Skip to main content

विश्वासाचं सार्थक

लेखक प्रास यांनी सोमवार, 25/07/2011 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी कोण, काय करतो, माझ्या कामाचं स्वरुप काय, अशा प्रश्नांना खरंच काही अर्थ नसतो. कुणीही, कोणत्याही व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त खोलात शिरून माहिती जाणून घेऊ इच्छित नाही. कारण प्रत्येकालाच तशी हौस नसते. एरवीही आपलं स्वतःच व्यक्तीगत जीवन घड्याळाच्या काट्यानुसार चालवायची सवय लागलेला माणूस कशाला कुणाच्या फालतू चौकशा करत बसेल? त्याला त्याच्या आयुष्यातल्या चिंता सतावत असताना इतर अनोळखी माणसांच्या दु:खाश्रुंना वाट काढून देण्यासाठी स्वतःचा खांदा देण्याची मनोवृत्ती आजकाल कुणी दाखवत नाही.

कलमाडींना स्मृतीभ्रंश??

लेखक विवेक मोडक यांनी सोमवार, 25/07/2011 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लाडके नेते मा.श्री. सुरेशभाई कलमाडीजी साहेबांना स्मृतीभ्रंश झाल्याचे तिहारच्या उपमहासंचालकांनी जाहीर केले आहे. Any comments??

'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय!

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 25/07/2011 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय! ही लिन्क पाहा http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,2084354_20843... 'बॅड-अ‍ॅस' वाईव्ह्स मधे एन्ट्री, रूपर्ट मर्डॉक ची बायको, टायगर वूड्स च्या रागात त्याच्या गाडीची तोडफोड करणारी बायको या लिस्ट मधे झाशीची राणी म्हणजे सन्मान! (पेलिनबाईही आहेत त्यात, पण या लिस्ट मधे त्यांचे असणे चुकीचे नाही.

[ज्योतिष] दिनांक ३१ जुलै २०११ रोजीची शुभ अमावस्या

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 25/07/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ३१ जुलै २०११ रोजी सायन सिंह राशीत ७ अंश १९ मि.वर होणारी अमावस्या गोचर हर्षल बरोबर नवपंचम योग करते. याशिवाय गोचर प्लुटो बरोबर quincunx () नावाचा एकच त्रासदायक योग करते, आदल्या दिवशी दिनांक ३० जुलै २०११ रोजी चंद्र-शुक्र युती होत असून ही युती हर्षल बरोबर नवपंचम योग करत असल्याने, ही अमावस्या बर्‍याच प्रमाणात शुभ ठरण्याची शक्यता आहे.

चित्र समिक्षा

लेखक सहज यांनी सोमवार, 25/07/2011 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना नमस्कार, नुकतेच आपले मिपाकर श्री चित्रगुप्त यांच्या समर्थ कुंचल्यातुन उतरलेले एक चित्र पहायचा योग आला. अतिशय सुरेख चित्र! दुवा येथे चित्र सुंदर आहे यात प्रश्नच नाही. परंतु चित्राबद्दल तिथे काही माहीती नाही. शिवाय आपले विलासराव म्हणतात त्याप्रमाणे चित्रकाराच्या मनात नेमके काय आहे, चित्राचा अर्थ काय हे कळत नाही.

खापरोळी व नारळाचा रस.

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 25/07/2011 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
हि एक पारंपारिक पाककृती आहे. साहित्यः-१) तीन वाट्या तांदुळ. २) एक वाटी उडीदडाळ. ३) अर्धी वाटी चणाडाळ. ४)पाव वाटी मेथीदाणे. ५) पाव चमचा हळद. ६)मिठ. कृती :-प्रथम तांदुळ,सर्व डाळी व मेथीदाणे ६-७ तास भिजत घालावे. नंतर बारीक वाटुन घ्यावे. व ८-९ तास झाकुन ठेवावे.

मुर्ग अचारी.

लेखक गणपा यांनी रविवार, 24/07/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या शनिवारी गटारी अमावस्या. म्हणजेच रविवार पासुन श्रावण लागणार. माझ्या सारख्या वार न पाळणार्‍याला काय ३६५ दिवस गटारीच. पण त्यामुळे माझ्यासाठी गटारीचं महत्व कमी झालय अस नाही. मी लहान असताना आमच्या घरी गटारीला खुप मजा असायची. बरेच नातेवाईक जमायचे आमच्या घरी. खाटकाकडे बरीच मोठी रांग असायची. म्हणुन बाबा पहाटेच जाउन मटण /चिकन घेउन यायचे. तोपर्यंत आम्हा चिल्ल्या पिल्यांकडे लसुण सोलणे, खोबरं किसणे अशी काम लागलेली असायची. आई दिदिची एकीकडे चहा-न्याहारीची धावपळ चालु असे. माम्या मावश्या वाटणं घाटणं आदी जेवणाच्या पुर्व तयारीला लागलेल्या असायच्या.

वास्तविक, काल्पनिक आणि .....

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 24/07/2011 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
पोस्टचं शीर्षक "वास्तविक, काल्पनिक आणि ....." वाचल्यावर काही मुद्रणदोष तर नाहीना अशी शंका कुणाच्या मनात डोकावण्या आधीच नमूद करू इच्छितो की असं काही नाहीय. वास्तविक म्हणजे जे प्रत्यक्षात घडतं. ज्यावर आपलं अत्यल्प नियंत्रण असतं ते सारं काही. या अफाट विश्वाचा आपण एक अतिशय नगण्य असा हिस्सा असतो. याउलट काल्पनिक म्हणजे सर्व काही आपल्या नियंत्रणात असणारं विश्व. या जगावर आपली शंभर टक्के हुकूमत असणारच. म्हणूनच तर वास्तवातला एखादा कफल्लकही कल्पनेच्या विश्वात भरार्‍या मारताना मर्सिडिझ किंवा रोल्स रॉईसमध्येही विराजमान असतो.