Skip to main content

ब्रिगेडी वृत्ती

लेखक अँग्री बर्ड यांनी बुधवार, 02/03/2011 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिगेडी वृत्ती जेवढी वाढत आहे तितकाच क्लेश महाराजांच्या आत्म्याला होत असेल नाही का ?

प्रसिद्धी

लेखक वपाडाव यांनी बुधवार, 02/03/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी मुद्दामच लेखाचं नाव अर्धवट ठेवलं. नाहीतर वरूनच कळुन जायचं कि आत काय लिहिले आहे.

सराईत

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 02/03/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा सुंदर लागलाय स्वर वगैरे.. सगळं कसं छान चालू आहे हसतमुखानं यशाच्या छटा मोजत मस्त सरकतोय दिवस. माझ्याकडे यांव आहे आणि मी त्याला त्यांव दिलं. हिशोबाच्या कागदाचा मनात लागलाय ढीग. थुंकी झेलणारे झेलतायत.. असुयेच्या आठ्या सुखावून जातायत . मित्रांचाही आहेच की घोळका... सगळं कसं छान चालू आहे . मारायला शिकतोय की नकोसे विचार, हव्याशा प्रलोभनांच्या बदल्यात. खूप ताकद आहे अजून.. लांब धाव घ्यायची.. जवळच्या नात्याची मिठी फक्त सोडवायची सुखाच्या व्याख्या बदलतायत, नजर अजून रुंद होतेय.. घाव अजून खोल. जल्लोष होतोय धुंद.. दरडावून विचारणारा आवाज क्षीण होत जातोय. प्रशस्त होतायत रस्ते...
काव्यरस

महाशिवरात्रीनिमित्त --- रताळे खिस--

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 02/03/2011 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- दोन मध्यम आकाराची रताळी, एक चमचा तूप, दोन चमचे शेंगदाणा कुट, मीठ, साखर चविनुसार, तिन-चार मिरच्या. कॄती-- प्रथम रताळे स्वच्छ धुवुन-पुसुन घ्या, नंतर खिसुन घ्या, कढईत तुप गरम करुन त्यात थोडेशे जिरे(चालत असल्यास) घालावेत, तडतडले की मिरच्या तुकडे टाकावेत, खिस टाका, त्यात मिठ व साखर घाला, त्यावर झाकण ठेवा, खिस चांगला वाफ़ेलला की त्यात थोडे कुट टाका, पुन्हा परता, गरम गरम खायला घ्या...

त्रिवेणी - पहीला प्रयत्न

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 02/03/2011 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणी या गुलजारजीनी निर्माण केलेल्या नविन काव्यप्रकाराबद्दल (आता तसा जुना झाला आहे!) खुप वाचले. लिहायचा मोह झाला. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडीशी माहीती: तीन ओळी असतात. तिसरी ओळ ही पहील्या दोन ओळींना पुढे नेणारी किंवा कमालीचा विरोधाभास असणारी आणि ती वाचल्यानंतरच खरा दोन ओळींच्या मागे दडलेला अर्थ उमगावा अशी असते. १. आधी येतो पाऊस.. मग तुझी आठवण.. . . . अंती शिल्लक राहतो तो मृदगंधच... २. तू, मि, पाऊस..

समर्थ रामदासांनी वन-बागा निर्मितीसाठी केलेले काव्य...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 02/03/2011 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, खालील फोटो पहाण्यात आला. त्यातील संत रामदासांनी परळीच्या मठस्थापने करता बागा व वने निर्माण करण्यासाठी विविध २६० ( प्रत्येक ओवीत सरसकट १० नावे असे धरले तर २६ ओव्यात) झाडांची माहिती देऊन केलेले मार्गदर्शन रंजक वाटले. मिसळपावच्या खाऊभाऊंना हा काव्य-फलाहार आवडेल. त्यातील सध्या ज्ञात नसलेल्या वनस्पतींची माहिती काही मिपाकर देतील तर काहींना त्यातील दुर्मिळ वनस्पतींचे फोटो सादर करायला प्रेरणा मिळेल असे वाटून डॉ.
काव्यरस

अल्बम

लेखक टारझन यांनी बुधवार, 02/03/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
णमर्स्कार्स फोक्स , "अल्बम " ! हा शब्द वाचल्यावर किंवा आठवल्यावर कोणाच्या मनात जर फोटोंचा अल्बम सोडुन जर आजकालचे ऑडियो-विडियो अल्बम येत असतील तर .. तर काही नाही हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे ( उगाच जड जड डायलॉग्ज ने कशाला सुरुवात करा ? ) प्रत्येकाला बर्‍याचदा असं वाटत असावं , हा काळ जर इथेच थांबवता आला तर ? ही वेळ सरु च नये ! अर्थात ह्या आपल्या सुखी काळातल्या इच्छा असतात.

जिद्द जगण्याची

लेखक निनाव यांनी बुधवार, 02/03/2011 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या चाळी च्या तिसर्‍या मजल्या वरची ती त्याची खोली! लाकडी जिना जातो नं?..त्याला लागून असलेली.. दोन वयातल्या मुली त्याला..माय नसलेल्या तारुण्याचा आवाज लपवत... ओल्या भिंत्यांच्या मागे जगण्याचा प्रयत्नात.... तिन कोणात मिळून चौकोनी कुटुंब.. दिवसा वळते अगरबत्ती, होतात शिकवण्या अन मेहंदी चे वर्ग रात्र पिळते दोरा-फॉल-पिको वर येता घरी मग, त्याची हाडे वाजतात मधेच, टेकताच त्या लुळ्या कॉट वर जिद्द जगण्याची अधिकच स्पष्ट होते दर रात्री 'गीत-माला' -ऐकता रात्र मग होते लयबद्ध त्या १०० वॉट च्या पिवळ्या प्रकाशातही मग.. तरूणाई कशी रंगीत स्वपन सारे बघते... भरलेल्या बेड वरचा सामान सारुन बाजुला दुमडलेल्या अंगा

पहिला पहिला क्रश ......

लेखक पियुशा यांनी बुधवार, 02/03/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पहिला क्रश ...... प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येत्तोच (अपवाद वगळता) आमच्याही आयुष्यात हा दिवस तसा जरा लवकरच आला असेच म्हणावे लागेल . त्यावेळी मी नववीत असेन ,आमच्या धिंगाणेबाज कंपूत आम्ही ५-६ मुली होतो आमच्या वर्गात दोन मॉनिटर होते एक मुलांचा ,आणि एक मुलींची ,(ती मी होते ) त्यामुळे काही मुली माझ्यावर नेहमी खार खाऊनच असायच्या वर्ष संपत आले होते जवळ जवळ, पण ग्रुप मधल्या काही मुलीन मधला बदल थोडा उशिराच लक्षात आला माझ्या ! म्हणजे तमुक तमुक मुलगा दिसला कि चोरून चोरून स्मैलींची देवाणघेवाण.......