एका रूक्ष माईंड मॅपमध्ये मला अमेरीका आतापर्यंत कशी वाटली ते आपल्यापुढे मांडते आहे. हे जितकं अमेरीकेचं प्रतिबिंब आहे अर्थात तितकच माझ्या स्वभावाचंदेखील प्रतिबिंब आहे. एखाद्या लेखकाला, वैज्ञानिकाला, अभियंत्याला, एखाद्या कवीला हीच अमेरीका खूप खूप वेगळी भासू शकेल, चांगल्या अथवा वाईट कोणत्याही रीतीने.