Skip to main content

जेवण

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 01/03/2010 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
या. आज उशीरा आलात मास्तर. तिकडे नको इकडे बसा की पलंगावर. पंख्याचा वाराही येतो तिथं. लवकर काय अन उशीरा काय? घरी एकट्या असणार्‍याला वेळेचे काय? आसं कसं वेळेवर जेवण झालं ठिक असते प्रकृतीला. सगळ्या गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजे. तुमचे बरोबर आहे हो. पण वेळेआधी जेवले म्हणजे सगळाच प्रॉब्लेम. अन बाकीचे मेंबरं पण काय म्हणतील? बाकीचे मेंबरं काय हो, गप जेवतात अन जातात. तुमचे कसे सगळे वेगळेच आहे. म्हणून तर मी तुम्हाला निरनिराळे पदार्थ देते, खावू घालते. इतरांना देत नाही असले काही. अहो, तुमच्याकडे आम्ही काय जेवायला येतो का नुसते? पोट पुर्ण भरले तरच जेवणाची मजा आहे.

जीवनाश्यक गोष्टी..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 28/02/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, येथे आपापल्या जीवनावश्यक गोष्टींची यादी प्रत्येकाने देणे अपेक्षित आहे.. माझ्यापासून सुरवात करतो. आपणही अवश्य सांगा - मधुबाला, लता, किशोरदा, यमन, भीमण्णा, बाबूजी, पुलं, कुसुमाग्रज, सचिनदा, पंचमदा, शोले, हृषिदा, गुलजार, मदनमोहन, मिसळ, मासळीचं जेवण, श्रीखंड, पान-चुना-तंबाखू... या माझ्याकरता जीवनावश्यक गोष्टी आहेत.. आपल्याही अवश्य सांगा.. :) सर्वांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा! तात्या.

लावणी - खास होळी निमित्त

लेखक sur_nair यांनी रविवार, 28/02/2010 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
गेली संक्रांत आली बाई होळी हो नाही काही तुमचा पता कुणासंग पंचीम रंगाची मी खेळू हो सन भाग्याचा, आहे फार मोठा घरला या धनी, राग आता सोडा तुम्हांसाठी केली, पुरणाची पोळी हो दिस उन्हाळी, सोसवेना उन किती पुसावं, घामाघूम अंग आग लावी राती, चंदनाची चोळी हो तुमच्याविना शेज, सुनी सुनी लागे विझली होळी अन, राख उरं मागे, रोज खुणविते, चंद्रकोर भाळी हो ही लावणी मीराबाईंच्या " केनो संग खेलू होरी, पिया त्यज गये है अकेली" या वरून स्फुरली.
काव्यरस

राजगड... गुंजवणे दरवाज्याने

लेखक विमुक्त यांनी रविवार, 28/02/2010 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
गोनीदा म्हणतात तसं "राजाचा गड आणि गडांचा राजा म्हणजे राजगड" राजगडावर जायला वाटा अनेक... पालीहून पाली दरवाज्याने... वाजेघरहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने... गुंजवण्याहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने... गुंजवण्याहून गुंजवणे (गुंजण) दरवाज्याने... गुंजवण्याहून सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने... भुतोंड्याहून अळू दरवाज्याने... पैकी पाली दरवाजा, अळू दरवाजा आणि पद्मावती माचीवरचा चोर दरवाजा ह्या वाटा आता वापरात आहेत... सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने तर आता कुणीच चढत नाही आणि गुंजवणे दरवाज्याने सुध्दा फारसं कुणी जात नाही...

बांगड्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 28/02/2010 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
नगरला लहानपणी वाड्या मधे कासार यायचा..पाठीवर पेटारा असायचा... आत रंगी बेरंगी बांगड्या..आला कि मजेदार आरोळी द्यायचा...बांगड्या घ्या बांगड्या ..बायकाना विकत..पुरुषाना फुकट..असे एकले की आम्ही मुले हसायचो...आज आठवले कि त्याच्या त्या स्लोगन च्या कल्पकतेची मजा वाटते.

पंख

लेखक sur_nair यांनी रविवार, 28/02/2010 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
पंख
उडता उडता एकदा एक राघू झाडाच्या एका फांदीवर येऊन बसतो हिरवट पिवळ्या पिकल्या पेरूला आपल्या लालबुंद चोचीने कोरु लागतो तोच एक आवाज येतो, "सावध सावध लबाड काळ्या बोक्यापासून जरा जपून रहा" राघू पाहतो , अंगणातल्या पिंजऱ्यात पोपट दिसतो म्हणतो "धन्यवाद मित्रा, आहेस तू कसा " पोपट म्हणतो "एकदम झकास, ताज्या हिरव्या मिरच्या, पेरूच्या गोड फोडी, पिंजऱ्यातला या आयुष्याची तुला काय म्ह
काव्यरस

चिली मधे भूकंप, त्सुनामीची भीती

लेखक मुक्तसुनीत यांनी शनिवार, 27/02/2010 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
सीएनेन ची बातमी : http://www.cnn.com/2010/WORLD/americas/02/27/chile.quake/index.html?hpt… जिवितहानीची आकडेवारी आणि अन्य बातम्या अजूनही हळुहळू येत आहेत. मृतांना श्रद्धांजली. जखमींबद्दल प्रार्थना. पॅसिफिक बेसीनच्या प्रदेशामधे त्सुनामीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गृहप्रवेश

लेखक स्मृती यांनी शनिवार, 27/02/2010 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
"पसंत आहे हं आमच्या जयला तुमची लेक" आईंचा फोन आला आणि आमच्या घरचं वातावरण एकदाचं मोकळं झालं. दहा-बारा मुलगे बघितल्यावर आपल्या नकटीला हा जयदीप चित्रे पसंत पडलाय तर आता त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळतोय की नाही या चिंतेत आई बाबा होते. त्या रात्री काही मला झोप म्हणून लागली नाही. आपलं लग्न होणार आता, म्हणजे नवीन घरात रहायला जायचं, दिवसाचं रूटीन पुर्णपणे बदलणार. आई, बाबा, चिनूला भेटायला परवानग्या काढाव्या लागतील की काय?!... आणि मुख्य म्हणजे हा प्राणी जयदीप.. तसा त्या दिवशी बरा वाटला.. सुलझा हुआ, डिसेंट, लेव्हल हेडेड वगैरे वगैरे, पण खरंच तसा असेल ना??...

जरा मदत करा हो.....

लेखक अनंत छंदी यांनी शनिवार, 27/02/2010 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो... गेले काही दिवस मी एका समस्येने त्रस्त झालो आहे. माझ्या संगणकात smitfraud-c.gp हा विषाणू एसव्हीसीहोस्ट.एक्सई ह्या फाईलला चिकटला आहे, अनेक उपाय केले पण तो जात नाही. स्पायबॉटने काढून टाकला तरी पुन्हा येतो आणि इतर फाईल्सना चिकटायला सुरुवात करतो. काय करावे. जरा मदत करा! :(