आज्ञार्थी वाक्ये आणि व्यक्तीस्वातंत्र्य
खूपदा एका गोष्टीचे कौतुकमिश्रीत नवल वाटले आहे - जर आपण एखाद्या अमेरीकन व्यक्तीस विचाराल "मी अमूक एक गोष्ट करू का?" तरी त्याचे उत्तर तू हे कर अथवा हे करू नकोस असे न मिळता " I will do so & so" किंवा "No. I will not do so & so" असे मिळते. विशेषतः या अशा दाखल्याचा भरपूर (व्यक्तीगत)विदा माझ्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी हा प्रश्न विचारला आहे तेव्हा तेव्हा अमेरीकन (जन्म/संगोपन आदिने अमेरीकेत असलेल्या) व्यक्तीने मला बहुधा याच अर्थाचे उत्तर दिले आहे.
बालसंगोपनाची काही उदाहरणे पहाण्यात आली -
एका मध्ये मुलगा त्याच्या बॅगकडे लक्ष देत नव्हता.
पंगा
पुलाखालून खूप पाणी वाहून गेलय आता तरी विद्यार्थीदशेत पंगेगिरी अशी ब~याचदा केलीय. तसं त्यातलं काही अंगलट आलं नाही पण अनुभवसम्रुद्ध मात्र नक्की करून गेलं.
आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असतानाची गोष्ट. परिक्षा महिन्याभरावर आलेली, जर्नल्स लिहीण, ती तपासून घेण, परीक्षेत काय विचारलं जाईल याचा माग काढण वगैरे वगैरे सगळे उद्योग चालू होते. एरवी मी शिक्षकांच्या फार गुड बुकात नसलो तरी ब्याड बुकातही नसायचो (असं तेव्हा मला वाटायचं.) शिक्षकांना सतावणे वगैरे व्हायचं ते त्यांना सोडवायला त्रास होईल अशा शंका विचारण्याने किंवा चालू वर्गात थोडी भंकस करून त्यांचा जीव मेटाकुटीला आणण असंच.
काका हलवायाकडची जिलबी..
परंतु आज नीलकांताने मुखपृष्ठावर,
आज काही काळ मिसळपाववर भीमसेनांच्याच संबंधी धागे यावेत आणि
ज्यांना ज्यांना त्यांच्या विषयी लिहायचे असेल त्यांनी तसे लिहावे
असं म्हटल्यामुळे लिहायला बसलो आहे, परंतु खरं तर काहीच लिहायला सुचत नाही..सारा दिवस कसाबसा गेला परंतु आता रात्र मात्र अंगावर येऊ पाहाते आहे.
अक्षरश: ओक्साबोक्षी रडावसं वाटत आहे, पण धड रडूही येत नाही. गेल्या दोनचार दिसापूर्वी मीच त्यांच्याकरता मारे विमान वगैरे मागवलं होतं, अर्थात त्यांचा त्रास, अंथरुणातल्या हालअपेष्टा संपाव्यात म्हणून. परंतु वास्तव इतकं सोपं नसतं.
स्वरभास्कराची महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाने घेतलेली मुलाखत.
आज मटामध्ये, तीस-एक वर्षांपुर्वी आकाषवाणीवर पुलंनी अण्णांच्या घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश छापुन आलेत.
त्याच मुलाखतीची ही ध्वनीफीत.
देव नाही देवालयी
पुण्याच्या दक्षिणेकडे असलेल्या सिंहगडाकडून एकच रस्ता शहराकडे येतो. शहरात येताना आम्हाला हाच रस्ता घ्यावा लागतो. पण शहरात येताना दत्तवाडीपासून सरळ दांडेकर पुलाकडे न जाता आम्ही नेहमी आत वळतो, नि तेथील कॉलनी नर्सिंग होम जवळच्या लहान रस्त्याने पुढे जातो. हा जो थोडा दूरचा रस्ता आम्ही घेतो त्याला एक कारण आहे. या आतल्या रस्त्याला एक देवालय आहे. जाताजाता त्या देवालयातील देवाचे - ओझरते का होईना - दर्शन घडावे म्हणून. गेले चार वर्ष मात्र या देवाचे दर्शन दुर्मिळच झाले होते. असे म्हणतात की तुमच्या आमच्या पापांचे हलाहल पचवणार्या देवालाही कधी कधी ते भोवतेच नि त्यालाही काही त्रास सहन करावाच लागतो.
भाजप आणि आर एस एस
साधन शुचितेची सतत चर्चा करणारा पक्ष म्हनून भाजपचे नाव घेतले जाते.
भाजप हा एक स्वतन्त्र पक्ष असून संघाशी त्याचा संबन्ध नाही असे वारंवार सांगितले जाते.
संघ भाजपची धोरणे ठरवीत नाही असेदेखील सांगितले जाते.
एखादी गोष्ट भाजप ने केली की ती गोष्ट संघाने केली की भाजप म्हणजे संघ नव्हे असे देखील सांगितले जाते.
भ्रष्टाचारी लोकाना संरक्षण देवू नये हे खरे पण त्यांची पाठराखण देखील करू नये.
आदर्श घोटाळ्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री खुर्चीवरून पायउतार झाले .
पण भाजपला कर्नाटकातील त्यांच्या मुख्यमन्त्र्यांबद्दल हे मान्य नसावे.
मिसळपाव