Skip to main content

बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही.

लेखक निश यांनी मंगळवार, 20/03/2012 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
(मराठवाडा, कोकण व इतर जागीही शेतकरी जीव देत आहेत. म्हणुन ही कविता.) आक्री त अस घडल, शेत करपुन गेल सावकारी कर्ज, डोंगरा एव्हढ झाल. वाट अशी खडतर, देव झाला गायब देव भेटला तरी , राक्षस सरकारी साहेब. पेरण्या आणल बी, सरकारवानी बोगस होत. सरकारतरी कस, मा़झ नशिब फुटक होत. विहिरीने घात केला , पाण्याने एकदम तळ गाठला. त्रासामुळे मग संसारही भार वाटला. पाणी आणायच कस? चिंतेत मन विटल जीव संपवायच वादळ, डोक्यात पुन्हा उठल. जीव दिला तरी , उत्तर मिळणार नाही. बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही. बळी राजाच देण ह्याजन्मी तरी फीटणार नाही.
काव्यरस

असाध्य स्वार्थ...!

लेखक वेणू यांनी मंगळवार, 20/03/2012 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
वेदनांचे सण साजरे करण्याची ना हिम्मत होती, ना ऐपत..! त्यांना पापण्यांमागे साठवून अश्रु गाळण्याइतकी, श्रीमंती कधी नव्हतीच! उलट त्यांची धार बोथट करण्यासाठी प्रसंगी काळाशीही निग्रही स्पर्धा....! सुखाशी जितकी सलगी, तितकीच वेदनांशी फारकत! तसं नुकसान फारंसं नाही मात्र, 'वेदनेतले कंगोरे आज जपले, तर उद्या काव्यही बहरेल' हा स्वार्थ साधायचा राहूनच गेला! -बागेश्री

चवदार तळे सत्याग्रह - ८५ वर्ष पूर्ण..

लेखक कॉमन मॅन यांनी मंगळवार, 20/03/2012 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज ८५ वर्ष पूर्ण होत आहोत. बाबासाहेबांनी त्यावेळेला या तळ्यातले पाणी पिऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून दिले होते. आज या निमित्ताने आम्ही डॉ बाबासाहेबांच्या चरणी वंदन करत आहोत.. -- कॉमॅ.

लिलाव

लेखक योगेश पितळे यांनी मंगळवार, 20/03/2012 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना नमस्कार, संगीतकार श्रीधर फडके हे मराठी भावसंगीतातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व! ऋतु हिरवा, तेजोमय नादब्रम्ह, संगीत मनमोही रे अशा अनेक अल्बम्सनी मराठी मनाला गेली अनेक वर्षे घातलेली मोहीनी अजूनही तशीच आहे. यात भर म्हणून श्रीधरजींनी संगीतबद्ध केलेल्या मराठी गीतांचा "लिलाव"साठी काम करण्याचा मला योग आला.

उंच माझा झोका ..

लेखक अरूण म्हात्रे यांनी मंगळवार, 20/03/2012 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
झी मराठीवर सध्या चालू असलेल्या उंच माझा झोका ह्या मालीकेचे शीर्षकगीत मी लिहीले आहे. चांदणचाहूल होती.. कोवळ्या पावली माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय.. अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या ..भरे नभाचा आशय थबकले उंबऱ्यात मी ..पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने ..भरता हा मळवट हाती अमृताचा वसा , साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात..

मिड्लाईफ क्रायसीस.

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 19/03/2012 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
टळट्ळीत दुपारी, पायाशी पडलेल्या सावलीने, हळुच मागे वळुन पाहिल्या, स्वतःच्याच पावुलखुणा. काही ठसठशीत होत्या दुरवर, मातीत जवळ्च्या काही विरलेल्या.. एका रेषेत रस्ताही नव्हता, पावलही पडलेली झिंगल्यासारखी, आठवतात आता वाटांचे ईषारे, मागच्या वळणांची निमंत्रणही.. हसत स्वीकारलेली, रडत अव्हेरलेली, मुकी अजुनही उभी माझ्यासाठी.. काही अत्रुप्त इच्छांचे भोग, काही अत्रुप्त भोगांच्या ईच्छा.. काही त्रुप्तल्या भोगांच्या आवर्तनांची, जळजळुन उठणारी वखवख.. आजही बनवतोय एक नैतिक चौकट, माझ्या पापांच्या मापाची.. कधी वार्‍यावर वाहत गेलेलं मन, कधी मनावरुन वारं गेलेलं, दगडी पायाला फुटलेली शेवाळ, अन मातीच्या धरणांत अडले

कॉकटेल लाउंज : सेंचुरी धमाका ('वडवानल' स्पेशल)

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 19/03/2012 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
शंभर वर्षातून एखाद्याच वेळेला साजरे करण्यासारखे काही क्षण असतात, त्यापैकी एक म्हणजे सचिनची सेंचुरीची सेंचुरी. त्यासाठी काहीतरी भन्नाट पेय नको का? पण आपले लाडके कॉकटेलाचार्य सोत्रि सध्या दारूचा बारच्यामागची आपली जागा सोडून वेगळेच बार उडवण्याच्या मोहिमेवर आहेत. तेव्हा म्हटलं आपण चान्स मारून घ्यावा. म्हणून 'सेंचुरी धमाका' हे नवीन कॉकटेल सादर करत आहोत. हे कॉकटेल काहींना भन्नाट आवडतं आणि ते भरभरून प्रतिसाद देतात. आणखीन इतरांना ते कॉकटेल वाईट वाटलं नसलं तरी आधीच्यांचे प्रतिसाद आवडत नाहीत, मग ते त्यांना तसं सांगतात. त्यांची एकमेकांत चर्चा रंगते आणि प्रतिसादांची सेंचुरी हा हा म्हणता गाठली जाते.

भिगवन

लेखक jaypal यांनी सोमवार, 19/03/2012 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
3

कट्टेकर्‍यांची वारी... चिंचवडवर स्वारी ...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 19/03/2012 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
कवनरुपे कहाणी-श्री.अन्नक्षेत्र चिंचवड,मिपा खादाडवारी,संयोजक-मोदक ;-) एक आहे गावं चिंचवड,तेथे मिपाची एक कावडं अजोबा एक नातू सगळे,नाती काही असती... मोदक नामे नवमिपाकरू,वल्ली मागे महामेरु चिंचवडकरांसी आधारु,मिपा कट्टा करण्या... तारीख सतरा वारं-शनिवार,रोजवूड मधला आहार सायं-काली पक्ष्यांचा बहर,बरा होता तेथे बा...