"परराष्ट्र" मंत्री श्री. एस एम कृष्णा
श्री. एस एम कृष्णा यांनी नुकतेच "परराष्ट्र मंत्री" म्हणजे "परराष्ट्राचे" मंत्री पण ठरू शकतो हे अनावधानाने दाखवून दिले.
झाले असे, संयुक्तराष्ट्र सुरक्षा समितीच्या सभेपुढे चर्चेदरम्यान बोलताना पोर्तुगालच्या परराष्ट्र मंत्र्याचेच भाषण साधारण तीन मिनीटे वाचले. युनो मधील भारतीय प्रतिनिधी श्री. हरदीप सिंग यांनी नंतर चूक लक्षात आणून दिली.
अपेक्षेप्रमाणे माध्यमांना आणि विरोधीपक्षाला खुराक मिळाला. मात्र श्री. कृष्णा म्हणाले, "नॉट अ बिग डील! नथींग राँग".
मिसळपाव
