Skip to main content

सचिनला भारतरत्न द्यायला हवी

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 03/04/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र (मूळ इंग्रजी निरोप खाली दिलेला आहे) मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे. त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच.

सावरकरांचे , हिंदु पदपादशाही आणि इतर

लेखक मन१ यांनी रविवार, 03/04/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. नुकतच स्वातंत्र्यवीरांचं "सहा सोनेरी पाने" जालावरुन उतरवुन घेउन वाचलं. हे "सहा सोनेरी पाने" म्हणजे म्हणजे भारताचा इतिहास नव्हे तर इतिहासाची समिक्षा आहे. इतिहासाबद्दलची सावरकरांची कमेंट्री आहे.(जसं Discovery Of India नेहरुंच्या दृष्टिकोनातल्या प्राचीन ते अर्वाचीन भारतीय घटना आणि समाज मानसाबद्दलच मत -संग्रह होय.) इतिहासाबद्दल भाष्य करताना ह्या पुस्तकात त्यांनी बर्‍याचदा " हिंदु पदपादशाही" ह्या त्यांच्याच पुस्तकाचा उल्लेख केलाय. पण हे पुस्तक काही मला जालावर सापडलं नाही.

( पेटवी लंका हनुमंत )

लेखक अर्धवट यांनी रविवार, 03/04/2011 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या सामन्याच्या मानकर्‍यांसाठी आणि अर्थात आमच्या लाडक्या सचिनदेवासाठी हे कवन... गदीमांचे गीतरामायणातील मूळ काव्य इथे मिळेल. काल रात्रभर नाचुन विजयाच्या उन्मादातच लिवलं गडबडीत आहे, मीटर तपासू नये. काही कडव्यांचा क्रम बदलला आहे, पण मुळ चालीवरच म्हणता येइल. (उद्या वेळ मिळाला की.. " देवहो, बघा 'माही'लीला...
काव्यरस

यांना विसरुन कसे चालेल ?

लेखक कुंदन यांनी रविवार, 03/04/2011 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही आम्ही सर्व जनता विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद लुटत असताना , मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या मुंबई पोलिस दलाला प्रचंड तणावाखाली काम करावे लागलेले असणार आहे. ही सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल त्यांना सलाम. या संबंधीची एक बातमी "इथे"

भारतीय संघाचे अभिनन्दन

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 03/04/2011 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय क्रिकेट संघाने १९८३ नंतर आज वर्ल्ड कप जिंकला. विश्वचशक स्पर्धेतील गेल्या तीन मॅचेस मध्ये ऑस्ट्रेलीया पाकिस्तान च्या चित्तथरारक लढतीनंतर फायनल ला श्रेलंकेविरुद्ध महत्वाची मॅच जिंकून भारताने विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडुंचे अभिनन्दन. भारतीय संघ पुर्वी चांगल्या अवस्थेतून अडचणीत येण्यासाठी प्रसिद्ध होता. पण या विश्वचषक स्पर्धेत मात्र भारतीय संघ अडचणीवर मात करून अत्यंत टेन्स सिच्यूएशन असतानाही तणावावर मात करून जिंकू शकतो हे दाखवून दिले. आजच्या मॅचमधले तुम्हाला आवडलेले काही क्षण सांगा. मला आवडलेले काही १) धोनीने मारलेला शेवटचा षटकार...त्यावेळेस चेंडूसिक्सरसाठी त्याच्या च

क्रिकेट विश्वचषक - २०११ 'अभिनंदन'

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शनिवार, 02/04/2011 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आय सी सी क्रिकेट विश्वचषक - २०११ जिंकल्याबद्द्ल भारतीय क्रिकेट संघाचे मनापासुन अभिनंदन! आपण एक इतिहास घडवलेला आहे! एक स्वप्न सत्यात उतरले! - (अतिशय आनंदी) इंट्या.:)

दाणे पडले टप टप टप

लेखक विदेश यांनी शनिवार, 02/04/2011 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
दाणे पडले टप टप टप चिमण्या गोळा पट पट पट चिव चिव करता टिपती दाणे टिपता टिपता म्हणती गाणे या रे पिलांनो जवळी या आपण गाणे गाऊ या घरटे काडयांनी सजवू दाणे पोटापुरते जमवू हाव नको ती जास्तीची सवय करू या कष्टांची चोच दिली ज्या देवाने घास ठेवले समोर त्याने आभार त्याचे मानू या चिव चिव गाणे गाऊ या

वर्ल्ड कप पेश्शल झटपट कोळम्बी

लेखक गोगोल यांनी शनिवार, 02/04/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गणपाय प्रसन्न: || साहित्य: १. ५०-६० मोठ्ठ्या कोलंबी २. १.५ चमचा जिरा पाउडर ३. १.५ चमचा कोथिंबीर पाउडर ४. २.५ चमचा गरम मसाला. ५. एक मोठ्ठा कांदा ६. एक मोठ्ठा टोमॅटो ७. एक मिर्ची. ८. हळद, मोहरी ई ९. एक लिम्बू कृती: १. एका भांड्यात कोलंबी ठेवून त्यावर जिरा, कोथिंबीर पाउडर टाकून अख्खे लिंबू पिळून घ्या. हे मिश्रण चांगले मिक्स करून दोन ते तीन तास मूरत ठेवा. २. कोलंबी मुरेपर्यंत कांदा, टोमॅटो आणि मिरची बारीक कापून घ्या. ३. एका मोठ्ठ्या जड बूडाच्या भांड्यात थोडे तेल तापवा.

चिकन भुजिंग

लेखक गणपा यांनी शनिवार, 02/04/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी थोड्याश्या विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी हजर आहे. आज मी आपल्यासाठी खास वसई-विरार आणि आमच्या गावाकडला पेश्शल पदार्थ घेउन आलोय. भुजिंग. वसई ते डहाणु पट्ट्यातला भुजिंग न चाखलेला खवय्या विरळाच असावा. निखार्‍यावर पदार्थ भाजण्याच्या प्रक्रियेला आमच्या वाढवळ भाषेत भुजणे म्हणतात. आणि या भुजण्याला इंग्रजीची (.....ing) जोड देउन जी क्रिया होते ते हे भुजिंग. थोडक्यात मराठीतच सांगायच झाल तर बार्बेक्यु. माझ्या गावा जवळच मुंबई अहमदाबाद महामार्गावर (चारोटी नाक्याच्या थोडस पुढे) आई महालक्ष्मीच मोठ्ठ आणि प्रसिद्ध मंदिर आहे. दर वर्षी हनुमान जयंतीला इथे १५ दिवस आईची यात्रा भरते.