अपरिचीत किल्ले: अनघई आणि म्रुगगड
सफर अपरिचीत किल्ल्यांची: अनघई आणि म्रुगगड
आमची जोडी तशी ठरलेलीच. मी आणि सुजीत साठे. एकदा ट्रेकला जायचं ठरलं कि फारसं कोणाला न विचारता बाईक काढतो आणि सुटतो. या वेळी सफर करायची होती दोन अपरिचीत किल्ल्यांची ते म्हणजे अनघई आणि म्रुगगड. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन थोडे वेगळे झालेले आणि नेहमीच्या हौशी ट्रेकर्सपासुन जरा दुर्लक्षिलेले असे हे किल्ले.
शनिवारी पहाटे बाईक काढ्ली. पनवेल, खालापुर मार्गे जांभुळपाड्यापासुन ५ कि.मि. असलेल्या कळंब गावात आलो. कळंब गाव तसं लहानच. ४०-५० घर असावीत जेमतेम.
मिसळपाव