Skip to main content

एक पुस्तक हवे आहे......

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 19/02/2012 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक पुस्तक हवे आहे.... म्यारेज....रोझेस रोझेस औल द वे... लेखक : सी. नौर्थ कोट पार्किन्सन .... हेच पुस्तक मराठित पण प्रकाशित झाले होते..... आपल्या पैकि कुणाकडे हे पुस्तक असेल तर कळवा....

लोकशाही, नोकरशहा आणि प्रशासन

लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी रविवार, 19/02/2012 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशाही, नोकरशहा आणि प्रशासन 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' याचा अनुभव जवळजवळ सगळ्यांनाच आला आहे. त्यामुळे सरकारी लालफितीच्या कामाविषयी जनसामान्यात कमालीची चीड आहे. ही कामे करण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. प्रशासनात असणारा नोकरशाहा या कामांचा निपटारा करीत असतो. पण निव्वळ नंदीबैलासारखा वागणारा हा नोकरशहा फक्त वरचा आदेश पाळतो आणि त्यानुसार कामे करत असतो. वरून आलेल्या परिपत्रकाची आहे तशी अंमलबजावणी करून आपले कर्तव्य पार पाडत राहतो. नियमांवर बोट ठेवत स्वतःचा खिशा गरम करून घेण्यात आणि वेळकाढूपणा करण्यात पटाईत असलेल्या नोकरशहाला जनतेला किती आणि कसा त्रास झाला, याची अजिबात फिकीर नसते.

रांगोळ्या

लेखक पैसा यांनी शनिवार, 18/02/2012 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
amit हे काय असावं? पोर्ट्रेट? की फोटो? यातलं काही नाही. ही रांगोळी आहे. माझ्या ऑफिसातला एक कलाकार नरेश आणि त्याचा जुळा भाऊ गणेश माणगावकर यांनी काढलेली. नरेश आणि गणेश हे गोव्यातल्या एका लहानशा साखळी नावाच्या गावातले जुळे भाऊ. लहान असताना दोघांनाही चित्रकला आवडायची. मग दिवाळीतली रांगोळी प्रदर्शनं पाहून हे दोघेही रांगोळ्या काढायला लागले. ८वी/९वीत असताना त्यांनी स्वतंत्रपणे शाळेतल्या रांगोळी प्रदर्शनात रांगोळी काढली.

दुनिया तुझ्यामुळे....

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 18/02/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी शिकण्या शिकविण्यात, जन्म सारा चालला दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला ते न फसवे आता हास्य ओठी जे दावतो श्वास होउनी गेल्या आता रिती ज्या मी पाळतो न जाणो कधी कसा हा जीव, ऐहिकात रमाया लागला दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला सुजनाची धुंदी आता होय मला पारखी शब्दही लेखणीत यायला मागतात पालखी असा कसा फकीराचा पाय, वस्तीत रुताया लागला दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला दुनिया तूच सांगशी काय करू अन करू नको जरी सरणावर पडलो तरी सांगशील मरू नको अताशा न देताही मला तुझा, आदेश कळाया लागला दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चालला, दुनिया तुझ्यामुळे हाय एक, कलंदर वाया चा

व्हॉट वीमेन वाँट

लेखक शुचि यांनी शनिवार, 18/02/2012 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
मेल गिबसन या नटाची प्रमुख भूमिका असलेला आणि त्याच्या सदाबहार अभिनयाने तारून नेलेला सिनेमा - "What Women Want" मी काल डीव्हीडी वरती पाहीला.

शिवमंदिर (अंबरनाथ)

लेखक सूड यांनी शनिवार, 18/02/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याचदा वीकांताचे प्लान शहराबाहेर भटकण्याचे होतात. आपण राहतो तिथे आसपास बर्‍याचदा प्रेक्षणीय स्थळं असतात, पण अशी ठिकाणं भटकंतीचे प्लान करताना आपण विसरुन जातो किंवा तिथे काय कधीही जाता येईल म्हणून ते रद्द करतो. असंच विसरलेलं नाही म्हणणार पण लक्षात असूनही जाणं न झालेलं ठिकाण म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर. इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल. आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती.

प्रत्यक्षातला 'मोहन भार्गव'...

लेखक विसुनाना यांनी शनिवार, 18/02/2012 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आशुतोष गोवारीकरांच्या तुफान यशस्वी 'लगान' नंतर त्यांनी दुसर्‍या खानसाहेबांना घेऊन 'स्वदेश' नावाचा एक चित्रपट काढला. 'नासा'त काम करणारा मोहन भार्गव नामक एक तरूण शास्त्रज्ञ भारतात परततो. भारतातल्या 'कोडी' नामक खेड्यात एक पाणचक्कीवर चालणारे विद्युत जनित्र निर्माण करतो आणि त्या गावाला वीज मिळू लागते अशी काहीशी कथा. मुळात लोकांचा अशा स्वप्नवत कथेवर विश्वास बसला नसावा. त्यामुळे तो चित्रपट तितका यशस्वी झाला नाही. सांगण्याचं कारण हे की महाराष्ट्रात नुकत्याच शमलेल्या जि.प.

मजेदार आय.डी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 18/02/2012 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा- http://www.misalpav.com/node/20732 आपल्या अंतरजालीयं अंतरमनात अनेक आय.डी. भेटतात.असेच आमच्या एका अंतर जालीय ताय.डी ने आंम्हाला काही जुने आय.डी/डु.आय.डी सांगितले होते... ओळखा बरे... १)डु-मॅन डू-मॅनी...नक्की खर्‍या,किती जणी..? २)इवलासा धागा त्याला प्रतिक्रीया अपार ३)वरुन पाहिलं तर नुसताच शिमगा,खालुन पाहिलं तर नाडिचा लेंगा,या बोअरिंगचे नाव काय सांगा..? तुमच्या अंतरमनातले आय.डी.पण सांगा...पण थांबा...हे वरचे खरे का..? ;-)

आठवणीतील मृत्यूची तीन रूपे....

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 18/02/2012 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतील मृत्यूची तीन रूपे.... माझ्या आठवणीतल्या मृत्युच्या प्रसंगापैकी तीन अगदी अतर्क्य अकल्पनीय आहेत. १. सचिन ३२ वर्षीय होतकरू तरुण. आई वडीलांचा एकुलता एक मुलगा. स्वत:चा व्यवसाय . मा. प्रा. सुमारे ३००००. २ लहान मुली. ६ आणि २ वर्षाच्या. माहेरी गेलेल्या बायको व मुलींना आणण्यासाठी रात्रीच्या बसने सचिन मुंबईला निघाला होता. Reservation मिळाले नाही. आई वडील म्हणाले Reservation मिळाल्या नंतर जा. ते न ऐकता आयत्या वेळी मिळेल असा विचार करून निघाला. शेवटच्या क्षणी मिळाले. शेवटच्या बाकावर जागा .