" मनांतले श्लोक - "
तुझे रूप साधे किती गोजिरे रे
तुला लोचनी साठवू साजिरे रे
असावा जसा वाटतो तू तसा रे
धनी - निर्धनी दर्शना येती सारे ।१।
जिथे जाउ साई तिथे ती असावी
सुखी सावली सोबतीला असावी
कुठेही कधीही कशीही दिसावी
तुझी मूर्ति साधीच नयनी ठसावी ।२।
न गर्वात , सर्वात मिसळून राही
न जाती , न धर्मात गुंतून राही
गरीबात रावात देवास पाही
असा देव साईविना कोणि नाही ।३।
धना - कांचनाचा भुकेला न साई
न लोभास मोहास स्वाधीन होई
जयांना कळेना कसा देव साई
तयांना कळू दे असा देव साई ।४।
’ सबूरी नि श्रध्दा ’ - शिकवण न स्मरणी
मनीं अंधश्रध्दा - फळाची दिवाणी
जमेना कुणाला फकीरी रहाणी
रुचेना कुणाला सदाचार वाणी ।५।
चढाओढ परदेशवारीत कोण
काव्यरस
बाणाची कादंबरी
शुद्रक राजाचा दरबार भरलेला असतो.
अनेक दरबाराची कामे चालु असतांनाच एक चांडाळाची मुलगी दरबारात पोपट घेऊन येते. हा पोपट साधासुधा नसतो तर चक्क मानवी वाणीने बोलणारा पोपट असतो. ती चांडालकन्या पोपट राजाला भेट म्हणुन देते. शुद्रकाला पोपटाविषयी खुप कुतुहल वाटुन तो त्याला त्याची हकिगत विचारतो. तेव्हा तो पोपट त्याची दु:खद कहाणी सांगतो.
विंध्यारण्यातील एका मोठ्या वृक्षावर तो आणि त्याचे वडील रहात असतात. त्याच झाडावर त्याचे अनेक सगेसोयरे रहात असतात. पोपटाची आई लहानपणीच वारल्याने त्याच्या वडीलांनीच त्याचा संभाळ केलेला असतो.
कथा: चंद्या सख्याची सहल
कथा: चंद्या सख्याची सहल
चंद्या आन सखाराम दोघं जिगरी दोस्त हुते. शाळंत जायचं बरूबर. इटीदांडू खेळायचं बरूबर. त्याल, साकर, बा ची तमाखू, इडी आनाया गावात बरूबर जात. सकाळची शाळा सुटली म्हंजे संगच दोघांच्या बकर्या बरूबर चरायला रानात न्येत आसत. चंद्याच्या ५ आन सख्याच्या ८ बकर्या व्हत्या. रानात जातांनाबी त्ये मजा करत जात. कुनाच्या बांधावरच्या बोरी झोडपाया थांबत तर कधी कुनाच्या उसात शिरून मनगटाएवढा जाड उस तोडून खायाला सुरुवात करत.
शेळ्या घेवून तसं त्ये मदुनच माळावरनं जात. तिथं थोड्या येड्या बाभळी व्हत्या.अवचित....
प्रत्येक ट्रेकमध्ये एक क्षण असा येतो की आपण सारे काही विसरतो, कोणतेही प्रश्न तेव्हा आठवत नाहीत, सुख-दु:ख सार्याचा विसर पडतो. तो एक क्षण जगण्यासाठीच तर ही ट्रेकची सारी धडपड असते. अवचित गडाच्या चढाईमध्ये तो क्षण इतक्या लौकर येईल असे मात्र वाटले नव्हते.
अजूनही गर्द रानाने वेढलेला अवचितगड कोकणात रोह्याच्या जवळ आहे. पुण्याहून रोह्याला जायला ४ तास लागतात. तिथून पुढे पिंगळसई किंवा मेढा या गावी यावे. या दोनही गावातून पायवाट गडावर जाते. कोकण रेल्वे या गडाला अगदी बिलगून जाते.
आम्ही पिंगळसईला साधारणपणे ११ वाजता पोचलो.
विनोबा....
फार पूर्वी एका सर्वोदय मासिकासाठी काही रेखाचित्रे काढली होती. (ती प्रकाशित झाली नाहीत हा भाग वेगळा)
पण राघव म्हणाला तसे cross hatching technique इथे वापरले होते. याने थोडा 3D effect आणता येतो. माझा हा कदाचित पहीला अणि शेवटचाच प्रयत्न असावा. परत चालू करावा वाटतो पण इच्छाशक्ती कमी पडते.
मुहब्बत में ताज छुटे...
देवानंदच्या "तेरे घर के सामने" ह्या चित्रपटात एक सुरेख गाणे आहे -
मुहब्बत में ताज बनें, ये भी तुम्हे याद होगा
मुहब्बत में ताज छुटे, ये भी तुम्हे याद होगा
अशा मुहब्बतीत बनलेल्या ताजबद्दल पुष्कळ काही लिहिले गेले आहे पण मुहब्बतीत सुटलेल्या, सोडाव्या लागलेल्या राजमुकुटाविषयी फारसे लिहिले गेलेले नाही.
मिपाकर रामदासांनी त्यांच्या प्रिन्सीच्या कथेत वॉलिस सिंप्सन ह्यांचा ओझरता उल्लेख केला आहे...
वॉलिस सिंप्सन ही अमेरिकन सौंदर्यवती.
स्वातंत्र्योत्तर भारत
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या विकासाठी स्वप्न प्रत्येकाने पाहिले. त्यानुसार दिशा आखण्याचा प्रयत्नदेखील नंतरच्या काळात होत गेला. पंडित नेहरूंनी धरणे, पोलाद कारखाने व उच्च अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांची निर्मीती करण्यावर भर दिला. इंदिरा गांधींनीं लहान गावांपर्यंत बँका नेल्या. हरिक्रांतीचा मार्ग दाखविला. राजीव गांधीनीं संगणक, दळणवळण क्षेत्रात क्रांती केली. देश आधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू लागला. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाला. जीवनाश्यक वस्तुंची कमी झाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून खेडी एकमेकांशी जोडली.
मिसळपाव