Skip to main content

जय गणराज

लेखक ashvinibapat यांनी सोमवार, 07/02/2011 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज माघ चतुर्थी, श्री गणेशाचा जन्मदिवस. त्यानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पुणे नासिक महामार्गावरील मंचर पासून अवघ्या २.५ कि.मी. अंतरावर असणारे आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग हे गाव निसर्गसंपन्न डोंगररांगांच्या कुशीत वसले आहे.

बटाटा-मटार टिक्की

लेखक Mrunalini यांनी सोमवार, 07/02/2011 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : उकडलेले बटाटे - २-३ मटार वाफवुन थोडा mash केलेला - १/२ वाटी खवलेला ओला नारळ - १/४ वाटी बारीक रवा - १/२ वाटी cornflour - २-३ चमचे आले, लसुण, मिरची पेस्ट - १ १/२ चमचा जिरे पावडर - १/२ चमचा धणे पावडर - १/२ चमचा लिंबाचा रस - १/२ चमचा साखर - १/४ चमचा मिठ चवीनुसार shallow fry साठी तेल कॄति : १. बटाट्या मधे मिठ, आले,लसुण्,मिरची पेस्ट टाकुन mash करुन घ्यावे. त्या मधे cornflour टाकुन नीट एकत्र करावे. २. पॅन मधे थोडे तेल टाकुन, त्यात आले,लसुन्,मिरची पेस्ट टाकावी. पेस्ट थोडी परतल्यावर त्यात मटार टाकावा. चवीप्रमाणे मिठ टाकुन ४-५ min वाफ द्यावी. ३.

नागपुरी सावजी मटण - मदत हवी आहे.

लेखक इंटरनेटस्नेही यांनी रविवार, 06/02/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी फिरण्याची हौस असल्याने आम्ही वेळ मिळेल तसे राज्यभर फिरत असतो. ठिकठिकाणी जाउन तिथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणे हा तर आमचा सर्वात लाडका म्हणावा असा छंद! काही कारणाने २००९ मध्ये नागपुरला जाणे झाले, आणि तिथल्या सावजी मटण याची चव तर अप्रतिम, अजुन जिभेवर रेंगाळते आहे! पण आमच्या मातोश्री पडल्या कोकणी, त्यामुळे त्याची रेसेपी काय असेल याचा अंदाज त्यांना बांधता आला नाही.. बरं मुंबई - नागपुर हे अंतर म्हणजे मुंबई - पुणे एवढे नाही, की आले मनात तर खास तिकडचे जेवण जेवुन येउ म्हणुन वाटेला लागायला!

आपले स्वच्छ (?) पंतप्रधान

लेखक सूर्यपुत्र यांनी रविवार, 06/02/2011 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २२ मे २००४ पासून आतापर्यंत पंतप्रधान असलेल्या माननीय मनमोहनसिंग यांच्या कालावधीतील, भारतातील सर्वात मोठे, राष्ट्रकुलस्पर्धा व स्पेक्ट्रम घोटाळे उघडकीस आलेले आपणा सर्वांना माहीती आहेच. या घोटाळ्याचे दोषी म्हणून कलमाडी व राजा यांचेकडे निर्देश केला जात आहे. जणूकाही फक्त हेच दोघे दोषी असल्याचे वातावरण आहे आणि सर्व माध्यमे पंतप्रधान मनमोहनसिंग कसे स्वच्छ चारित्र्याचे आहेत हे पुनःपुन्हा सांगत आहेत. त्यामुळे सामुहीक जबाबदारीचे तत्त्व वगैरे काही असते हे यांना लागू नाही का ?

वाटंतं....

लेखक अज्ञात यांनी रविवार, 06/02/2011 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यारात्री गवताच्या पात्यावरच्या दवाबिंदुला फुंकर मारून त्या ओघळणार्या मोत्यांना पाहताना... वार्याच्या खोड्यांमुळे नदीच्या हलणाऱ्या चंदेरी पदराला पाहून... पहाटेच्या गार वार्यात कासेला बिलगून पच पच आवाज करून दुध पिताना वासराला पाहून... मंदिराच्या धुपाने भरलेल्या गाभार्यात घंटानादात मंद तेवणाऱ्या सामायीला पाहून... सांजवेळी वाळूत हळुवारपणे पावलांना शिवून परत मागे पळून जाणार्या अल्लड लाटांना पाहून... एखाद्या तेजोवालायाधारी तपास्वीसारखा स्वतःच्या द्वैताची आहुती देऊन अद्वैत दिनकरला सागरात विलीन होताना साक्ष देताना... वाटतं आयुष्य इथेच थांबावं...
काव्यरस

दंडुके मारले पाहिजे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 06/02/2011 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पत्रकारांवर; खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर घसरले. ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे खोटेच दाखवतो; खरे काहीच दाखवित नाही. यांच्यावर गंडातर आणले पाहिजे.

खानदेशी चिकन करी

लेखक इरसाल यांनी रविवार, 06/02/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी कालच्या प्रयत्नाला मिळालेल्या प्रतिसादाला जागून आज एक नवा प्रयत्न. ह्या प्रयत्नाला आज घरी आलेले पाहुणेही कारणीभूत आहेत. माझी सहचारिणी चक्रधर पंथी कुटुंबातून आलेली असल्यामुळे सामिष भोजन तिला चालत नाही आणि माझ्याकडील सगळे नातेवाईक कट्टर मांसाहारी असल्यामुळे जेव्हा कोणी येते तेव्हा असले पदार्थ बनवायची जबाबदारी हि माझी असते. तर सादर आहे खानदेशी चिकन करी ........................ जरा आटोपशीर आहे म्हणून आणि सगळ्या पायऱ्यांचे प्रकाशचित्र घेवू शकलो नाही. अर्धा/पावून किलो कोंबडी, पाव वाटी खोबरे,२ मोठे कांदे, हळद, मीठ, जिरे , मोहरी, लसून , आले, तेजपत्ता, कोकणी मसाला , तेजपत्ता, गरम मसाला, थोडा

तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 06/02/2011 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता ---------------------------------- त्या दिवशी धडधडत्या ह्रदयाने ! तिला आय लव यू बोलून गेलो एक चॉकलेटी चुंबनने तीच होकार तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता......! जुहु बीचवर तिचा हातात हात घेऊन त्या बेधुंद मिठीत फिरताना विरघळतना क्षितजीशी समांतर एकरूप झालो आपण तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता...........! बाईकवरची माळ्शेज घाटावरची राईड कानाशी रुन्ज्णारा तुझा उष्ण श्वास ओली चिंब मिठी आणि ओला आसमंत मस्त अनुभवलेली वाफाळ चहाची कटिंग तेव्हाही तो पाऊस वेगळाच होता...........! पुढे थंड पावसात कारगिल मधे लढणारे जवान पाहिले !
काव्यरस