कथा गाजराच्या हलव्याची
हा गाजराचा हलवा अगदी स्पेशल आहे. यात अनेक प्रकारचे अनुभव मिळतील, त्यामुळे ही पाककृती काळजीपूर्वक वाचावी.
आज काही काम नव्हतं आणि घरीही कुणी नव्हतं. सहज चहा प्यायला बाहेर पडलो तर बाजारात लालबुंद गाजरं विकायला आलेली दिसली. शेजारीच काजू, बदाम, किसमीस वगैरे ड्रायफ्रूटही विकायला ठेवले होते. गाजराचा हलवा करून पाहाण्याची चांगलीच संधी होती. मग एक किलो गाजरं, प्रत्येकी पन्नास ग्रॅम काजू, किसमीस आणि बदाम आणि साताठ विलायची, लिटरभर दूध असं जय्यत सामान घेऊन घरी आलो.
गाजराचा हलवा आजपर्यंत कितीही वेळा खाल्ला असला तरी, प्रत्यक्ष करून पाहाण्याची पहिलीच वेळ होती.
मिसळपाव
चित्रपटाची सुरुवात होते तेव्हा एका घरात पार्टी चालू असते. घरची गृहिणी झटत असते. स्वयंपाकघरातून तऱ्हतऱ्हेचे पदार्थ आणून घरातल्यांची आणि पाहुण्यांची सरबराई करत असते. हळूहळू लक्षात येतं की खुद्द तिचाच वाढदिवस साजरा करायला लोक जमले आहेत. पण तिला मात्र आराम नाही.
हि पाककृती म्हणजे एक 'classified' सिक्रेट आहे. पण आत्ता पर्यंत हे कटलेट एवढ्या लोकांनी आवडीने खाल्ले आहे कि आता ह्याचं गुपित सांगायला काहीच हरकत नाहीये. हि पाककृती म्हणजे एक saviour आहे. उ.दा. गेला पूर्ण आठवडा आमच्या कडे पाहुणे आणि रिलेटेड फिस्ट चालू आहे. रोज केलेल्या पदार्थातून काही न काही थोड्या फार प्रमाणात उरतं. आणि मग अचानक फ्रीज मधली सगळी जागा गायब होते. अश्या वेळी, हे गोलमाल कटलेट एक उत्तम ब्रेकफास्ट किंवा उपाहार ऑप्शन ठरतं.