जे प्रेम करून लग्न करतात ...!!
जेव्हा तो प्रेम करतो
तेव्हा त्याच्या खिशात चंद्र असतो
जेव्हा ती प्रेम करते
तेव्हा तिच्या मनात एक स्वप्न असते
दहा पेंशाचे फुटाणे खाता खाता
दोघांचे एक गाणे असते
चला इथपर्यंत पाऊलवाट सापडली
स्वर्ग आता हाकेवर आहे
आमचे प्रेमतर
सात जन्माची ठेव आहे !!
तो तिच्या डोळ्यात बघतो
एक छान गाणे गातो
ती डोळे मिटते
त्याच्या गाण्यात हरवून जाते
इथपर्यंत गाडी येता येता
ती अवघड वाट संपून जाते
प्रेमाचा शेवट लग्नात होतो
हु.sss...शः....!!
आई बाबांचा अवघड प्रश्न
आपण चुटकीसरशी सोडवला
ह्याच आनदात दोघे असतात
संसाराचे गाणे ठेका धरून गात असतात ....!!
काव्यरस
मिसळपाव