Skip to main content

प्रजासत्ताक दिन माझे मनोगत (माझ्या बालपणीचा भारताचा ते इंडियाचा प्रवास ))

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी गुरुवार, 27/01/2011 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजांच्या काळात सर्वाना शिक्षणाची समान संधी व अश्या अनेक गोष्टी भारतीय समाजात नव्या होत्या (ह्या त्यांनी अर्थातच स्वताचा राज्यकारभार सोयीने व्हावा म्हणून केल्या )पण .भारता स्वतंत्र झाला तेव्हा ३५ कोटी भारतीय जनतेपैकी किती लोक साक्षर होती ? साक्षर लोकांमधील किती लोक प्रगल्भ होती?

चांदोबा मासिक

लेखक मराठे यांनी गुरुवार, 27/01/2011 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी (आणि मोठेपणीसुद्धा) आवडीनं वाचावं असं आपल्या सगळ्यांच्या आवडतीचं मासिक 'चांदोबा' आता आंतरजालावर उपलब्ध झालं... हा त्याचा दुवा

लोकशाहीच्या वाटेवर...

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 26/01/2011 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज आपला प्रजासत्ताक दिन आहे. त्यांनिमित्त सर्वांना शुभकामना. भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात आज झाली. आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो आणि सार्वभौम झालो. आज थोड्या थोड्या कारणाने वैतागलेल्या मित्रांना देशाला आणि येथील व्यवस्थेला शिव्या देताना बघतो आणि कित्येकदा मीसुद्धा त्यात सामील होतो. मात्र एक जाणीव कायम असते की सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे.

भाववाढ आणि नियंत्रण

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 26/01/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच ऋषिकेश यांनी दिशाहीन विरोधी पक्ष असा धागा काढला होता. त्यात आणि त्यावरील चर्चेत वाढलेली आणि वाढती महागाई हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यावर सरकारने नियंत्रण आणणे आवश्यक आहे असे मिपाकरांचे मत दिसले. मला व्यक्तिश: सरकारने भाववाढ आटोक्यात आणावी हे म्हणणे पटले होते. परंतु मी त्यावर अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार केला तेव्हा मला वाटत असलेले भाववाढ आटोक्यात आणावी हे मत चुकीचे असल्याचे वाटू लागले. इतकेच नव्हे तर भाववाढ नियंत्रण करावे हे माझे मत दळभद्री समाजवादाचे आपल्यावर जे ४० वर्षे संस्कार झाले त्यातून आलेले होते हेही लक्षात आले.

देशसेवा !

लेखक शाहरुख यांनी बुधवार, 26/01/2011 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम शिल्लक राहिलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा !! सरकारी मेहेरबानीने आज मिळालेली सुट्टी उपभोगली..दुपारी वामकुक्षी घेत असताना सहज मनास प्रश्न चाटून गेला "शाहरुख, तू काय केले आहेस आत्तापर्यंत देशासाठी " ? पहिल्यांदा वाटले अरे मी प्रामाणिकपणे प्राप्तिकर भरतो की..पण नंतर लक्षात आले अरे तो तर 'अ‍ॅट सोर्स' वजा होतोय..जर तसे नसते तर मी काय केले असते ?

मंतरलेले चार दिवस - भीमराव पांचाळेंसोबत !

लेखक जयवी यांनी बुधवार, 26/01/2011 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
भीमराव पांचाळे नावाचा सुरांचा जादूगार कुवेतमधे येऊन गेला आणि आम्हा कुवेतकरांना त्यांच्या सुरांच्या इंद्रजालात पार अडकवून गेला. त्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाहीये. खरं तर त्यातून बाहेर यावंसंच वाटत नाहीये. त्यांनी त्याच्या साधेपणाने आम्हाला कायमचं आपलंसं करुन टाकलंय. त्यांच्या सुरांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडवून टाकलंय. संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी गजलनवाज भीमराव पांचाळे आणि त्यांचे सहकारी डॉ.देवेंद्र यादव आणि जगदीश मेस्त्री कुवेतमधे आले आणि चार दिवस आम्हा सगळ्यांना त्यांचा मंतरलेला सहवास लाभला. २० जानेवारीची २०११ ची सकाळ.

चंद्रावरती बांधलाय बंगला ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 26/01/2011 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रावर मी बांधलाय एक बंगला फार जुनी झालीय हकीगत जाहिरात आली होती [आठवतंय का ..?] चंद्रावर जमीन मिळतेय तेव्हाच घेऊन ठेवलीय दहा रुपये एकरने चक्क वीस एकर घेऊन ठेवलीय माझ्याकडे कागद पत्र आहे कालच चंद्राचा सेल आला बंगला बांधून तयार आहे कधी येताय राहायला ..? हुरळून गेलो कसा असेल बंगला चंद्राने "ई"मेल केलाय . मस्त बंगला..!
काव्यरस

शिळा घास होता

लेखक मयुरेश साने यांनी बुधवार, 26/01/2011 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
खरा कायदयाने मला फास होता कुठे न्याय ? तो फक्त आभास होता तराजू कधी पावला सांग त्यांना ? उभा जन्म ज्यांचा शिळा घास होता लुबाडून खाती सदा तूप-रोटी गुन्हेगार तेथेच हमखास होता अरे ! कायद्या काय देऊ पुरावे ? दलालीत वाटा तुझा खास होता तुझ्या चोर-वाटां मुळे न्याय मेला फरारी च आरोपि सर्रास होता अशा कायद्याला कुणी भीक घाला ? स्वतः न्याय केला ! सुरा पास होता
काव्यरस

नेते नरमले

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 26/01/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
नेते नरमले मोठे गरजले छोटे बरसले रेती वाहतच गोटे अडकले मते पाहताच नेते नरमले ललना पाहून कपडे शरमले चकवेही आज रस्ता भटकले शिपाई मजेत कैदी सटकले बिल्डर म्हणताच मंत्री दचकले काजवे रात्री अभय चकाकले गंगाधर मुटे =============

मीठावरच्या कराची कहाणी...

लेखक अवलिया यांनी बुधवार, 26/01/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेटवर भटकंती करत असतांना एक लेख वाचण्यात आला. सदर लेख आमचेच मित्र विशाल कुलकर्णी यांनी लिहीला आहे. त्यातील काही अंश..
बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल. आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल.