Skip to main content

झणझणीत कोल्हापुरी ठसका (चिकन)

लेखक पियुशा यांनी रविवार, 24/07/2011 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
झणझणीत कोल्हापुरी ठसका (चिकन) साहित्य ; १/२ कि. चिकन ,३ मोठे चमचे दही ,आल-लसून पेस्ट २ चमचे ,२ टोमॅटो बारीक चिरलेले ,१ कांदा चिरलेला ,कोथिंबीर ,तेल /तूप ३ चमचे वाटणासाठी : खसखस २ चमचे ,१ कांदा उभा चिरलेला , सुक्या खोबर्याचे काप १/२ वाटी, ३ - ४ लाल साबूत मिरच्या (अखंड ) धने १ चमचा ,दालचिनी तुकडा ,लवंग ३-४ ,काळी मीर ३-४ ,१ चमचा शहाजीर ,४-५ काजू तव्यावर थोड तेल घालून खसखस हलकी भाजून घ्या ,त्याच प्रकारे लाल मिरची ,खोबर्याचे काप ,धने व इतर गरम मसाले हलके भाजून घेणे हे मिश्रण थंड झाले कि याचे थोडे पाणी घालून वाटण करून घ्या . कृती : चिकनला दही ,हळद ,मीठ आणि आल लसून पेस्ट चोळून ३० -४० मिनिटासाठी मॅरीनेट करा . एका कढइत ३ चमचे साजूक तूप / बटर /तेल (तुमच्या आवडीनुसार ) घाला त्यात थोडा कांदा घाला ,कांदा परतला कि टोमॅटो घाला , आता आल लसून पेस्ट घाला ,थोड परतून घ्या ,१ चमचा लाल तिखट ,१ चमचा गरम मसाला आणि १ चमचा चिकन मसाला घाला परतून घ्या ,मीठ घाला. आता त्यात वाटण घाला, एकजीव करून घ्या मसाल्याला तेल सुटू लागल कि त्यात चिकनचे तुकडे घालून ५-६ मिनिट छान परतून घ्या . चिकन पूर्णपणे मसाल्याने माखल्या नंतर शिजेल इतक पाणी घाला, १०-१५ छान शिजू द्या ,लाल तरी आली कि कोथिंबीर घाला कोल्हापुरी चिकन भाकरी बरोबर सर्व करा :) ( तिखटाच प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी - जास्त ठेवा ) :)

वाचने 10996
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

पाभेंची, "वर्षभर प्रसिद्ध नारायणाचीव्रताची कहाणी आठवली". चांगलं आहे, चालूदे. पा़कृ पण चांगली असावी, फटू मात्र झ्कास.

पियुशा, पाकृ छानच! रस्सा झणझणीत दिसतोच आहे. पण तेलाचा वापर फारच सढळ हस्ते केलेला दिसतोय.

तेलाची तरी पाहुन ठसकाच लागला ;) पाकृ छान आहे पियुशा :)

मला तरी फोटो बघुनच ठसका लागला, सस्व व गणपा, रेशिपी प्रेझेंटेशनचे क्रॅश कोर्स घ्या त्याची अतिशय गरज आहे. मांसाहारी मिपाकरांनी विशेषतः कोल्हापुरी, या वरच्या पाक्रु मध्ये कोल्हापुरी असं विशेष आहे हे समजावुन सांगावे. अवांतर - बघा पटतंय का - एखादी खास, वेगळी, विशिष्ट पद्धतीनं केलेली रेसिपि वैग्रे असेल तरच इथं देण्यात आणि सांगण्यात जास्त मजा आहे असं माझं मत आहे. बाकी आधीच्या एक दोन धाग्यावर फोटोंबद्दल चर्चा झालेल्याच आहेत.

...सगळे ठीक आहे, 'झणझणीत'ला काहीच अडचण नाही, चालेल नव्हे पळेल, पण... तुमच्या परसात नुकतीच एखादी तेलविहीर वगैरे सापडली काय हो?

In reply to by पंगा

तुमच्या परसात एखादी तेलविहीर वगैरे सापडली काय हो? नाय प्रश्न म्हणुन ठीकच आहे. अवांतरही आहे. अनेको तास शिजवत असलेली ही डिश नसल्याने भरपूर इंधन लागते असाही सकृतदर्शनी अर्थ निघत नाही. जर हा प्रश्न वरील फोटोत दिसणार्‍या खाद्य तेलाच्या बाबत असला तर म्हणु इच्छितो की, सहसा परसात 'सापडणार्‍या' तेलविहीरीतले तेल हे इंधन म्हणुन वापरले जाते, खाद्य तेल म्हणुन नाही. हो कोणाच्या परसात खाद्यतेल बनवण्याकरता काही यंत्र असुही शकतात पण ती सापडली असे म्हणता येत नाही. तुमची स्वताची परसात खाद्य-तेल बनवायची सोय आहे का प्रश्न जास्त संयुक्तीक वाटला असता. बाकी आपल्या शब्दनशब्दचिकित्सक, विचारप्रवर्तक लेखनाचे आम्ही फॅन आहोत हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो. मिपाचा पाकृ कलाकारांना विनंती आहे की आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्राचा आदर आहे पण आजवर न आलेले व सहसा माहीती नसलेले किंवा वेगळ्याप्रकारे बनवलेले खाद्यप्रकारच लिहले तर आवडेल. पाकृ टाकायच्या आधी हीच पाकृ आधी मिपावर अन्य कोणी प्रकाशित केली आहे का नाही हेही पहावे.

In reply to by सहज

सहसा परसात 'सापडणार्‍या' तेलविहीरीतले तेल हे इंधन म्हणुन वापरले जाते, खाद्य तेल म्हणुन नाही.
इतके बचकभर तेल बघितल्यावर वाटले, की काढले विहिरीतून तेल, घातले चटकन... कोण जाणे, घालतही असतील... आम्हाला काय माहिती? *
हो कोणाच्या परसात खाद्यतेल बनवण्याकरता काही यंत्र असुही शकतात पण ती सापडली असे म्हणता येत नाही. तुमची स्वताची परसात खाद्य-तेल बनवायची सोय आहे का प्रश्न जास्त संयुक्तीक वाटला असता.
हम्म्म ती प्रक्रिया तेवढीही चटकन होणारी असेल असे वाटले नाही. म्हणजे चटकन काढले बचकभर तेल वगैरे. त्यापेक्षा विहिरीत म्हणजे कसे, रहाटगाडगे असले, की काढले गाडगाभर तेल नि ओतले... तसेही कोणाला कळतेय इथे? शेवटी 'चलता है, हिन्दुस्तान है' हेही आहेच, नाही का?
* ('कारण शेवटी आम्ही भटेंच! त्याला काय करणार?' - पु.ल. 'अघळपघळ'मधून उद्धृत.)

In reply to by पंगा

तुमच्या परसात नुकतीच एखादी तेलविहीर वगैरे सापडली काय हो? @ पन्गा तेल थोड जास्ती झालय हे मान्य ! तुम्ही कमी तेल वापरा ना सिम्पल ! हो ,आमच्या परसात तेलाची विहिर आहे हो ;)

डिश मस्त दिसते आहे. एखाद्या रविवारी करण्यात येईल. खसखस वापरून पाहिली नाहीये. आता करून पाहतो. भरपूर तेल असले तर भाजीला जरा मजा येते.

In reply to by पैसा

अहो पैसाताई काही शाकाहारी लोक कशालाच घाबरत नाहीत - असे गुगल सर्चवर डिटेक्ट झाल्याचे आढळल्याचे परा, सहज काकांना सांगत होता असे थत्ते चाचांनी चोता दोन यांना सांगतांना ऐक्ल्याचे सूत्रांमार्फत कळते असे आनंदयात्री पुपे यांना म्हणाला.

In reply to by निनाद

डिश मस्त दिसते आहे. एखाद्या रविवारी करण्यात येईल. खसखस वापरून पाहिली नाहीये. आता करून पाहतो. भरपूर तेल असले तर भाजीला जरा मजा येते.
शिजवलेले तयार चिकन-मटण याला देखील कोल्हापूर/मराठवाडा/विर्दभ/खानदेश इकडची मंडळी 'भाजी' असे म्हणतात.

In reply to by इंटरनेटस्नेही

पण मी मात्र एकुनच भाजीला जरा तेल असले की मजा येते असे म्हणत होतो. - भाजी अशा अर्थानेच. अर्थातच विषय समिष असल्याने त्याला तुम्ही म्हणता तसा अर्थ येत आहे - त्यालाही माझी हरकत नाही.

व्वा !! मस्त झणझणीत ठसका आहे कोल्हापुरी !

पाकृ बनवण्याचा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. पियुशा, जमतयं तुला हळु हळु!

In reply to by स्पा

@ स्पावड्या, तुमच्या येथे श्री कृपेकरून, सपक, टुकार, राजकारण आणि जातीवरून वादविवाद करणाऱ्या धाग्यांचा किरकोळ, तसेच घाऊक दरात बाजार उठवल्या जाईल, असं असेल तर या झणझणीत धाग्याच्या का मागं लागलाय आता.

In reply to by ५० फक्त

झणझणीत धाग्याच्या का मागं लागलाय आता
धागा झणझणीत आणि तेलकट्ट(पण) असल्याने श्री स्पा हे या धाग्याच्या मागे लागलेले दिसतात. बाकी शाकाहारी असल्याने मांसाहारी पाककृतीला तेल कितपत लागते हे मी सांगू शकत नाही. जाता जाता फक्त एक निरीक्षण नोंदवले इतकेच. बाकी गणपा आणि सास्वकडून प्रेझेटेंशनचे क्र्याश कोर्स घ्यायला हरकत नाही.

पाककृती फारच मस्त दिसत आहे. तेलाच्या वापरावर विचार करावा लागेल. पण झणझणीतपणा 'ठसकेबाज' दिसतोय. त्यानेच तोंडाला पाणी सुटले आहे.