ब्रजवासी जगन्नाथ
खरं तर जगात जितकी म्हणून ठिकाणं आहेत ती सगळी त्रिलोकपति भगवंतांचीच आहेत आणि आपल्या परमात्मस्वरूपात तेच सर्वत्र विराजमान असतात. असं असलं तरीही त्यांना जितकी ब्रजभूमी प्रिय आहे तितकी बाकी कोणतीही जागा नाही. ते स्वतः जगभरात त्यांच्या निरनिराळ्या रुपात उपस्थित असतात पण त्यांच्या अशाच एका ब्रजभूमीपासून दूर असलेल्या विग्रहरुपामध्ये ब्रजवासाची तीव्र इच्छा जागृत झाल्यास ती काही आश्चर्याची बाब म्हणताच येणार नाही.
सुमारे दोनशे वर्षांपूर्वी यमुनानदीकाठच्या ब्रजवासाची - ब्रजभूमीमध्ये निवास करण्याची इच्छा झाली पुरीच्या जगन्नाथांना!
मिसळपाव