Skip to main content

आषाढी स्पेशल : कोंबडी वडे (मालवणी वडे)

लेखक Mrunalini यांनी मंगळवार, 17/07/2012 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी स्पेशल : कोंबडी वडे (मालवणी वडे) साहित्यः गव्हाचे पीठ - २ वाटी तांदुळाचे पीठ - १ वाटी ज्वारीचे पीठ - पाऊण वाटी बेसन - १/२ वाटी धणे - १ चमचा बडिशेप - १ चमचा जीरे - १/२ चमचा मेथी - १/२ चमचा हळद - १ चमचा मीठ चवीनुसार तेल तळण्यासाठी कोळसा - १ कृती: १. कढईमधे धणे, बडिशेप, जीरे व मेथी भाजुन घ्यावी. हे गार झाल्यावर मिक्सर मधे एकदम बारीक पुड करुन घ्यावी. २. एका भांड्यामधे सर्व पीठे, चवीनुसार मीठ, हळद व बारीक केलेली पुड टाकुन एकत्र करुन घ्यावे. हे पीठ गरम पाण्याने चपातीच्या कणके प्रमाणे मळुन घ्यावे. ३.

सफेद सौंदर्य व सुगंध

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/07/2012 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी मनोगत नाही लिहत ह्या फुलांवर तुम्ही पाहून भावनीक सुगंध अनुभवावा व नेत्रसुख घ्याव ही विनंती. १) निवडूंग (ब्रह्मकमळ) २) जुई

गनीम

लेखक निळकंठ दशरथ गोरे यांनी मंगळवार, 17/07/2012 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
माघचा आठवडा भारताकरिता काळा आठवडाच होता. स्त्रीयावरील अत्याचार शिगेला गेला. वर्तमानपत्र वाचले की मन विषण्ण होऊन जाते.

द ब्लु अम्रेला.

लेखक अनुरोध यांनी सोमवार, 16/07/2012 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा :- छत्री. विविध छत्र्यांचे फोटो आणि कोणा एकाने प्रतिसादात लिह्लेच आहे तर एक लेख आपण या निळ्या छत्री वर टकावाच म्हटलं. द ब्लु अम्रेला. हिमाचल प्रदेशातिल एक गाव असतं (आता लगेच कोणतं म्हणुन विचारु नका लगेच). तर त्या डोंगराळ भागात राह्णा-या लोकांचि हि गोश्ट आहे. या डोंगराळ, हिम्छादीत चोट्याशा गावात एक छोटि मुलगी, मुनिया आपली विधवा आई आणि पहेलवान, कुस्तीपटु असलेल्या आपल्या भावा बरोबर रहात असते. शाळेत जाणे, खेळणे व फावल्या वेळात बक-या चरायला नेणे हे हिचे उद्योग. हुशार असल्यामुळे आणि पहेलवानाचि लहान बहिण असल्याने हि गावात लाडकी असते. याच गावात एक चिक्कट दुकानदार रहात असतो...

आयडीया ३जी सेवा तक्रार - सल्ला हवाय

लेखक jaydip.kulkarni यांनी सोमवार, 16/07/2012 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही महिन्यांपूर्वी आयडिया ची ३जी सेवा (८५० रुपये मासिक शुल्क आणि ३ जीबी वापर मर्यादा) ऍक्टिवेट करण्यासाठी विनंती केली.दुसऱ्या दिवशी कस्टमर केअर एक्झिकेटिव्ह ने मला ती सेवा ऍक्टिवेट झाल्याचे सांगितले आणि मी इंटरनेट वापरायला सुरुवात केली , पण मिळत असलेली सर्विस अतिशय खराब होती .

कुठे करू पावसाळ्यातली रम्य सफर?

लेखक विनीत संखे यांनी सोमवार, 16/07/2012 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
सायबानु लिहिण्यास श्रम ह्यासाठी की मला फ्यामिलीसोबत (२ मोठे आणि एक छोटुकली) मुंबईच्या जवळपास पावसाळ्यात (ऑगष्ट मध्ये) रम्य सहल करायची आहे. २ दिवस तीन रात्र. छोटुकली ११ महिन्यांची आहे. त्यामुळे सहलींचे पर्याय कमी सापडतात. गाडीची व्यवस्था मला करता येईल... वीस पंचवीस हजारांचे बजेट आहे (बायको पंधरात बघतेय ... त्यात "रम्य"पणा कमी व्हायची भिती असल्याने मी बजेट वाढवलंय) काही मी शोधलेले पर्याय ... १. लोणावळा अ‍ॅम्बी वॅली - इथे बुकींग कशी करतात हो? २. महाबळेश्वर ३. माथेरान - (बाळाला घेऊन घोड्यावर किंवा पायी चालता येईल का?) ४. पांचगणी - फिरण्यालायक काय आहे इथे? ५.

किशोर कुमार: मराठी गाणी आणि एक अनोळखी पैलू

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 16/07/2012 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडणार्‍या कलाकार आणि खेळाडू यांच्या स्वभावाची नेहेमीच्या छबीपेक्षा वेगळी आणि चांगली बाजू शोधण्याचा प्रयत्न करणं हा माझा जुना छंद. किशोर कुमार या माझ्या आवडत्या गायकाच्या स्वभावाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी ऐकीवात आणि वाचनात आल्या. तेव्हा त्याच्याबद्दल काही वेगळी गोष्ट सापडते का हा विचार मनात अनेक दिवस घोळत होता. शिवाय त्याचं प्रमुख कार्यक्षेत्र हिंदी चित्रपटात पार्श्वगायन आणि अभिनय असल्यानं त्याने गायलेल्या मराठी गाण्यांबाबत उत्सुकता होतीच. लहानपणी सचिनचा 'गंमत जंमत' हा चित्रपट पाहिला होता. त्यात अनुराधा पौडवाल यांच्या साथीनं एक द्वंद्वगीत गायल्याच आठवत होतं.

आशा

लेखक sneharani यांनी सोमवार, 16/07/2012 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नावच कशाला हवं एखाद्या नात्याला ऋणानुबंध समज हवं तर..... हिर्‍याच्या तेजासम असणारा जिव्हाळा - त्याला नात्याच्या नावाचं कोंदण हवच कशाला? हिराही चमकतो की मग तो सोन्याचांदीच्या कोंदणात असला काय किंवा नसला काय.... अशा जिव्हाळ्याच्या हिर्‍यामधून आशेची किरणं परिवर्तित होतात... अन् मग रंगबेरंगी स्वप्नं आकार घेतात स्वप्नं सत्यात उतरताना आशेची किरणं सदोदीत साथ देत राहतील ही कदाचित पण नशिबाची साथ मिळायला लागतेच की... म्हणतात की लाख शिंपले उघडले की एखादा अनमोल मोती सापडेल इतके प्रयत्न करूनही नाही सापडला तर "नशीब" खोटं ठरत पण शिंपली उघडण्याची आस अन् त्या प्रत्येक क्षणात असणारी आशा सत्य होतीच ना? अगदी तसच
काव्यरस