतज्ञता व्यक्त करावी हाच आहे असे म्हटले जाते.

महाराष्ट्रातील एकमेव रथोत्सव - तासगांव गणपती उत्सव (Tasgaon Rathotsav )

लेखक व्लॉगर पाटील यांनी गुरुवार, 09/09/2021 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपणाला घेऊन जातो आमच्या तासगावच्या प्रसिद्ध गणपती उत्सवाला. आपल्या स्पॉटवर च्या विडिओ च्या माध्यमातून आमच्या गावाच्या रथोत्सव तुम्हा सर्वा पर्यंत पोहचवत आहे. सातमजली गोपुरांचे आणि २४२ वर्षांची रथयात्रेची परंपरा लाभलेले तासगाव येथील गणेश मंदिर चांगलेच प्रसिद्ध आहे.

जरा याद करो कुर्बानी

लेखक सुनिल पाटकर यांनी गुरुवार, 09/09/2021 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
जरा याद करो कुर्बानी... शेतात राबणारे हात जेव्हा हातात लाठी घेतात. रानोमाळ भटकणारा आदिवासी जेव्हा संघटित होऊन पेटतो, तेव्हा मोठी आंदोलने उभी राहतात. मग ही आंदोलने स्वातंत्र्यपूर्व काळातील असो कि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची !. ब्रिटिश सरकारला चले जाव असे ठणकावून सांगणारा महाडचा किसान मोर्चा हा त्यातील एक. ब्रिटीश साम्राज्याला हादरवून सोडणारे आणि ब्रिटिश सरकारला मोठा धक्का देणारा हे आंदोलन आजही प्रेरणादायी आहे. काय होते हे आंदोलन कशासाठी होते हे आंदोलन असे प्रश्न नव्या पिढीला सहाजिकच पडणारे आहेत.

संस्कार

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 08/09/2021 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांना संस्कार पालकांचे कर्तव्य पालकांवर संस्कार मुलाचे कर्तव्य !! वय वाढलं म्हणजे अक्कल येतेच असं नाही दर वेळी बचावाला वकिल येतोच असे नाही ब्राम्हणांविषयी बापाचे अपशब्द नशिबाने विवेकी मुलगा उपलब्ध मुलगा CM भूपेश 'बघेल' बाप नंदकुमार ला जेल!! https://www.lokmat.com/crime/chief-minister-bhupesh-baghels-father-arre… मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक, देशातील पहिलीच घटना
काव्यरस

ऐका जामातो देवा तुमची कहाणी

लेखक सौन्दर्य यांनी मंगळवार, 07/09/2021 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका जामातो देवा तुमची कहाणी, आटपाट नगर होते, तेथे एक शिक्षक कुटुंब राहत होते. त्यांना एक मदनबाण नामक पुत्र होता. पुत्रासाठी खस्ता खाऊन त्यांनी त्याला शिक्षण दिले. वयात येताच पुत्राने काय करावे तर माता-पित्याची इच्छा डावलून आपल्या मनपसंत कन्येशी विवाह करावा. विवाहाच्या काही दिवसांतच गृहकलह उत्पन्न झाला. सासू-सुनेचे वाद-विवाद होऊ लागले, त्यात पती भरडला जाऊ लागला. एके दिवशी सून आपल्या पतीचा हात धरून आपल्या माहेरी निघून गेली. काही काळ बरा गेला, नंतर काय होऊ लागले, तर श्वशुरगृही जामाताचा मान कमी-कमी होऊ लागला, ‘जामातो दशम ग्रहम’ सारखी वाक्ये कानी पडू लागली.

मंदिराचा मालक देव, पुजारी केवळ नोकर (मध्यप्रदेश कोर्टाचा निर्णय)

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 07/09/2021 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिराची मालमत्ता तिथे देवाची सत्ता विकायचा विचार कसा करे नोकर पुजारी केवळ सेवक मालक असतो देवक पुजा-याला नाही जमीननोंदी कोर्टाने केले स्पष्ट तोंडी वापरकर्ता या रकान्यातही लिहिण्याची नाही गरज, मध्यप्रदेश कोर्टाने पुजा-यांचा अर्ज केला खारीज OMG चा हा जणू पुढील भाग न खात्या देवाचा नैवेद्य च नव्हे तर भुखंडाचे श्रीखंड ही खाण्याला कोर्टाची चपराक. https://www.loksatta.com/desh-videsh-news/temple-property-deity-pujari-…
काव्यरस

प्रवास कसला? फरफट अवघी!

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 07/09/2021 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक आर्त काव्य , सलील कुलकर्णी ( कवी माहित नाही बहुतेक संदीप खरे किंवा सुधीर मोघे ) https://www.youtube.com/watch?v=xyHtnZW0dNA अजुन उजाडत नाही ग! दशकामागून सरली दशके अन् शतकाच्या गाथा ग! ना वाटाचा मोह सुटे वा ना मोहांच्या वाटा ग! पथ चकव्याचा, गोल, सरळ वा कुणास उमगत नाही ग प्रवास कसला? फरफट अवघी! पान जळातून वाही ग... कधी वाटते 'दिवस'-'रात्र' हे नसते काही असले ग त्यांच्यालेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग स्पर्श आंधळे. गंध आंधळे भवताली वनराई ग तमातली भेसुर शांतता...
काव्यरस