Skip to main content

भरवा करेला: लखनौ इष्टाईल

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 06/01/2011 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
सामुग्री : कारली ,मीठ तिखट ,धणे पुड बडीशेप( ओली) , दही. कारली सोलून घ्या. सोललेला कीस बाजूला काढून ठेवा ( याची चटणी करू शकता ) सोललेली कारली एका बाजूने काप देवून चिरून त्यातील बिया काढून घ्या. चिरलेली कार्ली मिठाच्या गरम पाण्याने धुवून घ्या. थोडा दाब देवून पाणी काढून टाका आतील बाजूने तिखट मीठ लावून कारली थोडावेळ ( साधारण वीस मिनिटे )तशीच बाजूला ठेवून द्या. बडीशेप ( ओली) न मिळाल्यास साधी बडीशेप पाण्यात अर्धा तास भिजत टाका. पाच चमचे बडीशेप मध्ये एक अर्धा चमचा या प्रमाणात धणेपूड मिसळा.

चीझी स्प्रिंग ओनिअन ऑम्लेट

लेखक खादाड अमिता यांनी गुरुवार, 06/01/2011 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मुंबईत पण चक्क जरा थंडी वाजते. तेव्हा सकाळी एक मस्त 'आलं मारके' चहा आणि असं 'heartwarming' ऑम्लेट मिळालं म्हणजे 'मोगाम्बो बहुत खुश हुआ'! सामग्री: २ अंडी २ मोठे चमचे दूध १/४ कप कांद्याची पात, बारीक चिरलेली (अंदाजे एक मूठभर) १ मोठा चमचा, किसलेलं चीज चवीनुसार मीठ आणि मिरपूड १ चमचा तेल किंवा बटर कृती: - तेल वगळून बाकी सगळी सामग्री फेटून चांगलं मिक्स करून घ्या. - एका नोन स्टिक pan वर थोडं तेल किंवा बटर गरम करून त्यात अंड्याच मिक्स्चर ओता.

तोक्यो गोमी ओन्ना

लेखक निनाद यांनी गुरुवार, 06/01/2011 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
तोक्यो गोमी ओन्ना अर्थात तोक्यो ट्रॅश गर्ल किंवा तोक्यो गार्बेज गर्ल मियुकी (नाकामुरा मामी) ही तोक्यो मधल्या एका कॅफेमध्ये वेट्रेस आहे. तिला या कॅफेमध्ये एक मैत्रिण आहे. ही बिनधास्त मैत्रिण नवनवीन जोडीदार शोधत राहते. आपल्या शैय्यासुखाचे किस्से मियुकीला ऐकवत राहते. मियुकी तिच्या अपार्टमेंट मध्ये राहणार्‍या संगीतकाराच्या (कझुमा सुझुकी) प्रेमात पडली आहे. पण हे प्रेम व्यक्त करण्याचे धाडस तिच्या मध्ये नाही. रोज रात्री ती कुणी पाहत नसतांना त्याचा कचरा उचलून आपल्या घरी घेऊन येते. त्यातून त्याच्या आयुष्याची चाहूल घेत राहते.

रिटायर्ड माणसाला कोंबडी परवडत नाही'.....!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 06/01/2011 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
[पोस्टातले नाना निवृत्त झाले . कोंबडी त्याना अतिशय प्रिय. रविवारी पिशावी घेऊन बाहेर जाताना दिसले गमत म्हणून सहज विचारले .काय नाना आज काय कोंबडी का ?हसून म्हणाले नाहीरे बाबा रिटायर माणसाला कोंबडी नात परवडत ..त्यावरून ही कल्पना] नुकताच रिटायर्ड झालो पेन्शन कसली १५२० रुपये मासिक महिन्याची पेन्शन चालू होईल होईल तेव्हा होईल ......! कधी होईल माहीत नाही ....? परवाच कोंबडी खायची इच्छा झाली बायको वेंतागून म्हणाली : आता पुरे कोंबडी-बिम्बडी तुमच्या पेन्शनमध्ये कोथिंबीर तरी येईल का...? सगळे पेंसे कोंबडी खाण्यात उडवले आता काटकसरीने जगा त्यांना पण जगू द्या ..........!
काव्यरस

साँदेश

लेखक गणपा यांनी गुरुवार, 06/01/2011 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी नववर्षाच्या सर्व आंतरजालिय स्नेह्यांना शुभेच्छा !!! म्हटलं या वर्षाची सुरवात एखाद्या गोड पाककृतीनं करावी. त्यात आज बाबांचा वाढदिवसही आहे. म्हणुन ही पाककृती खास त्यांच्यासाठी. साहित्यः प्रमाण साधारण १० साँदेशसाठी.

गोळ्याची आमटी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 06/01/2011 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)एक वाटी बेसन. २)दीड कान्दा. ३)दोन हिरव्या मिरच्या. ४)कोथिम्बिर ५)चिन्चेचा कोळ. ६)दोन वाट्या किसलेले ओले खोबरे. ७)१/२ चमचा मिरची पूड.

पातोळ्या.

लेखक ज्योति प्रकाश यांनी बुधवार, 05/01/2011 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
गगनविहारी यान्च्यासाठी पातोळ्याची पाककृती. साहित्यः-१)हळदीची पाने ७ ते ८. २)२ वाट्या तान्दुळाची पिठी . ३)३ वाट्या ओले किसलेले खोबरे. ४)१ ते दीड वाटीकिसलेला गुळ. ५)चिमुटभर वेलचीपुड. ६)मिठ चविनुसार. ७)थोडे तेल. कृती:-१)प्रथम किसलेले खोबरे व गुळ एकत्र करुन त्यात थोडे मिठ घालुन शिजवुन घ्यावे. गुळ विरघळला व थोडे सुकले कि सारण झाले म्हणुन समजावे. २)एका भान्ड्यात २ वाट्या पाणी घेवुन त्यात थोडे मिठ व एक चमचा तेल घालुन उकळत ठेवावे. पाणी उकळले की त्यात तान

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 05/01/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.