सह्याद्रीच्या कुशीत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा
१५ ऑगस्ट सोमवार, म्हणजे जोडून सुट्ट्या आणि आमच्या सारख्या भटक्यांसाठी पर्वणी. पण नेमकी शनिवारी राखीपौर्णिमा आल्याने अखिल डोंगरयात्रा भगिनी मंडळामधल्या समस्त भगिनींनी वाडेश्वर मधे बैठा सत्याग्रह (मी त्याला खाद्याग्रह म्हणीन) मांडला. आणि जीवधन किल्ल्याला फाटा देऊन तीन दिवसांची मोहीम २ दिवसांवर आणली. या दोन दिवसात आम्ही दहा टाळकी कुकडनेरात (कुकडी नदीच्या खोर्यात) यथेच्छ भटकणार होतो. मी, श्रीकांत, शितल, प्राजक्ता, वृंदा, सतिश, प्रियांका, राहूल, गौरव आणि मयूर असा फौजफाटा जमा झाला होता.
शनिवारी पहाटे ५.३० ला साखर झोपेत लवंडलेलं पुणं सोडलं आणि नाशिक हमरस्त्याला लागलो.
नानेघाटाचा पायथा.(फोटो दिसतात आता. :) )
पावसाळ्यात कुठे फारसं भटकण झालच नव्हतं, खरतर वेळाही नाहीये सध्या, पण बाहेर पाउस पडत असताना घरात बसुन रहायचं म्हणजे जरा अत्याचारच वाटतात स्वतःवर, सह्ज म्हणुन शुक्रवारी रात्री जुन्या मित्राला, जयंत भट्ला फोन केला. बोलता बोलता प्लॅन ठरला- सकाळी सहाला निघायचं, दोन वाजोस्तर परतु डोंबिवलीत..
जयंतला घेवुन सहाला निघायच हे जरा कठीणच होत, मी ५.४५ ला त्याला उठवायसाठी कॉल केला, फार अपेक्षा नव्हती पण फक्त ४५ मिनिट उशिरा म्हणजे, ६.४५ ला तो त्याची नवी मांझा घेवुन हजर झाला. गाडीत पेट्रोल भरुन कल्याण सोडता सोडता अर्धा तास गेला..
हे गणराज्य की धनराज्य?
हे गणराज्य की धनराज्य?
प्रजापतीही प्रगल्भ झाला, पक्व झाली जनशाही
मतपेटीतून गेंडा जन्मला, धन्य झाली गणशाही...!!
एका-एकुल्या 'व्होटा'साठी, थैली - थैली नोटा
कुणी पिलवती इंग्लिश-देशी, कोणी हाणती सोटा
कोणी करिती लांगूलचालन, कोणी लोटांगण जाती
भले-शहाणे-सुविद्यही खाती, जातीसाठी माती
सदाचाराचा मुडदा पडतो, मदांध उन्मत्तशाही...!!
डांबर खाती,सिमेंट खाती, जणू चरण्यासाठी सत्ता
क्षणाक्षणाला टनाटनाने, वाढवीत नेती धनमत्ता
किडूक-मिडूक दिल्या बिगर ना, कचेरी कार्यसिद्धा
उद्दामाला दिवस सुगीचे, सत्याच्या माथी गुद्दा
नेकी इमान पांचट झाले, भरात आली बलशाही ...!!
विषा कवळते प्रजा बिचारी, ना सुलतान
क्रांतीच हवी,मात्र
(दै. कृषीवल मध्ये साप्ताहिक स्तंभ लिहितोय ..त्यातलाच हा या आठवड्याचा लेख ..स्वातंत्र्यदिवस, आण्णा आणि सारे वातावरण या सार्याच्या निमित्ताने .. )
६४ वा स्वातंत्र्यदिन... जवळपास दिवसाला एक याप्रमाणे भ्रष्टाचाराचे एक-एक प्रकरण बाहेर येत आहे. गोळीबाराच्या बातम्या, राजकीय धुळवड, अतिप्रचंड महागाई, तुम्हा-आम्हा सामान्यांचे जीणेच हराम झालेले. दुर्दैवाने आज अशीच परिस्थिती आहे. अशात कोणीतरी झटकन म्हणून जातो, ‘आता क्रांतीच व्हायला हवी राव...’ बरोबर आहे ते. पातळी एवढी खालावली आहे सार्याचीच की, आता हे सगळं उलथवायला हवंच. खरंच गरज आहे क्रांतीची; पण कसल्या?
अब्जावधी लोकांचा देश आपला.
वृद्ध मातापित्यांची समस्या
एकत्र कुटुंबपद्धतीच्या घरांमधे वृद्धांचा प्रश्न फारसा त्रासदायक नव्हता. पणज्या, आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मुलं, नातवंडं सगळीच मंडळी एका घरात रहायची. घरात अनेक माणसं असल्यामुळे वृद्धांना एकटेपणा काय ते माहित नव्हतं, घरातले कर्ते पुरूष पैसा कमावण्यासाठी घराबाहेर असायचे, स्त्रिया घर चालवण्याच्या (ज्याला आपण आता बॅकएंड किंवा पडद्याआडची कामं म्हणू शकतो) कामात गर्क असल्या तरी पोरांकडे लक्ष द्यायला आजी-आजोबा होतेच, अतिवृद्धांची काळजीही घरात घेतली जायची.
औद्योगिकीकरणानंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली.
वारी - सज्जनगड
बरेच दिवसांपासून सज्जनगड ला जायचे मनात होते, पण योग जुळून येत नव्हता,योगिराणाकागदावर उतरल्यापासून तर हि इच्छा प्रबळ झाली, आता काही झाले तरी जायचेच, एकट जाव लागल तरी बेहत्तर.
अशाच एका संध्याकाळी सूड शी याबद्दल बोललो, त्यानेही चक्क एका फटक्यात येण्याची तयारी दाखवली, धाग्यावर किसानाही येतो असे म्हणाला होता, त्याला फोन केला, तो हि यायला तयार झाला, मग फटाफट बाकी मिपाकर ट्रेकरमित्रांना बोलावण धाडल, पण नेमके सगळे कुठल्या न कुठल्या कामात अडकलेले होते, शेवटी आम्ही तिघच निघालो.
ठाण्याहून सातारा पर्यंत बस च आरक्षण केल्या गेल होतंच :)
रात्री १२ ची बस होती,
मिसळपाव
