Skip to main content

कृपया पादत्राणे बाहेर ठेवावीत

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी सोमवार, 28/06/2010 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
टिव्ही मालिकांमध्ये नेहमी पाहिले जाते, सर्व कलाकार चप्पल बूट घालूनच घरात वावरतात. याचे नक्की कारण कळेल काय ? हिंदी मालिकांचे अनुकरण करुन राठी मालिकांमध्येही ही सवय वाढत आहे असे दिसते.

कृष्णा नी बेगने..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 28/06/2010 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा नी बेगने..(येथे ऐका) (हे माझं रसग्रहण हे मूलत: गाण्याच्या सांगीतिक भागावर आहे..काही वर्षांपूर्वी एकदा अण्णांशी निवांतपणे संवाद साधायची संधी मिळाली होती.. बोलताना अण्णांनी मला 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' आणि 'कृष्णा नी बेगने..' या कन्नड गाण्यांचा मराठीत अर्थ समजावून सांगितला होता, तो पुसटसा आठवतो आहे, तसा लिहितो आहे. येथे कुणी कन्नड जाणणारा/जाणणारी असल्यास मी जे कानडी शब्द लिहिले आहेत, आणि पदाचा जो अर्थ लिहिला आहे त्यात अवश्य सुधारणा करावी.

रिक्षावाले काका

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 28/06/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
''दीपक, खाली ये रे! '' रिक्षावाले काका रस्त्यावरून जोरदार हाळी देतात. शून्य प्रतिसाद. दोन मिनिटांनी पुन्हा एक हाक, ''ए दीपक, चल लवकर! '' दीपकच्या आईचा अस्फुट आवाज, ''हो, हो, येतोय तो! जरा थांबा! '' पुन्हा पाच मिनिटे तशीच जातात. ''ए दीपक, आरं लवकर ये रं बाबा, बाकीची पोरं खोळंबल्याती! '' रिक्षाचा हॉर्न दोन-तीनदा कर्कश्श आवाजात केकाटतो आणि रिक्षावाल्या काकांच्या हाकेची पट्टीही वर चढते. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या छोट्या दीपकची रोज शाळेच्या वेळेला येणाऱ्या रिक्षाकाकांच्या हाकांना न जुमानता आपल्याच वेळेत खाली येण्याची पद्धत मला खरंच अचंबित करते.

आस “ नाविन्याची “

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 28/06/2010 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
“मरण “ मरणापेक्षाही महाग तीन दिवसापूर्वी “सकाळ “ला लेख वाचला. मरणोत्तर अफाट खर्चा संबंधी……………….. आस “ नाविन्याची “ भोगिले आकंठ जीवना, नाविन्य काहीच आता ना राहिले, उपभोगण्या मृत्यो तुला, इतुकेच होते राहिले.

मासे - बोंबिल

लेखक जागु यांनी सोमवार, 28/06/2010 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे आहेत बोंबिल कालवणाचे साहित्य : १ ते २ वाटे बोंबील ( डोके व शेपटी कापुन, स्वच्छ करुन.) लसूण - ८-१० पाकळ्या ठेचुन हिंग, हळद १ ते २ चमचे मसाला चिंचेचा कोळ चविपुरते मिठ १ मिरची मोडून थोडी कोथिंबीर तेल. कालवणाची कृती : तेलावर लसणाची फोडणी द्यायची मग त्यावर हिंग, हळद, मसाला, चिंचेचा कोळ टाकुन बोंबील टाकायचे. गॅस बारिक ठेवायचा. गॅस मोठा केला की बोंबील तुटतात. मग उकळी आली की त्यात मिठ, मोडलेली मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालायची. व २ ते ३ मिनीटांत गॅस बंद करायचा.

सायना नेहवालचे अभिनंदन

लेखक अप्पा जोगळेकर यांनी सोमवार, 28/06/2010 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
सायना नेहवालने इंडियन ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ओपन (पैकी शेवटच्या दोन मागच्या एकाच आठवड्यात) अशा सलग तीन सुपर सीरीज जिंकून भारताची मान उंचावली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. खुट्ट झालं तरी त्या सवंग सानिया मिर्झाला प्रसिद्धी देणारी भारतीय माध्यमे गुणी, सिन्सिअर आणि मेहनती सायनाला देखील सध्या बर्‍यापैकी स्पेस देत आहेत हे पाहून आनंद होतो आहे. कालची मॅच ज्यांना पाहायला मिळाली ते भाग्यवान. आपले जे. पी. मॉर्गन सायनावर कधी लिहिणार याची वाट पाहतो आहे. - बॅडमिंटनप्रेमी अप्पा

कालू कौआ

लेखक सहज यांनी सोमवार, 28/06/2010 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या भारत दौर्‍यात बायकोच्या लहानपणची काही आवडती पुस्तके, कॉमिक्स आवराआवरीत सासुबाईंना हाती लागली व लगेच आजीने ती वाचायला पाठवली. विकांताला वाचायची ड्युटी करता करता "बबन हजाम" नावाच्या एका धमाल बालकथा पुस्तकात एक छान सुंदर कविता दिसली. एकाच वेळी लहान मुलांना व मोठ्यांना (मस्त संदर्भ लागून) आवडणारी ही कविता तुमच्यासमोर मांडायचीच असे ठरवले. कवयित्री आहेत श्रीमती अनुपा लाल.
काव्यरस