Skip to main content

वेताळाचे प्रश्न

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 16/05/2012 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच काळाने आमचा नान्या सक्रिय राजकारणात परत आला, आणि आमचा आनंद बाटलीत मावेनासा झाला. तोबताबड आम्ही आमच्या चौपाटीवरती प्यार्टी आयोजीत केली. सगळी चौपाटी सजली होती, बार टेंडर, कॅप्टन, वेटर सगळे नवीन धुतलेले कपडे घालून सेवेला हजर झाले होते, मात्र नान्याच्या चेहर्‍यावरती उदास उदास भाव दाटून राहिले होते. गप्प गप्प नान्या काय मला बघवेना. शेवटी गुमसुम मध्ये २ पेग झाल्यावरती मी नान्यावरती सरळ डाफरलोच. मी :- नान्या, काय मयतीला जौन आला बे ? असा का बसला आहेस ? नाना :- पर्‍या काय सांगू तुला ? मला ४ दिवस झाले वेताळाने पकडले आहे.

मुंबई कट्टा :- १९ /२० मे २०१२

लेखक स्पा यांनी बुधवार, 16/05/2012 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
हाय लोक्स.. १९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे. ठिकाण : veg alweys परळ एस टी डेपोजवळ गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई (http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-…) वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ बरोबर ६ वाजता कळावे, आपला नम्र जिलबीपाडू स्पा

'आय लव्ह यू रसना' रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्यावर काळाची झडप...

लेखक लीलाधर यांनी बुधवार, 16/05/2012 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
'आय लव्ह यू रसना' रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्यावर काळाची झडप... नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांमध्ये चौदा वर्षीय बालकलाकार तारुणी सचदेव हिचा समावेश असल्याची बातमी पसरली आणि सारेच हळहळले. रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्या म्रुतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

टवाळा आवडे विनोद ???

लेखक कापूसकोन्ड्या यांनी बुधवार, 16/05/2012 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
टवाळा आवडे विनोद ??? आपण कुठे जाणार आहोत. संसदीय लोकशाही मध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. स्व. इंदिरा गांधी ना एका मुलाखती मध्ये नेहमीचा प्रश्न टाळून असे विचारण्यात आले होते की, तुम्हाला सर्वात न आवडणारी व्यक्ती कोणती, तेव्हा त्यानी '' अ पर्सन हू डज नॉट अंडरस्टँड ह्युमर'' असे सांगीतले होते. त्यांचीच आणखी एक आठवण अशी सांगतली जाते, की एका मुलाखती मध्ये त्यांनी आर के लक्ष्मण यांचा गौरव केला होता. त्यांचे व्यंगचित्र रोज सकाळी पाहणे हा माझा आवडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे काल देशात महत्वाचे काय घडले ते समजते असे त्या म्हणाल्या होत्या.

माफ करा,

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 15/05/2012 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्याकडून एक चूक झाली.खरे तर काल माझ्या अनेक दीपस्तंभांपैकी एका वीर-पुरूषाची पुण्यतिथी होती.राजमान्य आणि स्वधर्माभिमानी , छ. संभाजी राजे ह्यांची. पण कसे काय कोण जाणे मी त्यांच्या विषईच्या भावना व्यक्त करायला विसरलो.लहानपणी इतिहास जास्त आवडत न्हवता.कारण सनावळ्या आणि इतर फालतू माहिती.ह्या व्यक्ती विषईपण असेच झाले.पुढे वाचनाची आवड असणारे मित्र मिळाले आणि थोडा-फार ईतिहास समजायला लागला.ह्या व्यक्तीने काय-काय भोगले आहे, त्याचा जर नुसता आढावा घेतला तरी खूप झाले. १. जन्मतःच आई गेली. २. सावत्र आईचे कूटिल राजकारण. ३. वडिल सतत समाजकारण करायला गुंतलेले. ४.

नाजूक - साजूक

लेखक तिमा यांनी मंगळवार, 15/05/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
एका लग्नाला नुकताच गेलो होतो. संध्याकाळी ७ ते १० अशी वेळ दिली होती म्हणून साधारण पावणेआठ वाजता पोचलो. तरीही प्रथेनुसार नवरा-नवरी स्टेजवर आलेच नव्हते. यजमान सर्वांना आधी जेवून घ्या असा प्रेमळ आग्रह करत होते. पण माझे दुसरे एक मित्र यायचे होते त्यामुळे त्यांची वाट पहायची ठरवून एका पांढर्‍याशुभ्र कव्हराच्या गुबगुबीत खुर्चीवर विसावलो. आजुबाजुला सुंदर सुंदर ड्रेसेस व साड्या नेसलेल्या (पाण्याला 'अ‍ॅव्ह' म्हणतील अशा) ललना विहरत होत्या. अनेक संभाषणे कानावर पडत होती. पण एका वैशिष्ठ्यपूर्ण बोलण्याने माझ्या कानांचा ताबा घेतला. " हाय,... अगं किती दिवसांनी भेटतोय आपण!

अबोली

लेखक जागु यांनी मंगळवार, 15/05/2012 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
अबोलीच्या नावातच शांत गुण आहे त्याप्रमाणे अबोलीची फुले पाहूनच शांत, प्रसन्न वाटत.

अळुवडी ( क्रिस्पी -कुरकुरी )

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 15/05/2012 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अळूवडी ( क्रिस्पी) साहित्य : १) अळूची पाने ८-१० ( कोवळी अन छोटी असतील तर उत्तम ) २) बेसन पीठ २ वाट्या (मी हिरा बेसनपीठ वापरले आहे चिकट असते रोल करायला सोपे पडते ) ३) हिरव्या मिरच्या ७-८. ४) लसूण पाकळ्या ७-८. ५) जीर / (जिरपूड ) १ छोटा चमचा . ६) गुळ १ छोटा चमचा (किसून) ७) चिंचेचा कोळ १ चमचा . ८) मीठ चवीनुसार . ९ )तळण्यासाठी तेल . १० ) भाजलेली बडीशेप भरड अर्धा चमचा ( आँपशनल). कृती :- अळूची पाने स्वच्छ धुवून - पुसून कोरडी करून घ्या . अळूच्या पानाचा मागल्या साईडला असलेला देठ काप