Skip to main content

द परफेक्ट स्टोर्म......

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 23/02/2012 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
द परफेक्ट स्टोर्म...... एकदा एक सिनेमा बघून कट्ट्यावर गेलो.....मित्राने विचारले "कुठला सिनेमा बघितला"....मी म्हणालो "कबुतर का बदला"....तो म्हणाला " हे काय सिनेमाचे नाव आहे का?"....मी म्हणालो "हो....त्याला तुम्ही "मैने प्यार किया" असे म्हणता"..... आम्ही चित्रपट शौकीन...आम्हाला कुणी एका वाक्यात जरी कथानक सांगितले तरी चालते...कोलेजच्या नावाखाली टाइमपास करत असतांना केवळ पोस्टर बघून "वेट अंटिल डार्क" नावाचा अप्रतिम सिनेमा बघितला......कुणीतरी कथानक सांगितल्यावर आणि मग ते ऐकल्यावर सिनेमा पहायला जाण्यात काय मजा?.....आणि "वेट अंटिल डार्क" सारखे सिनेमे जर कोण कथानक ऐकून बघत असतील तर त्यांना माझ

महाविजेता निवडा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी गुरुवार, 23/02/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्र-मैत्रिणींनो, व्यास क्रिएशन आयोजित ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेत सर्वोत्तम अकरा निबंधामध्ये माझ्या निबंधाची निवड झाली असून त्याची लिंक पुढील प्रमाणे आहे.

वल्ली जर " इंडियना जोन्स " तर ........

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 23/02/2012 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील बातमीपत्रात श्री रा. रा. वल्ली साहेब यांचा उल्ल्लेख " इंडियाना जोन्स" असा वाचला. यावरून एक वात्रट पण गमतीशीर धागा सुचला.इथे एक का अनेक पात्रे आहेत. ती कोणा कोणाशी साधर्म्य दाखवितात ? कोण जेम्स बाँड, सुपरमॅन, फॅन्ट्म, पँथर, शेरलॉक पेरी मेसन, काळापहाड, समर्थ, काउंट ड्राक्युला , किंग कॉंग , गॉड झिला, स्कारामांगा, एक्झॉर्सिस्ट, जॉ, पिरान्हा, डर्टी हॅरी, झुंजार, राजाराम राजे.........ई...ई

शि द फडणीस

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी बुधवार, 22/02/2012 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट आहे १९३५-३६ मधली. हत्तीशी झुंज खेळण्यासाठी बनवलेल्या कोल्हापूरच्या साठमारीच्या मैदानात काही शाळकरी मुलं खेळत असतांना त्यातील एकाचा पाय घसरून तो भिंतीवरून थेट मोठाले खिळे असलेल्या दूस-या भिंतीवर जाऊन पडला. मोठाले खिळे मांडित घुसले आणि सरळ दवाखान्यात भरतीच व्हावं लागलं. दवाखान्यात विचारपूस करायला येणा-यांची रिघ लागली. 'असा कसा काय अपघात झाला?' लोकांचा परवलीचा प्रश्न! आणि विचित्र अपघाताबद्दल सांगता सांगता आधीच चिंताग्रस्त वडिलांची उडालेली तारांबळ! मात्र सोबत खेळणा-या दहा वर्षाच्या एका मुलाने शक्कल लढवली. तीन चार चित्रांच्या मालिकेतून अपघात कसा घडला हे त्याने स्पष्ट करून दाखवलं.

सा रे ग म प.... स्वप्न तार्‍यान्चे

लेखक चिम् चिम् मामा यांनी बुधवार, 22/02/2012 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
झी-मराठी वर चालु असलेले सा रे ग म प... या कार्यक्रमाचा या पर्वाचा नेमका हेतु काय हेच कळत नाही... सर्व नावाजलेले कलाकार... पण त्याना गाणे म्हणायला घेतले? क्रान्ती रेडेकरचा आवाज तर.... खरच रेड्या सारखा आहे... नुस्ती किन्चाळत असते... ती आली तर मी चेनल बदलतो किन्वा आवाज बन्द करतो आणि अशा गाण्या नन्तर पण अवधूतला तिच कौतुक कराव लागत...हे पाहून मला हसु येत....आणि आज कल राग पण येतो. सम्पुर्ण कार्यक्रमात मला गाण सोडुन फक्त अवधूतचे बोलणे आवडते... प्रशान्त दामले...मोहन जोशी... अम्रुता सुभाष... अशा काही मोजक्या कलाकाराचे गाणी सोडली तर...

निर्णय

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 22/02/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
घट्ट मिटलेल्या डोळ्यापुढे अस्वस्थ अंधारात रंगीढंगी चित्र-विचित्र विक्षेप करत नाचत राहिल्या आकृत्या लहानाच्या मोठ्या आणि मोठ्याच्या लहान होत ठेंगा दाखवत दात विचकत हसत राहिल्या आकृत्या कान मुद्दाम बंद केले होते हात बांधून कानाशी एका दगडात पाडून टाकले चिवचिवणारे दोन पक्षी तरी राहिले आदळत आवाज भित्र्या भिंतींना भेदून शिरत राहिली नको ती कुजबुज पडदे सगळे छेदून पापण्यांच्या फटीतून तेव्हाच शिरली असह्य तिरीप अंधार पिऊन फाकणारी आणि कानावर पडली चाहूल जरा वेगळी जरबेने पाउल टाकणारी मीच बंद केलेल दार उघडलं कोणी की एक दार बंद केल्यावर आपोआप उघडलीत दुसरी? डोळे उघडून एकदा तरी पाहायलाच हव…
काव्यरस

व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 22/02/2012 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20768 भानामती गाण्यावरून कोलावरीची चाल चोरली आहे. तेंव्हा गाणे मूळ चालीत आणी अंगविक्षेप करतच म्ह्टले पाहिजे. चाल नीट समजल्या शिवाय मज्जा नै येणार. आधी ऐकले असेल तरी पुन्हा आइका आणी मगच वाचा: http://www.youtube.com/watch?v=YR12Z8f1Dh8 यो बॉयझ आय आम सिंग साँग सूपर साँग... फ्लॉप साँग .. व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी र्‍हीदम करेकटा व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी मेनटेन प्लीज व्हाय धिस भानामती..
काव्यरस

गुन्हेगारीचे राजकीयकरण ....

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आयबीएन लोकमत वाहिनी वर प्रसारित झालेल्या " आजचा सवाल " या कार्यक्रमात ...राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयावर चर्चा झाली. राजकीय पक्षाचे प्रमुख आणि जबाबदार पदाधिकारी गुन्हेगारांना निवडणुकीची तिकिटे का देतात नेते आणि उमेदवार गुंडांची मदत का घेतात किंवा घेतात की नाही ? असा साधारण चर्चेचा विषय होता . ही चर्चा बघताना आणि ऐकताना ..." सिंघम " सिनेमा बघताना जितकी करमणूक झाली नाही तेवढी करमणूक झाली. अनेक पक्षांचे नेते येवून गुंडांना निवडणूक लढवण्यापासून कसे रोखता येईल त्याची उपाययोजना करण्याच्या गप्पा मारत होते.