Skip to main content

थोडे पाडव्या बद्दल......

लेखक Antarang यांनी सोमवार, 04/04/2011 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा. वरील सर्वे सभासद,वाचक बाधंवाना पाडव्याच्या शुभेछा...... काय असतो.. हा पाडवा...? माफ करा मराठी माणसाला हा प्रश्न वीचारने म्हणजे घोड चुकच.. पण आपल्या इगंलीश्-मराठी उच्चारामुळे आपण त्याल गुडी - पाडवा म्हणतो पण खरा उच्चार गुढी-पाडवा असा... माहीतच असेल... हा हिंदु - मराठीतील चैत्रा-शुक्ल प्रतीपदातील एक महत्वाचा दीवस्...चैत्रातील पहीला दीवस आणि मराठीतील नववर्षाची सुरवात. पाडवा या शब्दाचा मुळ उगम हा प्रतीपदा या लुनार महीन्यातील पहील्या दिवसावरन आणि दुसरे साम्य.. "पागवाह" त्रिनीदाद आणि गुनवाया या केरेबीयन (वेस्ट-इन्डीस) बेटावरील ..

मी आणि बीपी

लेखक निशदे यांनी सोमवार, 04/04/2011 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
"मला हाय बीपी dignose झाले आहे." आणि मंडळीमध्ये गोंधळ माजला. पण या प्रस्तावानेकडे येण्याआधी अगदी जवळच्या भूतकाळात डोकावून पाहिले पाहिजे. १५ दिवसांपूर्वी: सोमवारी सकाळी उठल्यावर रेग्युलर कामे आटपली. या कामाना रेग्युलर म्हणायचे हे लहानपणापासून सर्व लोक म्हणत असल्याने मीसुद्धा त्यांना रेग्युलर कामे म्हणतो. पण हा शब्द मला मान्य नाही. रेग्युलर कामे म्हणजे ज्यामध्ये इनपुट ठरलेले आणि आउटपुट देखील ठरलेले. मात्र सकाळच्या कामांचे आउटपुट रात्रीच्या इनपुट वर ठरलेले असते. रात्रीचे इनपुट बिघडले कि सकाळचे काम रेग्युलर होण्याची शक्यताच नाही. एकंदरीत हा सगळा मामला गोंधळाचा आहे. असो.

नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 04/04/2011 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू
चला लवकर यारे सारे मराठीची गुढी उंच उभारू नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||धृ|| चला एक मोठी काठी आणू शालू बांधून तिला आपण सजवू हारकडे अन फुलमाळा हारकडे अन फुलमाळा बांधून वर एखादा लोटा घट्ट बसवू नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||१|| पाडव्याच्या शुभमुहुर्ती मंगल कार्य सुरू हो करती दारी तोरण अंब्याचे दारी तोरण अंब्याचे लावून अंगणी मंगल सडा चला शिंपडू नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||२|| उत्साहाचा वारा आता

sms

लेखक chipatakhdumdum यांनी सोमवार, 04/04/2011 02:30 या दिवशी प्रकाशित केले.
मला कृपया सांगा.. ३१ मार्च च्या मध्यरात्रीपासून भारत लंका फायनल बद्दलचा sms अख्ख्या भारतात फिरला, तो एकाही मिपाकराला मिळाला नाही काय ? मला आज संध्याकाळी मित्राने त्याच्या mobile वर १ एप्रिल ला आलेला तो sms दाखवला. नंतर आता रात्री माझ्या मुंबईत रहाणार्‍या मुलीने तिला काल सकाळी तोच sms आला होता अस सांगितल. त्या sms मधल ९५ टक्के prediction खर निघालेल आहे. वाद होणार असेल आणि भावना दुखावणार असतील तर कृपया हा धागा लगेच उडवून टाकावा ही विनंती.

आश्वस्त

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी रविवार, 03/04/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या रेताड रखरखाटात कोणास ठाऊक कशी चिकटून बसलीत ही पाती आणि कोण सोस त्या वा-याला सुद्धा ह्या जळजळाटात स्वतः तापत फुंकर घालण्याचा तरी मृगजळाला सुद्धा भास व्हावा मोरपिसांच्या रंगांचा? ह्या वेडेपणाच तू नाव आहेस कि कारण हे माहित नाही पण तुझा हात इथे फिरलाय हे नक्की…

हा ध्वजाचा अपमान नाही का?

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 03/04/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
काल वल्डकप जिकल्यानंतर स्टेशियम वर जो उन्माद बघायला मिळाला त्यात एक घॄणास्पद गोष्ट बघायला मिळाली. हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्‍यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला. सचिनने तर स्वत:ला राष्ट्रध्वजामध्ये शाली सारखे लपेटून घेतले होते. ही गोष्ट कितीजणांच्या लक्षात आली कुणास ठाऊक?.