Skip to main content

मदत : दुवा कसा द्यावा?

लेखक गणपा यांनी गुरुवार, 04/08/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
दुवा (लिंक) कसा द्यावा? काही नवीन सदस्यांना भेडसावणारा अजुन एक प्रश्न म्हणजे एखाद्या गोष्टीचा दुवा कसा द्यावा. माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न करित आहे. (हीच एकमेव सोप्पी पद्ध्त आहे असा माझा मुळीच दावा नाही.

पातोळ्या.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 04/08/2011 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज नागपंचमी.श्रावणातील पहिला सण.नागोबाची पूजा झाली. नैवेद्याला अळुची भाजी व पातोळ्या महत्वाच्या. मागे मी पातोळ्याची कृती दिली होती.पण बर्‍याच जणांनी फोटो न टाकल्यामुळे प्रतिसाद दिला नव्हता. तेव्हा आज पातोळ्याचा फोटो. गणपाभौना एक विनंती.मला या पाककृतीचा 'दुवा' द्यायला येत नाही.तेव्हडा द्याल कां?.

हानाबी (花火)

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 04/08/2011 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
जपानी माणूस हा हाडाचा ‘सोशिअल ऍनिमल’ आहे. काहीतरी कारण शोधून जथ्थ्याने एकत्र येउन साके आणि खासकरून बीयरच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवत जीवनाचा आनंद लुटणॆ हे त्यांच्या रक्तातच आहे. असाच एक सामजिक सोहळा म्हणजे हानाबी - ‘फटाक्यांची आतिषबाजी’. हे जपानी फारच कलासक्त असतात त्यांची लेखी लिपी 'कांजी' हे त्याचे प्रतिक आहे. एक कांजी म्हणजे एक शब्द असतो. ह्या कांजी एकापुढे एक जोडून नवीन शब्द तयार होतात. हानाबी, 花火 हा शब्द हाना (花) म्हणजे फुल आणि बी (火) म्हणजे आग ह्या दोन कांजींनी बनला आहे त्याचा अर्थ - आगीची फुले.

भरलेली भेंडी

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 03/08/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पाव किलो भेंडी, देठ काढून, मधे चिर देणे २ छोटे कांदे पातळ उभे चिरलेले १ चमचा हळद १ चमचा आमचूर पावडर २ चमचे लाल तिखट २ चमचे धणेपूड २ चमचे जिरेपूड २ चमचे गरम-मसाला २ चमचे बडीशेप-पूड मीठ चवीनुसार १ चमचा कलौंजी ३-४ चमचे बेसन तेल . पाकृ: प्रथम सर्व मसाले व मीठ एकत्र करून घेणे. भेंडीला मधोमध चिर दिली आहे त्यात हा मसाला दाबून भरणे.

सोलकढी

लेखक जागु यांनी बुधवार, 03/08/2011 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य १ ओला नारळ खरवडून. १५-२० कोकमे (आमसुल) ४-५ लसुण पाकळ्या (ऑप्शनल) १ चमचा जिर तुप कढीपत्ता साखर मिठ मिरची पुड पाव ते अर्धा चमचा पाककृती कोकमांमध्ये पाणी घालुन ती उकळवत ठेवा.

<कायकू>

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 03/08/2011 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा ............. सांगायलाच पायजे का? शिग्रेटी फुंकशी पेग पटीयाला दुबार रीपीट... पहीली धारा वर्दळ सैरावैरा उत्साही बाटल्या चखणा हातात ग्लास रीकामा बाटली सैरावैरा पाऊल अडखळे आधार अनोळखी द्वारपालाचा बोलला पती बायको वोवाळी हैराण शेजारी ऐसेची हायकू मिपावरी लोक लिखतेच कायकू?
काव्यरस

हैदराबादमध्ये भेटूया का?

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 03/08/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, लोकायत संस्थळ समूहाचे सन्माननीय संचालक श्री. नीलकांत हे ऑगस्ट महिन्यातील तिसर्‍या रविवारी (२१/२२ तारखेस) हैदराबाद मुक्कामी येणार असल्याचे समजते. ही सुवर्णसंधी साधून त्यांच्या समवेत हैदराबाद येथे शनिवार दि. २१ ऑगस्ट २०११ रोजी समस्त मराठी संस्थळ बंधू-भगिनींचे एक स्नेहसंमेलन करावे असा एक विचार होत आहे. हैदराबाद येथे असे स्नेहसंमेलन आयोजित केल्यास त्यास किती जण उपस्थित राहू शकतील? आणि त्याचे स्वरूप काय असेल? याचा आराखडा तयार करण्यासाठी मी हे प्राथमिक निवेदन देत आहे.

ड्रीमकॅचर

लेखक चित्रा यांनी बुधवार, 03/08/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
काळपट ओट्यावरून पाण्याचा हात फिरवून झाल्यानंतर रात्रीच्या अंधारात तिने पाहिले खिडकीबाहेर ते स्वप्न खुणावत अजून उभेच होते - ** पलंगावर टाकून आपले श्रांत क्लांत अंग भिंतींवरून सरकणार्‍या गाड्यांच्या सोबतीने झोपण्याआधी तिच्या लक्षात आले स्वप्न आत येऊ पाहत होते लगबगीने ** उठून तिने स्वप्नांची काढली गाळणी ठेवणीतली लटकावून दिली बेडरूममधील खिडकीवर. कुशीवर मग वळून तिला झोप कधी लागली कळलेच नाही.
काव्यरस