Skip to main content

वाट तुझी पाहात

लेखक निनाव यांनी मंगळवार, 08/03/2011 05:20 या दिवशी प्रकाशित केले.
वाट तुझी पाहात आज असा काय बसलो मी बोलविले त्याने मज अन जाणेच विसरलो मी तु जाताच अंधार अन दिवा शोधत बसलो मी शोधता-शोधता मग असा उजेड विसरलो मी तुलाच विसरण्यास आज पिण्यास बसलो मी प्यायलो असा आज अन दर्याच विसरलो मी तुझ्या आठवणीं संगे आज बोलत बसलो मी तु येताच समोर मग बोलायचेच विसरलो मी आज होतो न सोबत असा एकटाच बसलो मी सवय जडली अशी मग सोबतच विसरलो मी

पुनश्च हनीमून

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 07/03/2011 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुनश्च हनीमून कथा कादंबरी लेखनाची प्रक्रीया नक्की काय असते याबद्दल बरीच मते आहेत. काहींच्या मते लेखन हे माणसाच्या भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील स्वप्ने यांचे बेमालून मिश्रण असते. त्यात वर्तमानदेखील मिसळलेला असतो. लेखक त्याच्या भूतकाळ भवीष्यकाळ आणि वर्तमानकाळापासून वेगळा अलीप्त राहू शकत नाही. लेखक लिहीताना त्याचे लिखाण जगत असतो. या लिखाणाच्या प्रवाहाला खीळ बसते ती ;तो त्याच्या लिखाण जगण्यापासून अलीप्त झाल्यावर. आपण याला रायटर्स ब्लॉक म्हणतो. रायटर्स ब्लॉक बद्दल यापूर्वी माध्यमातून बरीच चर्चा झालेली आहे.

दुनिया फुलांची

लेखक Manish Mohile यांनी सोमवार, 07/03/2011 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
फुलांची छायाचित्रे - काही ओळखीची तर काही अनोळखी. जास्वंद : - जास्वंद परागतंतू : - सदाफुली : - निळी गोकर्ण : -

शरण...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 07/03/2011 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
सांग सखे कसा आवरू मी बुडण्याचा मोह खुणावत आहेत मजला तुझ्या नयनीचे डोह नको लवून पहाटे अशी वेचू ... सखे... फुले मन उगाच बांधती मग... तुझ्या झाडी ... माझे झुले केली सगळी तयारी मनी एकच हा ध्यास कधी करायचा सांग... सात पावलांचा प्रवास सांग कधी पडतील हव्याहव्याश्या त्या गाठी ... अन माझ्या नावाभोवती तुझ्या नावाची ग मिठी आता नको नाही म्हणू, आता नको मागे फिरू, आलो तुला मी शरण माझ्याशिवाय तुझ्या जगण्यात, आपसूक माझे मरण ... माझे मरण

शर्यत रे जिंकली!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/03/2011 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
"कासव' हा काही उत्साहानं पाहायला जाण्याजोगा प्राणी नाही. मुलांनाही ससा आणि हत्ती-वाघाची जेवढी क्रेझ वाटते, तेवढी कासवाबद्दल वाटण्याची काहीच गरज नाही. एवीतेवी पडला हळू चालणारा, सगळ्यांच्या मागे असलेला आणि कुणाच्या अध्यात-मध्यात न येणारा प्राणी. पण वेळासच्या महोत्सवानं कासव ही सुद्धा पाहण्याची गोष्ट असते, हे सिद्ध केलं. आम्ही वेळासला गेलो, तर किनाऱ्यावर नुसती कासवाची पिल्लं पाहायला दीड-दोनशे पर्यटक मुंबई-पुणे, अन्य कुठल्या कुठल्या शहरांतून आले होते! एका सहकाऱ्यानं ही टूम काढली होती. मलाही बऱ्याच दिवसांत कुठेतरी उलथायचं होतंच. त्यामुळं सहकुटुंब जायचं ठरवलं. मंडणगडला आधी कधी गेलो नव्हतो.

वेज प्लॅटर

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 07/03/2011 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
veg वर दिलेल्या भाज्या वापरुन मला वेज प्लॅटर करुन हवय. माझ्यामते ऑलिव्ह ऑइलात भाज्या फ्राय करुन त्यावर त्यावर मिठ व काळी मिरी भुरभुरावी मग बटर सोडावे. पण भाज्या एवढ्याने शिजतिल कश्या हा माझा प्रश्न आहे. जाणकारांनी क्रुपया मर्गदर्शन करावे.

श्रीशिवरायाचा जयकार

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 07/03/2011 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीशिवरायाचा जयकार सह्याद्रीवर घुमतो अजून तुझ्या शौर्याचा हुंकार ... श्वासाश्वासातून निघतो श्रीशिवरायाचा जयकार ... म्लेंच्छांनी घातले घाव घाव मातृभूमी वरी .. परदास्याच्या अंधःकारातून पेटला स्वातंत्र्याचा रवी ... घेऊनी रामदासी मंत्र गर्जला हा नृसिंह असा ... दुमदूमला आसमंत सारा थरथरल्या दाही दिशा ... मावळे मराठे मर्द झुंजले अर्पुनी प्राण ... रोवले छातीत मोघलांच्या तेजस्वी भगवे निशाण ... तासिले कडे अभेद्य घडविले दुर्ग बेलाग ... सळसळती मनगटे मराठी अन् समशेर ओकते आग ... हिंदवी स्वराज्याचा ज्यानी थाटला सं
काव्यरस

धुक्यात हरवलेला तैलबैला

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 07/03/2011 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात हरवलेला तैलबैला
पावसाळ्यातला एकही विकएन्ड घरी बसायचे नाही असा विडाच उचलला असल्याने येत्या शनिवार-रविवार तैलबैल-घनगड असा बेत आखला होता. कमी जास्त होत होत अखेरीस ९ शिलेदार तयार झाले. आमच्या कुठल्या ट्रेकमधे व्यत्यय आला नाही, असे झाले तर शपथ !! ५ जुलैच्या भारत बंदचा वचपा आमच्या कंपनीने शनिवारी "वर्कींग" ठेऊन काढला होता.