सध्या बाजारात उत्तम गाजरे आहेत, सारखी कोशिंबिर किती करणार? आणि फिल्मी गाजर का हलवा सुध्दा वजन आणि साखरेला मारकच ना.. म्हणून आमच्या सुझानची खासियत हे गाजर सूप-
साहित्य- ५-६ मध्यम गाजरे, १ लहान कांदा, २ पेरं आल्याचा तुकडा, ३-४ मिरे, २ लवंगा, दालचिनीची एक मोठी काडी,ड्राय बेसल लिव्ह्ज,मीठ
कृती- गाजरांची सालं काढा. मोठे तुकडे करा. कांदा सालं काढून अर्धा करा. गाजराचे तुकडे आणि कांदा एका मोठ्या उभट पातेल्यात किवा कुकरात घ्या. त्यात आले,मिरी,दालचिनी,लवंगा इ. सर्व मसाला घाला आणि उकडा.
हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्या किवा हँड ब्लेंडरने घोटा. दाट, रवाळ पल्प तयार होईल. गरजेनुसार गरम पाणी घाला.