Skip to main content

तीन विरंगुळ्या

लेखक विदेश यांनी सोमवार, 19/12/2011 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दूरदर्शनवर जाहिराती भारंभार - सिरीयल बघतांना भाजी करपते फार ! आता नव्या नवरीचे लक्ष फेसबुकावर - मित्र जमती पाच हजार पोळ्या जमेनात चार ! पडूनिया खाटेवर वाचते चारोळ्या चार - कित्ती अरसिक नवरा जांभयांनी करि बेजार !
काव्यरस

घालमेल .. भाग १

लेखक navinavakhi यांनी सोमवार, 19/12/2011 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच निर्णय आता दैवाच्या हवाली करणे चालले होते. मनाची घालमेल संपता संपत नव्हती. त्यात रोज एक वाईट बातमी कानावर पडत होती. रोज कुणीतरी देवघराच्या वाटेवरचा वाटसरू बनत होते. ना त्यांचे वय झाले होते, ना आजारपण त्यांच्या आसपासही पूर्वी फिरकले होते; तरीदेखील ह्या घटना घडत होत्या. त्यांच्या आप्तेष्टांचे काय हाल होत असतील, हा विचार करून मेंदूचा भूगा होत होता. शेवटी स्वतःच मनाला समजावून दैनंदिन कामे उरकली जात होती. शिवाय माझ्या आयुष्यात अनपेक्षित घडामोडी घडणार होत्या. त्याची चाहूल खूप तीव्रतेने व्हायला लागली होती. माझा मात्र खूपच वेगळ्या पातळीवर विचार चालू होता.

ने मजसी ने परत मातृभूमीला.... सागरा प्राण तळमळला..!

लेखक अमृत यांनी सोमवार, 19/12/2011 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतच काही दिवसांपूर्वी अंदमानला जाण्याचा योग आला. कार्यालयीन काम असल्यामुळे केवळ दोनच दिवस तिथे राहण्याचे ठरले होते (वरून संमती मिळाली होती). कार्यालयातर्फे राहाण्याची व प्रवासाची सोय करण्यात आल्यामुळे तसा निश्चिंत होतो पण तरी एकटेच जावे लागणार म्हणून थोडा नाराजसुध्हा होतो. तिथली भाषा कोणती यावर तीन वेगवेगळे इनपुटस मिळाल्याने आणखीच गोन्धळलो. तर हैद्राबाद ते चेन्नै १तास आणि तिथुन विमान बदलुन पोर्ट ब्लेअर २तास असा एकूण प्रवास . पोर्ट ब्लेअर करिता चेन्नैवरून केवळ तीनच फ्लाइट्स आहेत; इन्डिअन एअरलाएंस, किंगफिशर आणि जेट. त्यासुद्धा सकाळि १० वाजण्यापूर्वी.

मिपाची विडंबिक परिस्थिती ढासळत आहे काय?

लेखक धनंजय यांनी रविवार, 18/12/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
सटायर-रायटर्स वृत्तसंस्थेचा अलिकडील एका लेख अस्वस्थ करणारा आहे. लेखातील निदान बरोबर असेल, तर मिपाची विडंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे असे दिसते. {([मूळ लेखा])}चा दुवा येथे देतो. व थोडक्यात त्यातील मुद्दे मांडतो. http://www.misalpav.com/node/20076 कमीकमी होणारे स्तंभन, व हाताबाहेर जाणारी हातभट्टी ह्यांमुळे वाचकाच्या विडंबिक परिस्थितीवर ताण आहेतच. (गेल्या वर्षांत अनेकदा इंटरेस्ट वाढूनही उत्पादनाचा दर्जा सुधारण्याची लक्षणे नाहीत).

ग्लु वाईन

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 18/12/2011 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. गेले काही दिवस आंतरजालापासून दूर होते. सध्या ख्रिसमसमय माहौल आहे, फ्रांकफुर्टचे ख्रिसमस मार्केट आणि त्यातील चॉकलेट्स, गरमागरम चेस्टनट्स, ब्राटवुर्ष्ट, राकलेट, फाँड्यु आणि ग्लुवाइनचे स्टॉल्स भरभरुन गर्दी करत आहेत.ग्लु वाइनच्या जोडीला चेरी, रास्पबेरी, प्लमच्या वाइन्सही वाफाळत आहेत.खास मुलांकरता आणि अल्कोहोल न पिणार्‍यांकरता नॉनअल्कोहोलिक ग्लु वाइन्सचे स्टॉल्सही आहेत. त्यात आज शेवटचा रविवार!

चिकन निजामी

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 18/12/2011 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ किलो चिकन साफ करुन, तुकडे करुन घेणे. चिकन पीसेस ना थोडी हळद, लाल-तिखट व थोडे मीठ लावून मॅरीनेट करावे. . २ कांदे उभे चिरून , तळून त्यांची ब्राऊन पेस्ट करुन घेणे. १५-२० लाल सुक्या बोर मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) , २-३ टेस्पून सुके खोबरे, २ टीस्पून खसखस, ४ लवंगा, १-१/२ टीस्पून जीरे, ७-८ अख्खी काळीमिरी किंवा १ टीस्पून काळीमिरीपूड.

मुला मुलींची नावे

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 18/12/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
'नावात काय आहे' असं म्हणू दे कोणी पण नाव ही माणसाची आयुष्यभराची ओळख असते. ते ठेवताना काय विचार असतो ठेवणार्‍यांचा ? अनेक जण असेही असतात ज्यांना आपले नाव आवडत नाही.

धमाल ऍनिमेशनपट : पुस इन द बुट्स

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 17/12/2011 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज मुलांबरोबर एक ऍनिमेशनपट बघितला, पुस इन द बुट्स. हा जेव्हा येणार अशा जाहिराती चालू झाल्या तेव्हा मला काही खास आकर्षक वाटत नव्हता हा. श्रेक चित्रपटातून लोकप्रियता मिळालेले एक प्राणीचित्र. त्यावर काय चित्रपट काढणार असे वाटत होते. मुलांच्या आग्रहामुळे बळंच गेलो हा चित्रपट बघायला, तेही 3D मध्ये. मागचा 3D (रा-वन) अनुभव अतिशय भयानक होता. पण चित्रपटाला गेल्याचे सार्थक झाले.

नक्की कोणता मी प्राणी ...!

लेखक विदेश यांनी शनिवार, 17/12/2011 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मान हलवता सर मजला 'नंदीबैल' पहा म्हणती - हुषार नाही म्हणून मजला मित्र किती 'गाढव' म्हणती ! डबे शोधतो हळू नेहमी 'बोका' म्हणते आई मला , नुसता चरतो इकडे तिकडे 'घोडा' म्हणती वडील मला ! दादा म्हणतो 'लबाड कोल्हा' पुढेपुढे मी करताना - 'माकड' समजे ताई मला गडबड माझी बघताना ! 'गरीब गाय' म्हणते मला आजी माझी आवडती , जवळ घेउन आजोबा तर माझा 'वाघोबा' म्हणती !