Skip to main content

होम मेड होल व्हीट पिझ्झा

लेखक खादाड अमिता यांनी रविवार, 30/01/2011 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
हि रेसिपी स्पेशल आहे. कारण ह्यात पिझ्झा बेस पण घरी आपल्या रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठातून (होल व्हीट फ्लॉर) बनवला आहे. पिझ्झा बेस साठी : ३ कप गव्हाचे पीठ १ १/२ मोठे चमचे ड्राय यीस्ट १ चमचा मीठ १ चमचा साखर १ कप कोमट पाणी १ चमचा तेल - यीस्ट आणि साखर कोमट पाण्यात विरघळवून त्याला १५ - २० मि बाजूला ठेवा थोडा फेस येईपर्यंत. - गव्हाच्या पिठात मीठ, तेल आणि यीस्ट चे मिश्रण घालून त्याची सैल कणिक भिजवा. वाटल्यास थोडं अजून पाणी घाला.

हा मराठी माणसा बद्दल आकस का ?

लेखक मराठी_माणूस यांनी रविवार, 30/01/2011 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळि खालील लेख वाचनात आला. हे एका पुस्तकाचे परीक्षण आहे . त्यात बासू चटर्जींनी त्यांचे काही अनुभव सांगीतले आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7386077.cms त्यात बासुदानी चीत्रपटात राजा परंजपे ना घेतल्या बद्दल , ताराचंद बडजात्यानी खालील हीणकस शेरा मारला आहे ' आप किसको लाये है ये मराठी से?' कोणतीही गुणात्मक टीका नसुन फक्त मराठी म्हणुन ईतकी टोकाची भुमीका ? तीही मराठीतील इतक्या गुणी अभीनेता आणि दिग्दर्शका बद्दल ?

माझा देश ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 30/01/2011 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा देश मला प्रिय आहे येथे कोठेही हागता मुतता नि थुंकता येते येथे स्वातंत्र्याची रेलचेल आहे जिसकी काठी उसकी भैस आहे पकडला नि पुरावा नसला तर त्याचा सन्मान आहे असा माझा देश आहे माझा देश मला प्रिय आहे येथे पक्ष बदलता येतो कधी..
काव्यरस

दु:ख आता फार झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 30/01/2011 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख आता फार झाले स्वप्नही लाचार झाले दु:ख आता फार झाले झोपलेले ते निखारे जाग येता गार झाले झुंजण्याची वेळ येता शौर्य-धैर्य बिमार झाले झुंजणारे वीर खंदे आरशांचे हार झाले खेळ येथे माकडांचे या भुईला भार झाले पान कोरे अक्षरांना सांगते आचार झाले बांधलेली भोवताली भिंत होती दार झाले उत्तरांना पेलताना प्रश्नही बेजार झाले “अभय”तेच्या ’त्या’ नशेचे बंद आता बार झाले ...............गंगाधर मुटे...........

स्वा.सावरकरांच्या जन्मठेपेची शताब्दी...

लेखक अमोल देशमुख यांनी रविवार, 30/01/2011 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यविर विनायक दामोधर सावरकर यांना ईग्रजांनी दुस-या जन्मठेपेची शिक्षा सुनावली तो दिवस म्हणजे ३० जानेवारी १९११ आज ३० जानेवारी २०११ रोजी त्याला १०० वर्षे पुर्ण झाली, स्वातंत्र्यासाठी दोनवेळा जन्मठेप भोगणा-या स्वां.सावरकरांना विनम्र अभिवादन. १ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीला ठार केले, त्यानंतर नाशिक मध्ये २९ डिसेंबर १९०९ रोजी अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर ऑर्थर मेसन जॉक्सन याला गोळ्या घालुन ठार मारले ब्रिटीशांनी या दोन्ही घटनांचे खरे सुत्रधार म्हणुन स्वा.सावरकरांना १३ मार्च १९१० (रविवार) रोजी इंग्लंडच्या व्हिक्टोरीया स्टेशनवर अटक क

एक धागा...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 30/01/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
नात्याचा धागा... लातूर जिल्ह्यातल्या भीषण भूकंपाने हजारो संसार उद्ध्वस्त केले. शेकडो बालके अनाथ झाली आणि असंख्य कुटुंबांच्या डोक्यावरची छपरे नष्ट झाली. या भूकंपाने देश हादरला. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात सरसावले. सोलापूरच्या एका शाळेतील काही शिक्षकांनीही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अजित जोशी नावाचा मुलगा तेव्हा दहावीत होता. त्याचे वडील सोलापुरात शिक्षक होते. त्या मदतकार्यात तेही सामील झाले.

तुझ्यासारखी माणसे

लेखक पेशवा यांनी रविवार, 30/01/2011 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासारखी माणसे त्यांच्या पंखावर निजत आकाश बघत स्वप्न, घेत गुडघे पोटाशी माझ्यासारखी माणसे हात पसरतात पंखा सारखे मांज्याला चोळतात काचा जिंकू पाहतात आकाशाचा तुकडा तुझ्या सारखी माणसे फाटक्या दु:खाला घालतात टाके, मायेने, उपजत तीक्ष्णतेने उध्वस्थ मनात वसवतात मैफिली आपल्या हिरव्या हाताने माझ्यासारखी माणसे आपुलकीच्या हातांची कापतात बोटे नव्या कागदासारखी बांधतात अभेद्य किल्ले माहिती असतात प्रत्येकाच्या गळ्याची मापे तुझ्यासारखी माणसे भेटल्यावर माझ्यासारखी माणसे पळत सुटतात जीवाच्या आकांताने क्लॉस्ट्रोफोबिक होते तुझ्या आकाशात मायेच्या तिक्ष्णतेत दिसते औषधी इंजेक्शन आणि तुझ्या गळ्याचे माप घेण्याइतके

लोकशाही कडून राजेशाही

लेखक Bhushan11 यांनी रविवार, 30/01/2011 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशाही कडून राजेशाही उत्तर प्रदेशात मायावती, मुलायम, बिहार मध्ये लालू, रबडी, गुजराथ मध्ये मोदी, आंध्र प्रदेशात नायडू, रेड्डी, कर्नाटकात येदुइरपपा, तमिलनाडूत करुणानिधी, जयललिता आणि महाराष्ट्रात 'जाणता राजा' आणि इतर. गेल्या काही वर्षात या मंडळींचं त्या त्या राज्यात वर्चस्व आहे. त्यांनी (काही अपवाद सोडून) जणू काही राजेशाहीच चालवली आहे असे दिसते. लोकशाही पासून आपण दूर जात आहोत का? यातील कित्येकांनी आपल्या "मनगटाच्या" जोरावर आपआपला प्रांत आपलाच (आपल्याच बापाच राज्य) असल्यासारखा चालवलेला दिसतो. सत्ता राबवण्यासाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता. असं भयानक चित्र आपल्याला दिसतं.