नंदाच्याई
नंदाच्याई...
आम्ही लहानपणापासून त्यांना "नंदाच्याई'च म्हणत आलो.
त्यांच्या मुलीचं नाव "नंदा', म्हणून त्यांना "नंदाच्या आई' असं नाव पडलं, हे आम्हाला खूप उशीरा कळलं.
आमच्या शेजारीच राहायच्या त्या. अगदी घरासमोरच. आमच्या आवाराच्या मालकांनी दोन खोल्यांची जागा या आखाडे कुटुंबाला राहायला दिली होती. नंदाचे बाबा- म्हणजे नंदाच्याईंचे पती- हमाली करायचे. त्यांची स्वतःची हातगाडी होती. (हातगाडी म्हणजे दोन चाकांची, एका बाजूने ओढायची लांबलचक लाकडी गाडी. त्यावर माल ठेवून ओढून नेतात.
मिसळपाव
