Skip to main content

नियुक्त खासदार - घटनेअंतर्गत आणि घटनाबाह्य

लेखक विकास यांनी सोमवार, 30/04/2012 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
तमाम भारतीयांच्या लाडक्या सचिनला राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा खासदारकी मिळणार म्हणल्यापासून विविध प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. त्यात विशेष करून पक्षिय राजकारणाचा वाद देखील आलेला दिसून येतो. मला तो मान्य नाही असे आधीच स्पष्ट करतो. म्हणजे, सत्ताधार्‍यांनी यात राजकारण केले आहे यात शंका नाही. पण ते कोणीही केले असते. त्यात नवल नाही. पण घटने प्रमाणे: राष्ट्रपती नियुक्त खासदार हा कुठल्याही पक्षाचा नसतो. अर्थात त्याला/तिला सहा महीन्यात (हव्या त्या) पक्षात प्रवेश करण्याची मुभा आहे.

तेझ : एका तिकिटात ५ चित्रपट

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 30/04/2012 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी 'एका तिकिटात दोन बालनाट्ये आणि आइसक्रीम मोफत' अशा जाहिराती आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत.

देव झाला दानव

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी रविवार, 29/04/2012 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या हातात भरपूर वेळ आणि मोफत लेखणी करण्याची पर्वणी आभसी जगतात विनाशुल्क उपलब्ध असल्याने असल्यामुळे आम्ही कोणावरही काहीही खरडू शकतो. असे अनेकांना वाटते ,मलाही वाटते म्हणून ही खरडेगिरी. सचिन ला देव मानणारे अचानक त्याने खासदारकी स्वीकारली म्हणून दानव समजू लागले आहेत, इंटर नेट वर त्याला शिव्याची लाखोली वाहिली जात आहे. जणू काही त्याने निशाने पाकिस्तान स्वीकारले आहे असा गजहब करण्यात येत आहे. पूर्वी हा देव मातोश्री वर दर्शन द्यायचा आता कृष्ण कुंज मध्ये त्यांचे बस्तान हलल्यामुळे अपेक्षित त्या प्रतिक्रिया राजकारणी मंडळींकडून आल्या.

पानी आनाया जावू कशी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/04/2012 06:17 या दिवशी प्रकाशित केले.
पानी आनाया जावू कशी हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ|| दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया? आगं विहीर कोरडी, हापसा तुटका नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१|| दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी?
काव्यरस

उत्कल दिवस २०१२

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 29/04/2012 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय टी खडगपूरमध्ये मला देशाच्या विविध भागातील लोकांचा सहवास मिळाला. त्यांच्या चालीरिती, सण वगैरे जवळून बघायला मिळाले. अर्थात अन्य प्रांतात स्थायिक झालेल्या कुणालाही मिळू शकते. गेल्या महिन्यात मला अजुन एक असाच कार्यक्रम बघायला मिळाला, तो म्हणजे उत्कल दिबस (हो, पूर्व भारतात (बंगाल, ओडिशा, बिहार इ.) व चा उच्चार ब/भ असाच केला जातो) एका रुढार्थाने मागास राज्याचा स्थापना दिवस म्हणजे नक्की असणार तरी काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे; पण या कार्यक्रमाचा आयोजक माझा मित्रच असल्याने थोडेफ़ारतरी भव्य-दिव्य असणार याची कल्पना आधीच मिळाली होती.