इसवी सन ३०१०
भाषा सतत बदलत असते असे म्हणतात. ज्ञानेश्वरांची भाषा ते तुकारामाची, रामदासांची भाषा ते आगरकर, सावरकर, पुल ते आज आपण तुम्ही आम्ही बोलतो ती भाषा.. सतत बदल झाला आहे, होईल. नव नवे शब्द दुसर्या भाषेतले येतात, येतील, नवे शब्द तयार होतात, होतील. वीस वर्षांनी वळुन पाहिले की भाषा खुप बदललेली दिसते. मी इथे फक्त प्रमाणभाषा (जिच्यात साधारणपणे लेखन केले गेले आहे तिच्याबद्दल बोलत आहे) डोळ्यासमोर ठेवुन बोलत आहे.
तर मंडळी कल्पना करा की इसवी सन ३०१० चालु आहे. होय आजपासुन १००० वर्षांच्या भविष्य काळात आपल्याला जायचे आहे...
मिसळपाव
