पॅराडाइज नाऊ
नॅब्लूस हे पॆलेस्टाईनमधील एक शहर. सैद आणि खालेद हे त्या शहरात एकत्र वाढलेले जिवाभावाचे मित्र. सुहा ही सैदची मैत्रीण. तिचे वडील इस्रायलविरुद्धच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेले. परंतु पॅलेस्टाईनबाहेर वाढलेली सुहा आहे मध्यममार्गी!
मूळात मोटर मेकॅनिक असलेल्या सैद आणि खालेद यांची तेल अवीववर आत्मघातकी हल्ला करण्याच्या मोहिमेवर निवड होते. मोहिमेला निघण्यापूर्वीचा शेवटचा दिवस ते आपल्या कुटुंबियांसमवेत घालवतात, त्यांना ह्या मोहिमेबद्दल कसलीही चाहूल लागू न देता! सैदला सुहाच्या शांतताप्रिय, मध्यमार्गी विचारांचा अंदाज येतो.
मिसळपाव