सोफिया
सोफिया !
मोझंबीकमधील मापूटो नावाच्या गावात एका इस्पितळासमोर, पंधरा एक वर्षापूर्वी एक छोटी मुलगी एका गंजलेल्या चाकाच्या खुर्चीत हताशपणे बसलेली होती. तिला दोन्ही पाय नव्हते आणि तिचे वय असेल अंदाजे १० एक. माझे लक्ष तिच्याकडे गेले आणि का कोणास ठावूक मला तिच्याशी बोलावेसे वाटले म्हणून मी बोलले. तिच्या अस्फूटशा आवाजात मला तिने तिचे नाव सांगितले तो प्रसंग मला अजून लख्खपणे आठवतोय. ती म्हणाली “सोफिया”
आज अनेक वर्षानंतर आम्ही चांगल्या आणि अत्यंत जवळच्या मैत्रिणी आहोत.
मिसळपाव