Skip to main content

पॅराडाइज नाऊ

लेखक सुनील यांनी रविवार, 05/09/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
नॅब्लूस हे पॆलेस्टाईनमधील एक शहर. सैद आणि खालेद हे त्या शहरात एकत्र वाढलेले जिवाभावाचे मित्र. सुहा ही सैदची मैत्रीण. तिचे वडील इस्रायलविरुद्धच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेले. परंतु पॅलेस्टाईनबाहेर वाढलेली सुहा आहे मध्यममार्गी! मूळात मोटर मेकॅनिक असलेल्या सैद आणि खालेद यांची तेल अवीववर आत्मघातकी हल्ला करण्याच्या मोहिमेवर निवड होते. मोहिमेला निघण्यापूर्वीचा शेवटचा दिवस ते आपल्या कुटुंबियांसमवेत घालवतात, त्यांना ह्या मोहिमेबद्दल कसलीही चाहूल लागू न देता! सैदला सुहाच्या शांतताप्रिय, मध्यमार्गी विचारांचा अंदाज येतो.

झुंजु-मुंजू

लेखक अरुण वडुलेकर यांनी रविवार, 05/09/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
"आई....! ए, आऽई!! लेकीची दबकी हांक कानावर आली तसा मंगलाबाईंचा डोळा उघडला पण पुरती जाग आली नव्हती. ’सकाळ झाली की काय!’ म्हणून नजर खिडकीवरल्या झरोक्याकडे गेली तो अजून काळोख गडदच होता. सरत्या ग्रीष्मातली रात्र तशी फार मोठी नसली तरी उजाडायला एखादी अजून घटका तरी जायला हवी होती. हे असं काहीसं भान जाणवतं न जाणवतं तोच पुन्हा एक दबकी हाक! पण या वेळी कणभर कण्हल्यासारखी. पुढ्यातच झोपलेल्या लेकीच्या पाठीवर त्यांचा हात गेला आणि तसाच तो आभावितपणे तिच्या कपाळावरही गेला. "काय गं? काय होतंय?" "आईऽऽ, पोऽऽऽट...." "दुखतंय?" "हंऽ!!" "बरं.

शिक्षकांची परवड

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 05/09/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
'मास्तर उंद्या तुमच्या नावानं बैलपोळा हाय म्हंत्यात नव्हं?' असं आम्ही आमच्या गुरुजींना बेधडक विचारु शकत होतो. आता काळ बदलला. शाळा हायटेक झाल्या. चुरगाळलेल्या पायजम्यातले मास्तर कडक इस्त्रीचे सर झाले. पोरंही बदलली. ओबिडिएन्ट झाली. टीचर्स डे मोठ्या दिमाखात साजरा होऊ लागला. ती हक्काची सुट्टीदेखील कार्यक्रमांच्या रेलचेलीत लुप्त होऊ लागली. मुले आपापल्या आवडत्या सरांना मॅडमना फुले देत जातात. ते हसून स्विकारण्यापलिकडे ते काय करु शकतात? एका डोळ्यात हसू दुसऱ्‍यात आसू घेऊन बिचारे गुरुजन आला दिन ढकलतांना आढळतात. पेपरवरच्या फुल्यांची जागा स्टार्सनी घेतली.

वाक्याचा अर्थ सांगाल का?

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 05/09/2010 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
A xyz family's peace rests on the lack of sexual tension within it;it is an oasis from the lusts of the world. हे वाक्य 'Maximum City' ह्या सुकेतु मेहतालिखित पुस्तकातील आहे.अधोरीखित शब्द एका हिंदु समाजाबद्दल असल्याने बदलला आहे. Oasis :1. a fertile place in a desert where water rises to ground level 2.a pleasant area or period in the midst of difficult situation. सौजन्य : माझ्या मोबाईलमधील ऑक्सफर्ड डीक्शनरी. हींदी अर्थ, 1. शाद्वल 2.
काव्यरस

नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 05/09/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
भाग्य दिसते जे समोरी ते मला लाभेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? नाहि दिसली ती कधी मग भेटणे अमुचे कुठे? भाबड्या जीवास का मग आतुनी आशा फुटे? काय पडली भूल ही माझ्या मना उमगेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? का सकाळी भास होतो पैंजणांचा अंगणी? अन् चुलीच्या जवळ वाजे काकणांची किणकिणी चिमूटभर त्या कुंकवाचे भाग्य मग उजळेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का? मांडले शब्दात मी ह्रदयात जे हुंकारले फक्त आशा एक की मजला दिसावी पाउले या मनीचे हे मनोगत त्या मनी पोचेल का? नाव माझे याच नावाच्या पुढे लागेल का?
काव्यरस

बुद्ध व बौद्ध धर्म ..एक टिपणी

लेखक शरद यांनी रविवार, 05/09/2010 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्ध आणि बौद्धधर्म ... एक टिपणी (१) बुद्ध आणि चातुर्वर्ण (अ) प्रथम बुद्ध एका ब्राह्मणीच्या उदरात जन्म घेतो; पण " भीक मागणार्‍या जातीत बुद्धाचा जन्म नको" म्हणून तो गर्भ तेथून काढून एका क्षत्रिय राणीच्या उदरात ठेवण्यात येतो. (आ) बुद्धाला आपल्या क्षत्रिय जातीच्वा अभिमान होता. त्या काळी क्षत्रिय ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ट मानला जाई.

आपणाला दुसर्‍याचा व्यवसाय आवडतो का?

लेखक आप्पा यांनी रविवार, 05/09/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सध्या मिपावर खुप गहन चर्चा चालु आहेत. त्यात थोडी करमणुक म्हणा किंवा बदल म्हणा. एक वेगळा विषय. बर्‍याच दिवसांनी पुलंचे हसवणूक हे पुस्तक परत एकदा वाचण्यात आले. पहिलीच कथा वाचली व हा विषय सुचला. कथेचे नाव आहे आमचा धंदा एक विलापिका. लेखकांनी काही व्यावसायीकांच्या मुलाखती घेतल्या व ते जो व्यवसाय करतात त्याबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन त्यांनी निष्कर्ष काढला, जो ज्या धंद्यात आहे, तिथे तो काही सुखात नाही, आणी सगळ्यांना शेजार्‍याच्या बायकोसारखा दुसर्‍याचा धंदा अधिक चांगला वाटतो. अर्थात हा पुलंचा लेख आहे. थोडे चिमटे काढत, थोडा विचार करायला लावणारा. आपणही विचार मांडा.

भारत माझा देश आहे...........

लेखक संदीप परांजपे यांनी रविवार, 05/09/2010 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
धन्य माझा भारत देश, आणि धन्य इथले लोक दुसरयाला लावतात ठिगळं, पण स्वतःच्या खिशाला भोक तूरडाळ भिडली गगनाला, सिमकार्ड फुकट गावतंय ह्यांच्या बापसाची स्वप्नपूर्ती, पोरांचं उगाचंच फावतंय ए.सी. शोरूममध्ये, पायीची वहाण ,बसली शेल्फावरी, फळं आणि भाज्या, आजही बसलेत, विकत रस्त्यावरी.. कारण.. पिइझा पोचतोय वेळेत पण पोलिस येतात लेट कारण त्यांचा कोणीच ठरवला नाही, वेळेत येण्याचा रेट तंत्रद्यान पोचले घरोघरी, मोबाईलमध्ये टी.व्ही. अन नेट घरच्यांसाठी वेळ नाही पण विसरत नाहीत क्रिकेट...