पीराची चादर ...
नुकतेच एका पीराच्या दर्शनाला जाण्याचा योग आला. बाहेर पाटी होती "स्त्रियांनी पीराला हात लावु नये. डोक्यावर टोपी घालुन किंवा रुमाल, वस्त्राने केस झाकुनच प्रवेश करावा, स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात आत येऊ नये"
मी भेट दिलेल्या अनेक पीरांच्या, दर्ग्याच्या बाहेर अशाच सुचना असतात. आत पिराला सुंदर, झुळझुळीत हिरव्या चादरीने झाकलेले होते. त्यावर फुलांच्या माळा होत्या. एक पोरगेलेसा फकिर हातातल्या चावरीने त्यावरच्या माशा हाकलत होता. पलि़कडे एक मध्यमवयीन फकीर कुराणपठन करत बसला होता. त्याच्याशी अल्लाह, नबी, प्रेषित यांच्या महान कर्तबगारीची चर्चा करत मी माझ्या शंका विचारत होतो.
मिसळपाव