Skip to main content

आपणच नालायक आहोत!!

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 22/11/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
’होऊन जाईल तुमचं काम... साडेआठ हजारात. पण कॅश द्या. चेक नको. परवाची वेळ घेऊन टाकतो. तासाभरात काम होऊन तुम्ही मोकळे’... त्या ’एजंटा’नं समोर बसलेल्या जोडप्याला सांगितलं, आणि त्यातल्या नवर्‍याचा चेहेरा खुलला. ’म्हणजे रजा घ्यायला नको’... तो आनंदानं पुटपुटला. दोघंही उठले, आणि बाहेर पडले. एजंटानं ड्रावर उघडून फ़ाईल बाहेर काढली आणि कॅलक्युलेटर काढून भरभरा काहीतरी आकडेमोड केली. दोन मिनिटांनी फाईल पुन्हा ठेवताना त्याच्या डोळ्यात समाधान साचले होते... दोन दिवसांनंतर ठरल्याप्रमाणे ते जोडपं सकाळीच त्या ऒफिसात येऊन हजर झालं.

घाण्या वरचा बैल

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 22/11/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
(ईयत्ता सहावीच्या कवीतेवर आधारीत) गोष्ट एका गावातली. तेलाची घाणी अन् त्यात कोलुवर फिरणारा बैल. बैलाच्या गळ्यातली वाजणारी घंटा म्हातोबाला दिलासा द्यायची. म्हातोबा शेजारच्या खोपट्यात आडवा पडलेला. त्याला त्या घंटेचा आराम. जो पर्यंत ती घंटा किणकिणायची तो पर्यंत सगळे व्यवस्थित चालले आहे ह्याची त्याला खात्री. मग तो खुशाल झोप काढायचा. जेव्हा बैलाला तहान भुक लागायची तेव्हा घंटा वाजायची थांबायची. ती थांबली की लागलीच एक बादली आंबोण त्याच्या पुढे तो घालायचा. त्याच वेळेस सुकं खोबरे घाणीच्या तोटीत आहे का पाहुन लागेल तसा नवा घाणा तयार करायचा. हे असे संध्याकाळ पर्यंत चालायचे.

ब्लॉग माझा - ३ : विजेत्यांचे अभिनंदन

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 22/11/2010 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादप्रमाणे ह्या ही वर्षी स्टार माझा आयोजीत 'ब्लॉग माझा' ह्या मराठी आंतरजालावर मुक्तपणाने आणि उत्साहाने भरभरुन लिखाण करुन आपल्या मायबोली मराठीच्या सेवेत असलेल्या मराठी जालनिशीकारांची ( मराठीत ब्लॉगर्सची ) स्पर्धा मोठ्ठ्या उत्साहात आणि जोशात पार पडली. नेहमीसारखाच ह्या ही वर्षी स्पर्धेला स्पर्धकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला असेल ह्याची खात्री आहे. लोक लिहीतच असतात, प्रतिसाद मिळाले तरी लिहतात आणि नाही मिळाले तरी जास्तच पेटुन लिहतात.

तुला ना कळे लोचनांची कहाणी..

लेखक राघव यांनी सोमवार, 22/11/2010 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
जरी व्यक्त होती मनी आर्त गाणी.. तुला ना कळे लोचनांची कहाणी.. नदी-सागराची घडे भेट साधी.. तरी, अंतरी, छेडते सूर आधी! शब्दांविना बोलते मूकवाणी.. तुला ना कळे लोचनांची कहाणी.. कधी भासती, भास झाले खरे हे! कधी श्वास माझा उगा अडखळे रे!! सुखाची दरी, ही अशी जीवघेणी.. तुला ना कळे लोचनांची कहाणी.. नको रे असा दूर जाऊ सख्या तू.. सुगंधाविना मोगरा पोरका तू.. सांगू कसे, का फुले - रातराणी!! तुला ना कळे लोचनांची कहाणी.. शुभम्

चित्ताकर्षक गोष्टी -१

लेखक शरद यांनी सोमवार, 22/11/2010 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
दर्शनांवरील लेखमालेने डोके गरगरत असणारच; त्यावर उतारा म्हणून दोन तीन सुरस व चमत्कारिक गोष्टी सांगणार आहे सुरवात माधवीपासून. गालव हा विश्वामित्रांचा शिष्य.अनेक वर्षे गुरूची सेवा केल्यानंतर त्यांनी गालवाला प्रेमाने निरोप दिला.गालव गुरूदक्षिणा घ्याच असा आग्रह करू लागला. आग्रहाचा हट्टाग्रह झाल्यावर विश्वामित्र चिडले व म्हणाले " श्वेत वर्णाचे व एक कान काळा असलेले ८०० घोडे मला दक्षिणा म्हणून दे." गालव हताश झाला. आपल्याकडे पैसे नाहीत, कोणी मित्र नाही, आता काय करावयाचे ? ही अट कशी पुरी करावयाची ?

काही रांगोळ्या

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी रविवार, 21/11/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सोसायटीतल्या काही रांगोळ्या मला आवडल्या परंतु बंद दारांच्या संस्कृतीमुळे या रांगोळ्या काढणा-या व्यक्ती

क्रॅनबेरी चटणी

लेखक स्वाती२ यांनी रविवार, 21/11/2010 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या गुरवारी इथे थॅक्सगिव्हिंग आहे. या थॅक्सगिव्हिंगच्या टेबलवर क्रॅनबेरी सॉस हवेच. आमच्या इथे मात्र या सॉस पेक्षा क्रॅनबेरीची चटणीच आवडते. जालावर शोधल्यास बर्‍याच कृती सापडतील.

एखादा झकास लेख....

लेखक अर्धवट यांनी रविवार, 21/11/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
रोज दिवसभर काहीतरी सुचत असतं, आज थोडं यावर लिहुया असंही मनाशी म्हणतोही तेव्हा... एखाद्या क्षणी हे अगदी उजळपणे जाणवतं की.. अरे.. हा... हाच.. हाच तर क्षण खूप सकस आहे.. खोल आहे.. किती उत्कट आहे.. आपल्या मित्रांना सांगायलाच हवा.. उलगडायलाच हवा निवांतपणे.. मनात नोंदही होते तशी पण.. पण... पण एक प्रॉब्लेम होतो.. हल्ली काही लिहायला घेतलं तर पुर्णच करता येत नाही... काहीतरी विचार घेउन कळफलक समोर घ्यावा... तर दोन चार वाक्यं लिहून होतात.. त्यापुढंच वाक्य लिहिता लिहिता विचारांची मालीका कुठेतरी भरकटत जाते.. धडाडती फास्ट ट्रेन.. सुसाट वेगाने रूळ बदलते.. मनाच्या अवकाशात असंख्य रंग उधळले जातात..

चुंबिण्या येऊ नको तू............

लेखक मयुरेश साने यांनी रविवार, 21/11/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
संपलेला ध्यास आता दोन उरले श्वास आता मोडुनी त्रिज्या सुखाच्या विश्व केले व्यास आता स्वप्न ती देऊन गेली सत्य भासे भास आता जिंकुनी पैजा विजांच्या सोसुदे मधुमास आता ओंजळी अश्रु तुझा "ही " फक्त उरली प्यास आता चुंबिण्या येऊ नको तू डंख मुरले आत आता घेउनी संन्यास जावे हा खरा हव्यास आता मयुरेश साने..दि.२५-ऑक्टोबर-२०१०
काव्यरस

चिरंजीव चिंटू-२

लेखक डावखुरा यांनी रविवार, 21/11/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
दि : २१.नोव्हें.२०१०; आज आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रमालिकेतुन प्रसिद्ध होउन लहानांपासुन मोठ्यांपर्यंत ईतर कोणत्याही बातमी कडे कटाक्ष टाकण्यापुर्वी चिंटू कडे जायला भाग पाडतो...ह्यातच ह्या मालिकेचे यश सामावलेय.. सतत दोन दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चिंटू २० व्यात पदार्पण करणार. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांचा मानसपुत्र असलेला