Skip to main content

पास्ता विथ 'रस्टिक' बेसील सॉस

लेखक Mrunalini यांनी शुक्रवार, 27/01/2012 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पास्ता - १ कप बेसील - १ वाटी पाने ऑलिव्ह ऑईल - ७-८ मोठे चमचे काळी मिरी पावडर - २ चमचे लसुण - २ पाकळ्या मिठ चवीनुसार चीज सजावटीसाठी कृती: १. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्या साठी ठेवावे. त्यात थोडे मिठ व १ चमचा ऑलिव्ह ऑईल टाकावे. २. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पास्ता टाकावा. ३-४ मिनिटे हा पास्ता शिजु द्यावा. पास्ता शिजल्यावर, त्यातील सर्व पाणी गाळुन घ्यावे. ह्या पास्ताला वरतुन थोडे तेल लावावे. त्यामुळे ते चिटकत नाहीत. ३. आता खलबत्त्यामधे बेसीलची पाने वाटुन घ्यावी. हि पाने वाटताना त्यात थोडे थोडे ऑलिव्ह ऑईल टाकावे.

स्वारगेटचा यमदूत

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 27/01/2012 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेटमधल्या एका डोके फिरलेल्या माने नामक एका एस टी बस ड्रायवरने तलवार चालवतात तशी बस चालवून अनेक लोकांना ठार वा जखमी केले. आता त्यावर बरीच चर्चा होईल. पण हा प्रकार थांबवता आला असता का? एस टी किल्लीशिवाय सुरू होणार नाही असे धोरण अमलात आणणे.

फुलगोबीची सुकी भाजी

लेखक वपाडाव यांनी शुक्रवार, 27/01/2012 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
या क्षेत्राचा तसा बिल्कुलच अनुभव नसल्याने इतके दिवस ज्या धाग्यांना फाट्यावर मारत असु, तिथे येउन पाकृ द्यावी लागणे म्हणजे अजबच आहे. पण भाजी करण्याचा पैला-वैला प्रयत्न अन तो ही सफल... म्हणुन म्हटले "लोहा गरम है मार दो हथोडा"... ================================================================ तर फुलगोबी म्हंजे फ्लॉवरची सुकी भाजी कशी बनवायची? सामग्री :: (२ जणांसाठी) मोठ्या फ्लॉवरच्या फुलातील २ लहान फुलं, मोहरी, जिरे, हळद, तिखट, काळा मसाला, अर्धे गाजर, लसुन-आलं पेस्ट, मीठ अन तेल. कृती :: सर्वप्रथम फ्लॉवरचे हातानीच लहान-लहान तुकडे करुन घ्या. मग ती फ्लॉवर धुवुन घ्या.

विदेश .....!! [थोडा टाईम पास ]

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 26/01/2012 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी विदेशात होतो किती मस्त मजेने जगलो कैफात असा होतो हे जग विसरुनी मी गेलो मज आठवण येता तिथली जीव कासावीस होतो माझा आठवूनी गुलाबी थंडी हुडहुडी भरे अंगाला त्या विदेशातील घरे कशी मस्त लाकडी होती काचेच्या खिडकी मधुनी आभाळ उतरुनिया येई ह्या देशामधली गर्दी नि गोंगाट कसा भरलेला..? ह्या गाड्या मधली गर्दी मी घामाने ओला ओला नव्हता देव्हारा तेथे मी उघडला छोटा बार संध्याकाळी बसता मी विसरुनी जातो पार मी विदेशात होतो किती मस्त मजेने जगलो............!!
काव्यरस

" भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान ! "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 26/01/2012 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वधर्मसमभाव सुखाने रमतो येथे माणुसकीला जपण्या जो तो बघतो येथे अतिथी आदर सन्मानाने घडतो येथे भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान ! |१| प्रतिकूल निसर्गातही चढाई शत्रूवरती जवान जखमी होउन लढतो सीमेवरती बलिदानाचा गर्व सांडतो भूमीवरती येथ जन्मलो, येथ वाढलो, बाळगतो अभिमान ! |२| सणवारांचे महत्व जपणे आहे एकीसाठी लहान मोठा भेद विसरणे जाणिव नित्यासाठी वैरभाव मतभेद विसरणे घडता भेटीगाठी संस्कारांचे वैभव अमुचे, बाळगतो अभिमान !

चुकते कोण??

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 25/01/2012 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील बाईमाणसाला जास्त काम लावू नये, शक्यतो स्वत:चा हातभार वाढवावा,असे माझे मत आहे. असो. आई-वडिल, मुलगा-सून, नातवंडे असे भरलेले कुटूंब दिसणे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. त्यातही जी काही थोडी कुटूंबे आहेत, तिथे सूनांना योग्य वागणूक मिळत नाही. बायकांनी नेहमी घरकाम आणि नवर्‍याने तंगड्या पसरुन टीव्ही बघत चमचमीत खाण्याच्या फर्माईशी सोडायच्या असे समीकरण सर्रास दिसते. [ आमच्या गणपासारखे काही अपवाद सोडून...] माझ्या गावाला (झुमरीतलैय्या) ओळखीचे अशा एक कुटूंबात आई-वडिल, दोन मुले -सुना, नातवंडे आहे. तर झाले काय... धाकटा मुलगा दुबईत नोकरी करतो.

२०१२... अजून काय???

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 25/01/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी ऑफिसमध्ये पोचलो आणि नेहमीप्रमाणे ईमेल चेक करत बसलो. कामाचा प्रचंड कंटाळा आला होता (तो नेहमीच येतो म्हणा ;)). एक नियम नेहमी पाळतो, क्लायंटचे ईमेल सगळ्यात शेवटी चेक करतो. साले एक से एक मनहूस असतात, कारण त्यात नेहमीच एकच चर्चा असते टार्गेट्स..टार्गेट्स आणि टार्गेट्स. म्यानेजरचा पहिला ईमेल बघितला, त्याला हाय प्रायोरीटी असं मार्क केलं होतं. ***ATTENTION*** म्हटलं झालं, काही तरी नवीन जबाबदारी दिली असणार. रागातच तो ईमेल उघडला आणि त्यात सूर्याचे काही फोटो दिले होते.