Skip to main content

२६/११ हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप यांचे काका मोहनन यांना श्रद्धांजली.........

लेखक गांधीवादी यांनी रविवार, 06/02/2011 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
२६/११ हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप चे काका मोहनन यांनी गुरुवारी दि. ३ फेब रोजी दिल्लीत कसाबला फाशी देण्यास विलंब होत असल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. बातमी. मेजर उन्नीकृष्णन यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यादृष्टीने केंद्र वा राज्य सरकारकडून पावले उचलली जात नसल्याने ते संतप्त झाले होते. आपला संताप व्यक्त करण्यासाठी त्यांनी संसदेसमोर विजय चौकात स्वतःला पेटवून घेतले.

माता ही घाबरी ---

लेखक विदेश यांनी रविवार, 06/02/2011 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
[चाल: राधा ही बावरी -] गर्दीत वाहने-लांब रांग पाहता , नजर भिरभिरते ऐकून हॉर्न,विसरून भान,ही वाट काढण्या बघते त्या अतिक्रमणांच्या विळख्यामधुनी- हाक ईश्वरा देई माता ही घाबरी पोरीची माता ही घाबरी ! इवल्या इवल्या पायांची त्रेधातिरपिट उडताना थेंब थेंब वाहनातुनी पिचकारीचे पडताना तो गणवेषाचा रंग पाहता पोर घाबरुन जाई तो उशीर होता गेट शाळेचे बंद ! मारतील बाई ? आज इथे तर उद्या तिथे - दूर निधन ते अपघाती पोरीसोबत जाताना उगा पावले अडखळती ते ऊन म्हणा पाऊस म्हणा , पालिकेस जाग न येई ते खड्डा खणणे रस्त्यामधुनी , बंद कधी ना होई !
काव्यरस

भटकंती

लेखक फास्टरफेणे यांनी रविवार, 06/02/2011 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
२४ जानेवारीला बायको माहेरी गेली आणि गेलं १ वर्ष झोपी गेलेला माझ्यातला भटक्या जागा झाला. २६ जानेवारीची सुट्टी कुठे सत्कारणी लावावी हा प्रश्न नव्हताच, उत्तर तयार होतं - वीर धरण. मागच्या वर्षी सकाळमधे "बार हेडेड गूज"ची बातमी वाचून एकदा वीर धरणाची वारी झाली होती. पण तेव्हा फक्त पाच-सहाच बदकं दिसली होती. तेव्हाच ठरवलं होतं, परत यायचं... पहाटे ५ ला निघायचं ठरवून ८ वाजता निघालो. एकटाच. पाठीला सॅक, सॅकमधे पाण्याची बाटली आणि कॅमेरा (कॅनन SX 110). हडपसर ते सासवड अंतर जेमतेम ३०-४० मिनीटांत कापलं. वाटेत बरेच पक्षी दिसत होते.

सुपरबॉल स्पेशल हालपिनो पॉपर्स

लेखक स्वाती२ यांनी रविवार, 06/02/2011 03:46 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी कोल्टस बाहेर पडल्याने मला टीम नाहिये. नवरा ग्रीन बे च्या बाजुने तर लेक स्टिलर्सच्या. पण असे असले तरी सुपरबॉलच्या निमित्ताने चरणे हे हवेच. तेव्हा खादाडीसाठी पेश करतेय हालपिनो पॉपर्स साहित्य १२ हालपिनो मिरच्या ४ औस लो फॅट क्रिम चिझ मऊ करुन १/२ कप शार्प चेडर चिझ १/२ चमचा पाप्रिका किंवा १/४ चमचा तिखट १/२ चमचा जिरे पावडर आवडत असल्यास एक लसुण पाकळी बारीक किसून १/४ कप ब्रेड क्रंब्ज कृती एका बोलमधे दोन्ही प्रकारचे चिज, पाप्रिका, जिरे पावडर आणि लसुण एकत्र करुन घोटून एकजीव करा. मिरच्या स्वच्छ धुवुन कोरड्या करा.

चिकन आचारी कबाब

लेखक Mrunalini यांनी रविवार, 06/02/2011 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी slovakia ला आल्यावर केलेली सगळ्यात पहिली recipe. साहित्य : बोनलेस चिकन - ५०० ग्रॅम ढोबळी मिरची - १/२ कांदा - १/२ दही - ३ चमचे आले लसुन पेस्ट - १ चमचा लाल तिखट - १ चमचा गरम मसाला - १/२ चमचा काळी मिरी पावडर - १/२ चमचा आचारी मसाला (बेडेकर चा तयार लोणच्याचा मसाला वापरला तरी चालेल) - १ चमचा बटर - २ चमचे मिठ चवीनुसार चाट मसाला चवीनुसार कबाब भाजण्यासाठी वापरतात, त्या सळ्या किंवा लाकडाच्या sticks कॄति : १. चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. त्याच प्रमाणे ढोबळी मिरची व कांद्याचे मोठे तुकडे करावे. २.

'धोबी घाट' - पाहण्याचा वेगळा नजरिया

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 06/02/2011 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
‘पाहणं’ किंवा ‘पाहिलं जाणं’ या क्रियेशी एकाच संदर्भात खूप वेगवेगळे अर्थ जोडले जाऊ शकतात. एखाद्या बाईकडे एखादा पुरुष ‘काय माल आहे’ म्हणून अधाशासारखं पाहतो तेव्हा ती क्रिया त्याला आनंद देत असते; त्या बाईला ती क्रूर किंवा दुर्लक्ष करण्याच्या लायकीची वाटू शकते तर तिच्या मित्राला ती फाजील वाटू शकते आणि तो त्या परपुरुषाला दम देऊ शकतो. किरण राव दिग्दर्शित ‘धोबी घाट’ या चित्रपटात आपल्याला मुंबईच्या पार्श्वभूमीवर काहीतरी ‘पाहणारी’ किंवा स्वत: ‘पाहिली जाणारी’ वेगवेगळी माणसं दिसतात.

कल्पना सरोज --रोपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा.

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शनिवार, 05/02/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
कमानी ट्यूब ची मालकीण कल्पना सरोज रुपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा. मुंबई जवळच्या औद्योगीक आजाराने जर्जर (एकूण ₨ १६० कोटी कर्ज) झालेली बि आय एफ़ आर लिस्टेट कंपनी त्याब्यात घेणारी सरोज एक दलित समाजात जन्माला आलेली अत्यत खडतर प्रवास करत आलेली एक धडाडीची इन्ट्र्प्रुनर --तीन हजार कोटी रूपयाची मालकीण असलेल्या कल्पनाची कहाणी चित्तथरारक आहे. सुमारे ४८ वर्षांचे वय असलेल्या कल्पना ताईंचा एक मुलगा पायलट आहे आणि मुलगी उच्च शिक्षण घेत असलेली आहे.