गाथा इराणी
नमस्कार मंडळी,
परवाच पुण्यातून -पक्षी क्रॉसवर्ड मधून पुस्तक खरेदी झाली.
त्यात मीना प्रभु यांचे "गाथा इराणी " हे पुस्तक देखील खरेदी केले.
मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक(कंटेंट) अतिशय देखणे झाले आहे. नेहमीप्रमाणे मीना प्रभुंची लेखणी सुंदरच बरसलि आहेच.
परंतु वाचता वाचता असे लक्षात आले कि पुस्तकातील मधली बरीचशी पाने गायब आहेत.
काहि पानांचा क्रम वाट्टेल तसा आहे. कशाचा कशालाहि काही ताळमेळ नाही.
पुस्तकाची किंमत ३०० रुपये असल्याने चिडचिड झाली. क्रॉसवर्डवाल्याला फोन केला तर त्याने चक्क कानावर हात ठेवले.
एकदा विकलेले पुस्तक आम्ही बदलून देत नाहि.
मिसळपाव