शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा
शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा
शिंगे घासली
बाशींगे लावली
माढूळी बांधली
म्होरकी आवळली
तोडे चढविले
कासरा ओढला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||१||
गोंडे बांधले
वेसनी घातल्या
छमच्या गाठल्या
चवर ढाळली
शिक्के उठविले
गेरू फासला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||२||
नाव लिहीले
झेंडूहार घातला
झुली चढविल्या
पैंजण घातले
पट्टा आवळला
फुगे बांधले
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बै
काव्यरस
मिसळपाव
हा आहे डेलीया माझ्या बागेतील नविनच पाहूणा. आमच्या जवळच्याच नर्सरीतुन घेतला. ह्यामध्ये मला पिवळा किरमिजी रंगही दिसला.